योहान 17:13-23
योहान 17:13-23 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
पण आता मी तुझ्याकडे येत आहे आणि माझा आनंद त्यांच्याठायी परिपूर्ण व्हावा म्हणून मी जगात या गोष्टी बोलतो. मी त्यांना तुझे वचन दिले आहे, जगाने त्यांचा द्वेष केला आहे; कारण जसा मी जगाचा नाही तसे तेही जगाचे नाहीत. तू त्यांना जगातून काढून घ्यावे अशी मी विनंती करीत नाही, तर तू त्यांना दुष्टापासून राखावे अशी मी विनंती करतो. जसा मी जगाचा नाही, तसे तेही जगाचे नाहीत. तू त्यांना सत्यात पवित्र कर. तुझे वचन हेच सत्य आहे. जसे तू मला जगात पाठवले तसे मीही त्यांना जगात पाठवले आहे. आणि त्यांनीही सत्यांत पवित्र व्हावे म्हणून मी त्यांच्याकरिता स्वतःला पवित्र करतो. मी केवळ त्यांच्यासाठी नाही, तर त्यांच्या शब्दावरून जे माझ्यावर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठीही विनंती करतो की, त्या सर्वांनी एक व्हावे; हे माझ्या पित्या, जसा तू माझ्यामध्ये आहेस व मी तुझ्यामध्ये आहे तसे त्यांनीही तुझ्यामाझ्यामध्ये एक व्हावे, कारण तू मला पाठवले असा जगाने विश्वास धरावा. तू जे गौरव मला दिले आहे, ते मी त्यांना दिले आहे, यासाठी की, जसे आपण एक आहोत तसे त्यांनी एक व्हावे; म्हणजे मी त्यांच्यामध्ये आणि तू माझ्यामध्ये; यासाठी की, त्यांनी एक होऊन पूर्ण व्हावे आणि, त्यावरून जगाने समजून घ्यावे की, तू मला पाठवले आणि जशी तू माझ्यावर प्रीती केली तशी त्यांच्यावरही प्रीती केली.
योहान 17:13-23 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“आता मी तुमच्याकडे येत आहे, परंतु मी या जगात असतानाच हे सांगत आहे, यासाठी की माझा आनंद त्यांच्यामध्ये परिपूर्ण व्हावा. मी त्यांना तुमचे वचन सांगितले आहे आणि जगाने त्यांचा द्वेष केला, कारण जसा मी जगाचा नाही तसे तेही या जगाचे नाहीत. तुम्ही त्यांना जगातून काढून घ्यावे यासाठी मी प्रार्थना करीत नाही, परंतु त्यांचे दुष्टापासून रक्षण करावे. जसा मी या जगाचा नाही तसे तेही या जगाचे नाहीत.” सत्याने त्यांना पवित्र करा; तुमचे वचन सत्य आहे. जसे तुम्ही मला जगात पाठविले, तसे मीही त्यांना जगात पाठविले आहे. त्यांनी देखील खरोखर पवित्र व्हावे म्हणून मी त्यांच्यासाठी स्वतःला पवित्र करतो. “माझी प्रार्थना केवळ त्यांच्यासाठीच नाही. जे त्यांच्या संदेशाद्वारे मजवर विश्वास ठेवतील मी त्यांच्यासाठी देखील प्रार्थना करतो. हे पित्या, तुम्ही मजमध्ये व मी तुम्हामध्ये आहे, तसेच त्या सर्वांनी एक व्हावे, म्हणजे तुम्ही मला पाठविले असा जग विश्वास ठेवेल. तुम्ही जे गौरव मला दिले ते मी त्यांना दिले, यासाठी की जसे आपण एक आहोत तसे त्यांनीही एक व्हावे, मी त्यांच्यामध्ये व तुम्ही माझ्यामध्ये यासाठी आहोत की त्यांनी एक होऊन पूर्ण व्हावे आणि त्यावरून जगाने समजून घ्यावे की, तुम्ही मला पाठविले आहे आणि जशी तुम्ही मजवर प्रीती केली तशी त्यांच्यावरही प्रीती केली आहे.
योहान 17:13-23 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
पण आता मी तुझ्याकडे येत आहे; आणि माझा आनंद त्यांच्या ठायी परिपूर्ण व्हावा म्हणून मी जगात ह्या गोष्टी बोलतो. मी त्यांना तुझे वचन दिले आहे; जगाने त्यांचा द्वेष केला, कारण जसा मी जगाचा नाही तसे तेही जगाचे नाहीत. तू त्यांना जगातून काढून घ्यावेस अशी विनंती मी करत नाही, तर तू त्यांना वाइटापासून राखावे अशी विनंती करतो. जसा मी जगाचा नाही तसे तेही जगाचे नाहीत. तू त्यांना सत्यात समर्पित कर; तुझे वचन हेच सत्य आहे. जसे तू मला जगात पाठवलेस तसे मीही त्यांना जगात पाठवले, आणि त्यांनीही सत्यात समर्पित व्हावे म्हणून मी त्यांच्याकरता स्वतःला समर्पित करतो. मी केवळ त्यांच्यासाठी नाही, तर त्यांच्या वचनावरून जे माझ्यावर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठीही विनंती करतो, ह्यासाठी की, त्या सर्वांनी एक व्हावे; हे माझ्या पित्या, जसा तू माझ्यामध्ये व मी तुझ्यामध्ये तसे त्यांनीही तुझ्या-माझ्यामध्ये [एक] व्हावे, कारण तू मला पाठवलेस असा विश्वास जगाने धरावा. तू जो गौरव मला दिला आहेस तो मी त्यांना दिला आहे, ह्यासाठी की, जसे आपण एक आहोत तसे त्यांनीही एक व्हावे; म्हणजे मी त्यांच्यामध्ये व तू माझ्यामध्ये; ह्यासाठी की, त्यांनी एक होऊन पूर्ण व्हावे आणि त्यावरून जगाने समजून घ्यावे की, तू मला पाठवलेस आणि जशी तू माझ्यावर प्रीती केलीस तशी त्यांच्यावरही प्रीती केलीस.
योहान 17:13-23 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
आता मी तुझ्याकडे येत आहे आणि माझा आनंद त्यांच्या ठायी परिपूर्ण व्हावा म्हणून मी ह्या गोष्टी जगात बोलत आहे. मी त्यांना तुझा संदेश कळवला आहे. जगाने त्यांचा द्वेष केला कारण जसा मी जगाचा नाही, तसे तेही जगाचे नाहीत. तू त्यांना जगातून काढून घ्यावे, अशी मी विनंती करत नाही, तर तू त्यांचे दुष्टापासून संरक्षण करावे अशी विनंती करतो. जसा मी जगाचा नाही, तसे तेही जगाचे नाहीत. सत्यात तू त्यांना तुझ्याकरता समर्पित करून घे. तुझे वचन हेच सत्य आहे. जसे तू मला जगात पाठवलेस तसेच मी त्यांना जगात पाठवले आणि त्यांनीही तुझ्याकरता समर्पित व्हावे म्हणून मी त्यांच्याकरता स्वतःला तुझ्यापुढे समर्पित करतो. मी केवळ त्यांच्यासाठी नव्हे तर त्यांनी सांगितलेल्या वचनावरून जे माझ्यावर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठीही विनंती करत आहे की, त्या सर्वांनी एक व्हावे. पित्या, जसा तू माझ्यामध्ये व मी तुझ्यामध्ये तसे त्यांनीही तुझ्यामाझ्यामध्ये एक व्हावे. म्हणजे तू मला पाठवले आहेस, असा विश्वास जगाने ठेवावा. जसे आपण एक आहोत तसे त्यांनीही एक व्हावे म्हणून तू मला दिलेल्या वैभवात मी त्यांना सहभागी केले आहे. त्यांनी पूर्णपणे एक व्हावे आणि त्यावरून जगाने समजून घ्यावे की, तू मला पाठवले आहेस आणि तू जशी माझ्यावर प्रीती करतोस तशी त्यांच्यावरही प्रीती करतोस.