योहान 16:5-7
योहान 16:5-7 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
परंतु ज्याने मला पाठवले त्याच्याकडे मी आता जातो आणि ‘आपण कोठे जाता?’ असे तुमच्यापैकी कोणी मला विचारत नाही. ह्या गोष्टी मी तुम्हांला सांगितल्यामुळे तुमचे अंतःकरण खेदाने भरले आहे. तरी मी तुम्हांला खरे ते सांगतो; मी जावे हे तुमच्या हिताचे आहे, कारण मी न गेलो तर कैवारी तुमच्याकडे येणारच नाही. मी गेलो तर त्याला तुमच्याकडे पाठवीन.
योहान 16:5-7 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
पण ज्याने मला पाठवले त्याच्याकडे मी आता जातो आणि आपण कोठे जाता असे तुमच्यापैकी कोणीही मला विचारीत नाही. पण मी या गोष्टी तुमच्याशी बोलल्यामुळे तुमचे अंतःकरण दुःखाने भरले आहे. तरीही मी तुम्हास खरे ते सांगतो, मी जातो हे तुमच्या फायद्याचे आहे, कारण मी गेलो नाही, तर कैवारी तुमच्याकडे येणारच नाही; मी गेलो तर मी त्यास तुमच्याकडे पाठवीन
योहान 16:5-7 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
परंतु आता ज्यांनी मला पाठविले त्यांच्याकडे मी परत जात आहे. तरी तुम्हापैकी कोणीही, ‘आपण कोठे जाता?’ असे विचारीत नाही खरे सांगावयाचे तर, मी या गोष्टी सांगितल्या आहेत म्हणून तुमची हृदये दुःखाने भरून गेलेली आहेत. परंतु खरी गोष्ट सांगतो की, माझे जाणे हे तुमच्या हितासाठीच आहे. मी जर गेलो नाही, तर कैवारी तुमच्याकडे येणार नाही; पण मी जर गेलो तर मी त्याला तुमच्याकडे पाठवीन.
योहान 16:5-7 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
परंतु ज्याने मला तुमच्याकडे पाठवले त्याच्याकडे आता मी जात आहे. तरीही आपण कुठे जाता, असे तुमच्यापैकी कोणीही मला विचारत नाही. ह्या गोष्टी मी तुम्हांला सांगितल्यामुळे तुमचे अंतःकरण दुःखाने जड झाले आहे. तरीही मी तुम्हांला खरे ते सांगतो. मी जावे हे तुमच्या हिताचे आहे कारण मी गेलो नाही, तर कैवारी तुमच्याकडे येणार नाही. परंतु मी गेलो तर मी त्याला तुमच्याकडे पाठवीन.