योहान 16:25-28
योहान 16:25-28 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
या गोष्टी मी तुमच्याशी दाखल्यात बोललो आहे; पण जेव्हा मी तुमच्याशी दाखल्यात बोलणार नाही पण मी तुम्हास उघडपणे पित्याविषयी सांगेन अशी वेळ येत आहे. त्यादिवशी तुम्ही माझ्या नावाने मागाल; आणि मी तुमच्यासाठी पित्याजवळ विनंती करीन असे मी तुम्हास म्हणत नाही. कारण पिता स्वतः तुमच्यावर प्रीती करतो, कारण तुम्ही माझ्यावर प्रीती केली आहे आणि मी पित्यापासून आलो असा विश्वास धरला आहे. मी पित्यापासून निघून जगात आलो आहे; पुन्हा, जग सोडून पित्याकडे जातो.”
योहान 16:25-28 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“जरी मी अलंकारिक रीतीने बोलत आहे, तरी अशी वेळ येईल की मी तुम्हाबरोबर अशा भाषेमध्ये आणखी बोलणार नाही तर पित्याविषयी तुम्हाला स्पष्टरीतीने सांगेन. त्या दिवसामध्ये तुम्ही माझ्या नावाने मागाल. मी असे म्हणत नाही की मी तुमच्यावतीने पित्याजवळ मागेन. नाही, पिता स्वतःही तुमच्यावर प्रीती करतो, कारण तुम्ही मजवर प्रीती केली व मी परमेश्वरापासून आलो असा मजविषयी विश्वास धरला. मी पित्यापासून आलो आणि या जगात प्रवेश केला आणि मी हे जग सोडून पित्याकडे परत जात आहे.”
योहान 16:25-28 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
ह्या गोष्टी मी तुम्हांला अन्योक्तीने सांगितल्या आहेत; मी तुमच्याबरोबर अन्योक्तीने आणखी बोलणार नाही, तर पित्याविषयी तुम्हांला उघड सांगेन अशी घटका येत आहे. त्या दिवशी तुम्ही माझ्या नावाने मागाल. आणि मी तुमच्यासाठी पित्याजवळ विनंती करीन, असे मी तुम्हांला म्हणत नाही; कारण पिता स्वतः तुमच्यावर प्रीती करतो, कारण तुम्ही माझ्यावर प्रीती केली आहे आणि मी पित्यापासून आलो असा विश्वास धरला आहे. मी पित्यापासून निघून जगात आलो आहे; पुन्हा जग सोडून मी पित्याकडे जात आहे.”
योहान 16:25-28 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
ह्या गोष्टी मी तुम्हांला अप्रत्यक्षपणे सांगितल्या आहेत. ह्यापुढे मी तुमच्याबरोबर अप्रत्यक्षपणे बोलणार नाही, तर तुम्हांला पित्याविषयी उघडपणे सांगण्याची घटका जवळ येत आहे. त्या दिवशी तुम्ही माझ्या नावाने मागाल आणि मी पित्याजवळ तुमच्यासाठी विनंती करीन, असे मी तुम्हांला म्हणत नाही. तुम्ही माझ्यावर प्रीती केली आहे आणि मी पित्याकडून आलो आहे, असा विश्वास तुम्ही बाळगला आहे म्हणून पिता स्वतः तुमच्यावर प्रीती करतो. मी पित्याकडून ह्या जगात आलो आहे व पुन्हा जग सोडून पित्याकडे जात आहे.”