YouVersion लोगो
सर्च आयकॉन

योहान 16:19-24

योहान 16:19-24 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

आपणाला विचारावे असे त्यांच्या मनात आहे, हे ओळखून येशू त्यांना म्हणाला, “मी म्हणले की, थोड्या वेळाने, तुम्हास मी दिसणार नाही आणि पुन्हा, थोड्या वेळाने, तुम्ही मला पहाल, याविषयी एकमेकांना विचारीत आहात काय? मी तुम्हास खरे खरे सांगतो, तुम्ही रडाल आणि शोक कराल, तरी जग आनंद करील. तुम्हास दुःख होईल, पण तुमचे दुःखच तुमचा आनंद होईल. स्त्री प्रसूत होते तेव्हा तिला वेदनांचे दुःख होते, कारण तिची प्रसूतीची घटका आलेली असते; पण बालक जन्मल्यावर जगात एक मनुष्य जन्मल्याचा जो आनंद होतो त्यामुळे तिला त्या क्लेशाची आठवण होत नाही. आणि म्हणून, आता तुम्हास दुःख झाले आहे; तरी मी तुम्हास पुन्हा भेटेन आणि तुमचे अंतःकरण आनंदित होईल आणि तुमच्यापासून तुमचा आनंद कोणीही हिरावून घेणार नाही. आणि त्यादिवशी तुम्ही मला काही प्रश्न विचारणार नाही. मी तुम्हास खरे खरे सांगतो, तुम्ही पित्याजवळ काही मागाल तर तो ते तुम्हास माझ्या नावाने देईल. तुम्ही अजून माझ्या नावाने काही मागितले नाही; मागा म्हणजे तुम्हास मिळेल, यासाठी की, तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा.

सामायिक करा
योहान 16 वाचा

योहान 16:19-24 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

त्यांना याविषयी काही विचारायचे आहे हे ओळखून येशूंनी त्यांना म्हटले, “मी तुम्हाला जे सांगितले होते, त्याबद्दल तुम्ही एकमेकांना विचारत आहात काय की ‘थोड्या वेळाने तुम्ही मला पाहणार नाही आणि पुन्हा थोड्या वेळाने तुम्ही मला पाहाल.’ मी तुम्हाला निश्चित सांगतो की, जग आनंद करेल पण तुम्ही रडाल व शोक कराल. तुम्ही दुःख कराल परंतु तुमच्या दुःखाचे रूपांतर आनंदात होईल. जी स्त्री बाळाला जन्म देते तिला वेदना होतात कारण तिची वेळ आलेली असते; परंतु जेव्हा तिचे बाळ जन्मास येते तेव्हा ती तिच्या बाळाला या जगात जन्मलेले पाहून आनंद करते व सर्व यातना विसरून जाते. त्याच प्रकारे आता दुःख करण्याची तुमची वेळ आहे, परंतु मी तुम्हाला पुन्हा भेटेन तेव्हा तुमचे हृदय आनंदी होईल आणि तुमचा आनंद तुमच्यापासून कोणीही हिरावून घेणार नाही. त्या दिवशी तुम्ही माझ्याजवळ काही मागणार नाही. मी तुम्हाला खरोखर सांगतो की, तुम्ही जे काही माझ्या नावाने पित्याजवळ मागाल ते तो तुम्हाला देईल. आतापर्यंत तुम्ही माझ्या नावाने काही मागितले नाही. माझ्या नावाने मागा म्हणजे मिळेल आणि तुमचा आनंद पूर्ण होईल.

सामायिक करा
योहान 16 वाचा

योहान 16:19-24 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

आपणाला विचारावे असे त्यांच्या मनात आहे हे ओळखून येशू त्यांना म्हणाला, “‘थोड्या वेळाने मी तुम्हांला दिसणार नाही आणि पुन्हा थोड्या वेळाने तुम्ही मला पाहाल,’ हे जे मी म्हणालो, त्याविषयी तुम्ही एकमेकांना विचारत आहात काय? मी तुम्हांला खचीत खचीत सांगतो, तुम्ही रडाल व शोक कराल तरी जग आनंद करील; तुम्हांला दुःख होईल, तरी तुमचे दुःखच तुमचा आनंद होईल. स्त्री प्रसूत होते तेव्हा तिला वेदनांचे दुःख होते, कारण तिची प्रसूतीची घटका आलेली असते; परंतु बालक जन्मल्यावर मनुष्य जगात जन्मल्याचा जो आनंद होतो त्यामुळे तिला त्या क्लेशांची आठवण होत नाही. ह्याप्रमाणे तुम्हांला आता दुःख झाले आहे; तरी मी तुम्हांला पुन्हा भेटेन, आणि तुमचे अंतःकरण आनंदित होईल व तुमचा आनंद तुमच्यापासून कोणी काढून घेणार नाही. त्या दिवशी तुम्ही मला काही प्रश्‍न विचारणार नाहीत. मी तुम्हांला खचीत खचीत सांगतो, तुम्ही पित्याजवळ काही मागाल तर तो ते तुम्हांला माझ्या नावाने देईल. तुम्ही अजून माझ्या नावाने काही मागितले नाही. मागा म्हणजे तुम्हांला मिळेल, ह्यासाठी की तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा.

सामायिक करा
योहान 16 वाचा

योहान 16:19-24 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

त्याला काही विचारावे असे त्यांच्या मनात आहे, हे ओळखून येशू त्यांना म्हणाला, “थोडा वेळ मी तुम्हांला दिसणार नाही आणि पुन्हा थोड्या वेळाने तुम्ही मला पाहाल, हे जे मी म्हणालो, त्याविषयी तुम्ही एकमेकांना विचारत आहात काय? मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, तुम्ही रडाल व शोक कराल परंतु जग आनंद करील; तुम्हांला दुःख होईल, परंतु तुमचे दुःख तुमचा आनंद होईल. स्त्री प्रसूत होत असताना तिला वेदना होतात कारण तिची प्रसूतीची घटका जवळ आलेली असते. परंतु बालक जन्मल्यावर, जगात एक मानव जन्मला आहे म्हणून तिला जो आनंद होतो, त्यामुळे तिला त्या वेदनांची आठवण होत नाही. ह्याप्रमाणे तुम्हांला आता दुःख झाले तरी मी तुम्हांला पुन्हा पाहीन आणि तुमचे अंतःकरण आनंदित होईल व तुमच्याकडून तुमचा आनंद कोणीही हिरावून घेणार नाही. त्या दिवशी तुम्ही माझ्याकडून काही मागणार नाही. मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, तुम्ही पित्याजवळ माझ्या नावाने काही मागाल तर तो ते तुम्हांला देईल. तुम्ही अजून माझ्या नावाने काही मागितले नाही. मागा म्हणजे तुम्हांला मिळेल, ह्यासाठी की, तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा.

सामायिक करा
योहान 16 वाचा