योहान 16:13-15
योहान 16:13-15 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तरी तो सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो तुम्हांला मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल; कारण तो आपल्या स्वतःचे सांगणार नाही; तर जे काही ऐकेल, तेच सांगेल; आणि होणार्या गोष्टी तुम्हांला कळवील. तो माझा गौरव करील; कारण जे माझे आहे त्यातून घेऊन ते तुम्हांला कळवील. जे काही पित्याचे आहे ते सर्व माझे आहे; म्हणून मी म्हणालो की, जे माझे आहे त्यातून घेऊन ते तुम्हांला कळवील.
योहान 16:13-15 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
पण तो सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो तुम्हास मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल, कारण तो आपल्या स्वतःचे सांगणार नाही; तर जे ऐकेल तेच सांगेल आणि होणार्या गोष्टी तुम्हास कळवील. तो माझे गौरव करील, कारण जे माझे आहे त्यातून घेऊन ते तो तुम्हास कळवील. जे काही स्वर्गीय पित्याचे आहे ते सर्व माझे आहे; म्हणून मी म्हणालो की, जे माझे आहे त्यांतून घेऊन ते तुम्हास कळवील.
योहान 16:13-15 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
परंतु जेव्हा तो, सत्याचा आत्मा येईल, तेव्हा तो तुम्हाला मार्गदर्शन करून पूर्ण सत्यात नेईल, कारण तो आपल्या स्वतःचे काहीही सांगणार नाही; तर त्याने जे काही ऐकले आहे, तेच तुम्हाला सांगेल. तो तुम्हाला जे काही घडणार आहे ते सांगेल. कारण तो माझ्यापासून आहे, म्हणून माझे गौरव करील आणि कारण माझ्यापासून जे त्याला मिळेल ते तो तुम्हाला प्रकट करील. पित्याचे जे सर्व आहे ते माझे आहे. यासाठी मी म्हणालो की आत्मा जे माझ्याकडून स्वीकारेल ते तो घेऊन तुम्हाला प्रकट करील.”
योहान 16:13-15 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
तरी पण सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो तुम्हांला सर्व सत्याविषयी मार्गदर्शन करील. तो आपल्या स्वतःचे सांगणार नाही, तर जे काही तो ऐकेल, तेच सांगेल आणि पुढे येणाऱ्या गोष्टी तुम्हांला कळवील. तो माझा गौरव करील, कारण जे माझे आहे तेच तो तुम्हांला सांगेल. जे काही पित्याचे आहे, ते सर्व माझे आहे, म्हणून मी म्हटले, जे माझे आहे, तेच तो तुम्हांला सांगेल.