योहान 15:12-17
योहान 15:12-17 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
जशी मी तुम्हावर प्रीती केली तशीच तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी अशी माझी आज्ञा आहे. आपल्या मित्रांसाठी आपला जीव द्यावा यापेक्षा कोणाची प्रीती मोठी नाही. मी तुम्हास जे काही सांगतो ते तुम्ही कराल तर तुम्ही माझे मित्र आहात. मी तुम्हास आतापासून दास म्हणत नाही, कारण धनी काय करतो ते दासास कळत नाही; पण मी तुम्हास मित्र म्हणले आहे, कारण मी ज्या गोष्टी पित्याकडून ऐकून घेतल्या त्या सर्व मी तुम्हास कळवल्या आहेत. तुम्ही मला निवडले नाही, तर मी तुम्हास निवडले आणि नेमले आहे; यामध्ये हेतू हा आहे की, तुम्ही जाऊन, फळ द्यावे, तुमचे फळ टिकावे आणि जे काही तुम्ही माझ्या नावाने पित्याजवळ मागाल ते त्याने तुम्हास द्यावे. तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी म्हणून मी तुम्हास या आज्ञा करतो.
योहान 15:12-17 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
माझी आज्ञा ही आहे: मी तुम्हावर प्रीती केली, तशी तुम्हीही एकमेकांवर प्रीती करावी. आपल्या मित्रासाठी स्वतःचे प्राण अर्पण करावे, यापेक्षा कोणतीही प्रीती मोठी नाही. तुम्ही माझ्या आज्ञा पाळल्या, तर तुम्ही माझे मित्र आहात. मी यापुढे तुम्हाला दास म्हणणार नाही, कारण धन्याचे व्यवहार दासाला माहीत नसतात; त्याऐवजी, मी तुम्हाला मित्र म्हटले आहे, कारण जे काही मी आपल्या पित्यापासून शिकून घेतले आहे ते सर्व मी तुम्हाला कळविले आहे. तुम्ही मला निवडले नाही, पण मी तुम्हाला निवडले व तुमची नेमणूक केली, ती यासाठी की तुम्ही जाऊन फळ द्यावे व तुमचे फळ टिकावे—म्हणजे, तुम्ही जे काही माझ्या नावाने पित्याजवळ मागाल ते त्यांनी तुम्हाला द्यावे. ही माझी आज्ञा आहे: तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी.
योहान 15:12-17 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
जशी मी तुमच्यावर प्रीती केली तशी तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी अशी माझी आज्ञा आहे. आपल्या मित्रांकरता आपला प्राण द्यावा ह्यापेक्षा कोणाची प्रीती मोठी नाही. मी तुम्हांला जे काही सांगतो ते तुम्ही कराल तर तुम्ही माझे मित्र आहात. मी आतापासून तुम्हांला दास म्हणत नाही; कारण धनी काय करतो ते दासाला ठाऊक नसते; परंतु मी तुम्हांला मित्र म्हटले आहे; कारण जे काही मी आपल्या पित्यापासून ऐकून घेतले ते सर्व मी तुम्हांला कळवले आहे. तुम्ही मला निवडले नाही, तर मी तुम्हांला निवडले व तुम्हांला नेमले आहे; ह्यात हेतू हा की, तुम्ही जाऊन फळ द्यावे, तुमचे फळ टिकावे आणि जे काही तुम्ही माझ्या नावाने पित्याजवळ मागाल ते त्याने तुम्हांला द्यावे. तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी म्हणून मी तुम्हांला ह्या आज्ञा करतो.
योहान 15:12-17 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
माझी ही आज्ञा आहे, जशी मी तुमच्यावर प्रीती केली, तशी तुम्ही एकमेकांवर प्रीती करा. आपल्या मित्राकरता आपला प्राण द्यावा ह्यापेक्षा मोठी प्रीती नाही. तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर तुम्ही माझे मित्र आहात. मी आतापासून तुम्हांला दास म्हणत नाही कारण धनी काय करतो ते दासाला ठाऊक नसते. परंतु मी तुम्हांला मित्र म्हटले आहे, कारण जे काही मी माझ्या पित्याकडून ऐक ले, ते सर्व मी तुम्हांला सांगितले आहे. तुम्ही मला निवडले नाही तर मी तुम्हांला निवडले आहे व तुम्हांला नेमले आहे, म्हणजे तुम्ही जावे. विपुल फळ द्यावे. तुमचे फळ टिकावे आणि जे काही तुम्ही माझ्या नावाने पित्याजवळ मागाल, ते त्याने तुम्हांला द्यावे. तुम्ही एकमेकांवर प्रीती करा, ही माझी तुम्हांला आज्ञा आहे.