YouVersion लोगो
सर्च आयकॉन

योहान 14:8-11

योहान 14:8-11 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

फिलिप्प, त्यास म्हणाला, “प्रभूजी, आम्हास पिता दाखवा, म्हणजे आम्हास तेवढे पुरे आहे.” येशूने त्यास म्हटलेः “फिलिप्पा, मी इतका काळ तुम्हाजवळ असूनही तू मला ओळखीत नाहीस काय? ज्याने मला पाहिले आहे त्याने पित्याला पाहिले आहे; तर ‘आम्हास पिता दाखवा’ असे तू कसे म्हणतोस? मी पित्यामध्ये व पिता माझ्यामध्ये आहे, असा विश्वास तू धरीत नाहीस काय? ज्या गोष्टी मी तुम्हास सांगतो, त्या मी आपल्या मनाच्या सांगत नाही; माझ्यामध्ये राहणारा पिता स्वतःची कामे करतो. मी पित्यामध्ये व पिता माझ्यामध्ये आहे यावर तुम्ही विश्वास ठेवा; नाही तर माझ्या कृत्यांमुळे तरी माझ्यावर विश्वास ठेवा.

सामायिक करा
योहान 14 वाचा

योहान 14:8-11 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

फिलिप्प म्हणाला, “प्रभुजी, आम्हाला पिता दाखवा म्हणजे पुरे आहे.” येशूंनी उत्तर दिले: “फिलिप्पा, मी इतका काळ तुम्हाजवळ असूनही तू मला ओळखत नाही काय? ज्याने मला पाहिले आहे, त्याने पित्यालाही पाहिले आहे. तर मग, ‘पिता दाखवा असे तू कसे म्हणतोस’? मी पित्यामध्ये आहे व पिता मजमध्ये आहे, यावर तुझा विश्वास नाही काय? जी वचने मी तुला सांगतो, ते मी माझ्या स्वतःच्या अधिकाराने सांगत नाही. खरेतर, माझ्यामध्ये वसणारा पिताच हे कार्य करीत आहे. फक्त विश्वास ठेवा की मी पित्यामध्ये आहे आणि पिता मजमध्ये आहे; अथवा प्रत्यक्ष कार्याच्या पुराव्यावर तरी विश्वास ठेवा.

सामायिक करा
योहान 14 वाचा

योहान 14:8-11 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

फिलिप्प त्याला म्हणाला, “प्रभूजी, आम्हांला पिता दाखवा म्हणजे आम्हांला पुरे आहे.” येशूने त्याला म्हटले : “फिलिप्पा, मी इतका काळ तुमच्याजवळ असूनही तू मला ओळखत नाहीस काय? ज्याने मला पाहिले आहे त्याने पित्याला पाहिले आहे; तर ‘आम्हांला पिता दाखवा’ असे तू कसे म्हणतोस? मी पित्यामध्ये व पिता माझ्यामध्ये आहे असा विश्वास तू धरत नाहीस काय? ज्या गोष्टी मी तुम्हांला सांगतो त्या मी आपल्या मनाच्या सांगत नाही; माझ्यामध्ये राहणारा पिता स्वतःची कार्ये करतो. मी पित्यामध्ये व पिता माझ्यामध्ये आहे हे माझे तुम्ही खरे माना; नाहीतर माझ्या कृत्यांमुळे तरी माझे खरे माना.

सामायिक करा
योहान 14 वाचा

योहान 14:8-11 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

फिलिप त्याला म्हणाला, “प्रभो, आम्हांला पिता दाखवा म्हणजे आम्हांला तेवढे पुरे आहे.” येशूने उत्तर दिले, “फिलिप, मी इतका दीर्घकाळ तुमच्याबरोबर असून तू मला अजूनही ओळखत नाहीस? ज्याने मला पाहिले आहे, त्याने पित्याला पाहिले आहे, तर आम्हांला पिता दाखवा, असे तू का म्हणतोस? मी पित्यामध्ये आहे व पिता माझ्यामध्ये आहे, असा विश्वास तू ठेवत नाहीस का? जे काही मी तुम्हांला सांगतो, ते मी स्वतःचे सांगत नाही. माझ्यामध्ये राहणारा पिता स्वतःचे कार्य करतो. माझ्यावर विश्‍वास ठेवा. मी पित्यामध्ये आहे व पिता माझ्यामध्ये आहे. नाही तर माझ्या कृत्यांमुळे तरी माझ्यावर विश्‍वास ठेवा.

सामायिक करा
योहान 14 वाचा