योहान 14:5-7
योहान 14:5-7 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
थोमा त्याला म्हणाला, “प्रभूजी, आपण कोठे जाता हे आम्हांला ठाऊक नाही; मग मार्ग आम्हांला कसा ठाऊक असणार?” येशूने त्याला म्हटले, “मार्ग, सत्य व जीवन मीच आहे; माझ्या द्वारे आल्यावाचून पित्याकडे कोणी येत नाही. मी कोण आहे हे तुम्ही ओळखले असते तर माझ्या पित्यालाही ओळखले असते; आतापासून तुम्ही त्याला ओळखता व तुम्ही त्याला पाहिलेही आहे.”
योहान 14:5-7 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
थोमा त्यास म्हणाला, “प्रभूजी, आपण कोठे जाता हे आम्हास माहीत नाही; मग मार्ग आम्हास कसा माहीत असणार?” येशूने त्यास म्हटले, “मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्याशिवाय पित्याकडे कोणी येत नाही. मी कोण आहे हे तुम्ही ओळखले असते तर माझ्या पित्यालाही ओळखले असते. आतापासून पुढे तुम्ही त्यास ओळखता आणि तुम्ही त्यास पाहिलेही आहे.”
योहान 14:5-7 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
थोमा त्यांना म्हणाला, “प्रभुजी, आपण कोठे जात आहात, हे आम्हास माहीत नाही, तर मार्ग आम्हास कसा माहीत असणार?” येशूंनी उत्तर दिले, “मार्ग आणि सत्य आणि जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्याशिवाय पित्याकडे कोणीही येऊ शकत नाही. जर तुम्ही मला खरोखर ओळखले असते, तर माझ्या पित्यालाही ओळखले असते. आता यापुढे तुम्ही त्यांना ओळखता व त्यांना पाहिलेही आहे.”
योहान 14:5-7 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
थोमा त्याला म्हणाला, “प्रभो, आपण कोठे जाता हे आम्हांला ठाऊक नाही, मग आम्हांला मार्ग कसा ठाऊक असणार?” येशूने त्याला म्हटले, “मी मार्ग, सत्य व जीवन आहे. माझ्याद्वारे आल्याशिवाय पित्याकडे कोणी येत नाही. मी कोण आहे, हे ज्याअर्थी आता तुम्ही ओळखले आहे, त्याअर्थी तुम्ही माझ्या पित्यालाही ओळखाल आणि आतापासून पुढे तुम्ही त्याला ओळखता व तुम्ही त्याला पाहिलेही आहे.”