योहान 14:4-6
योहान 14:4-6 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मी जातो तिकडचा मार्ग तुम्हास माहीत आहे.” थोमा त्यास म्हणाला, “प्रभूजी, आपण कोठे जाता हे आम्हास माहीत नाही; मग मार्ग आम्हास कसा माहीत असणार?” येशूने त्यास म्हटले, “मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्याशिवाय पित्याकडे कोणी येत नाही.
योहान 14:4-6 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मी ज्या ठिकाणी जाणार आहे, तिथे जाण्याचा मार्ग तुम्हाला ठाऊक आहे.” थोमा त्यांना म्हणाला, “प्रभूजी, आपण कुठे जात आहात हे आम्हास माहीत नाही, तर मार्ग आम्हास कसा माहीत असणार?” येशूंनी उत्तर दिले, “मार्ग आणि सत्य आणि जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्याशिवाय पित्याकडे कोणीही येऊ शकत नाही.
योहान 14:4-6 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मी जातो तिकडचा मार्ग तुम्हांला ठाऊक आहे.” थोमा त्याला म्हणाला, “प्रभूजी, आपण कोठे जाता हे आम्हांला ठाऊक नाही; मग मार्ग आम्हांला कसा ठाऊक असणार?” येशूने त्याला म्हटले, “मार्ग, सत्य व जीवन मीच आहे; माझ्या द्वारे आल्यावाचून पित्याकडे कोणी येत नाही.
योहान 14:4-6 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
मी जातो तिकडचा मार्ग तुम्हांला ठाऊक आहे.” थोमा त्याला म्हणाला, “प्रभो, आपण कोठे जाता हे आम्हांला ठाऊक नाही, मग आम्हांला मार्ग कसा ठाऊक असणार?” येशूने त्याला म्हटले, “मी मार्ग, सत्य व जीवन आहे. माझ्याद्वारे आल्याशिवाय पित्याकडे कोणी येत नाही.