योहान 14:1-13
योहान 14:1-13 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
“तुमचे अंत:करण अस्वस्थ होऊ नये; देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा. माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत; नसत्या तर मी तुम्हांला तसे सांगितले असते; मी तुमच्यासाठी जागा तयार करायला जातो. आणि मी जाऊन तुमच्यासाठी जागा तयार केली म्हणजे पुन्हा येऊन तुम्हांला आपल्याजवळ घेईन; ह्यासाठी की, जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावे. मी जातो तिकडचा मार्ग तुम्हांला ठाऊक आहे.” थोमा त्याला म्हणाला, “प्रभूजी, आपण कोठे जाता हे आम्हांला ठाऊक नाही; मग मार्ग आम्हांला कसा ठाऊक असणार?” येशूने त्याला म्हटले, “मार्ग, सत्य व जीवन मीच आहे; माझ्या द्वारे आल्यावाचून पित्याकडे कोणी येत नाही. मी कोण आहे हे तुम्ही ओळखले असते तर माझ्या पित्यालाही ओळखले असते; आतापासून तुम्ही त्याला ओळखता व तुम्ही त्याला पाहिलेही आहे.” फिलिप्प त्याला म्हणाला, “प्रभूजी, आम्हांला पिता दाखवा म्हणजे आम्हांला पुरे आहे.” येशूने त्याला म्हटले : “फिलिप्पा, मी इतका काळ तुमच्याजवळ असूनही तू मला ओळखत नाहीस काय? ज्याने मला पाहिले आहे त्याने पित्याला पाहिले आहे; तर ‘आम्हांला पिता दाखवा’ असे तू कसे म्हणतोस? मी पित्यामध्ये व पिता माझ्यामध्ये आहे असा विश्वास तू धरत नाहीस काय? ज्या गोष्टी मी तुम्हांला सांगतो त्या मी आपल्या मनाच्या सांगत नाही; माझ्यामध्ये राहणारा पिता स्वतःची कार्ये करतो. मी पित्यामध्ये व पिता माझ्यामध्ये आहे हे माझे तुम्ही खरे माना; नाहीतर माझ्या कृत्यांमुळे तरी माझे खरे माना. मी तुम्हांला खचीत खचीत सांगतो, मी जी कृत्ये करतो, ती माझ्यावर विश्वास ठेवणाराही करील, आणि त्यांपेक्षा मोठी करील, कारण मी पित्याकडे जातो. पुत्राच्या ठायी पित्याचा गौरव व्हावा म्हणून तुम्ही जे काही माझ्या नावाने मागाल ते मी करीन.
योहान 14:1-13 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
“तुमचे अंतःकरण घाबरू देऊ नका; देवावर विश्वास ठेवा, माझ्यावरही विश्वास ठेवा. माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत. नसत्या तर मी तुम्हास तसे सांगितले असते; मी तुमच्यासाठी जागा तयार करावयास जातो आणि, मी जाऊन तुम्हासाठी जागा तयार केली म्हणजे पुन्हा येऊन तुम्हास आपल्याजवळ घेईन; यासाठी जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावे. मी जातो तिकडचा मार्ग तुम्हास माहीत आहे.” थोमा त्यास म्हणाला, “प्रभूजी, आपण कोठे जाता हे आम्हास माहीत नाही; मग मार्ग आम्हास कसा माहीत असणार?” येशूने त्यास म्हटले, “मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्याशिवाय पित्याकडे कोणी येत नाही. मी कोण आहे हे तुम्ही ओळखले असते तर माझ्या पित्यालाही ओळखले असते. आतापासून पुढे तुम्ही त्यास ओळखता आणि तुम्ही त्यास पाहिलेही आहे.” फिलिप्प, त्यास म्हणाला, “प्रभूजी, आम्हास पिता दाखवा, म्हणजे आम्हास तेवढे पुरे आहे.” येशूने त्यास म्हटलेः “फिलिप्पा, मी इतका काळ तुम्हाजवळ असूनही तू मला ओळखीत नाहीस काय? ज्याने मला पाहिले आहे त्याने पित्याला पाहिले आहे; तर ‘आम्हास पिता दाखवा’ असे तू कसे म्हणतोस? मी पित्यामध्ये व पिता माझ्यामध्ये आहे, असा विश्वास तू धरीत नाहीस काय? ज्या गोष्टी मी तुम्हास सांगतो, त्या मी आपल्या मनाच्या सांगत नाही; माझ्यामध्ये राहणारा पिता स्वतःची कामे करतो. मी पित्यामध्ये व पिता माझ्यामध्ये आहे यावर तुम्ही विश्वास ठेवा; नाही तर माझ्या कृत्यांमुळे तरी माझ्यावर विश्वास ठेवा. मी तुम्हास खरे खरे सांगतो, मी जी कामे करतो ती माझ्यावर विश्वास ठेवणाराही करील आणि त्यापेक्षा अधिक मोठी करील, कारण मी पित्याकडे जातो. पुत्राच्या ठायी पित्याचे गौरव व्हावे म्हणून तुम्ही जे काही माझ्या नावाने मागाल ते मी करीन.
योहान 14:1-13 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“तुमची हृदये अस्वस्थ होऊ देऊ नका. तुम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवा; आणि माझ्यावरसुद्धा विश्वास ठेवा. माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या अनेक खोल्या आहेत आणि तसे नसते तर, मी तुमच्यासाठी जागा तयार करण्यासाठी जात आहे असे तुम्हाला सांगितले असते का? आणि जर मी गेलो व तुमच्यासाठी जागा तयार केली की, मी पुन्हा येईन व तुम्हाला बरोबर घेऊन जाईन, म्हणजे जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावे. मी ज्या ठिकाणी जाणार आहे, तेथे जाण्याचा मार्ग तुम्हाला ठाऊक आहे.” थोमा त्यांना म्हणाला, “प्रभुजी, आपण कोठे जात आहात, हे आम्हास माहीत नाही, तर मार्ग आम्हास कसा माहीत असणार?” येशूंनी उत्तर दिले, “मार्ग आणि सत्य आणि जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्याशिवाय पित्याकडे कोणीही येऊ शकत नाही. जर तुम्ही मला खरोखर ओळखले असते, तर माझ्या पित्यालाही ओळखले असते. आता यापुढे तुम्ही त्यांना ओळखता व त्यांना पाहिलेही आहे.” फिलिप्प म्हणाला, “प्रभुजी, आम्हाला पिता दाखवा म्हणजे पुरे आहे.” येशूंनी उत्तर दिले: “फिलिप्पा, मी इतका काळ तुम्हाजवळ असूनही तू मला ओळखत नाही काय? ज्याने मला पाहिले आहे, त्याने पित्यालाही पाहिले आहे. तर मग, ‘पिता दाखवा असे तू कसे म्हणतोस’? मी पित्यामध्ये आहे व पिता मजमध्ये आहे, यावर तुझा विश्वास नाही काय? जी वचने मी तुला सांगतो, ते मी माझ्या स्वतःच्या अधिकाराने सांगत नाही. खरेतर, माझ्यामध्ये वसणारा पिताच हे कार्य करीत आहे. फक्त विश्वास ठेवा की मी पित्यामध्ये आहे आणि पिता मजमध्ये आहे; अथवा प्रत्यक्ष कार्याच्या पुराव्यावर तरी विश्वास ठेवा. मी तुम्हाला निश्चित सांगतो, मी जी कृत्ये करतो ती मजवर विश्वास ठेवणाराही करील, किंबहुना त्यापेक्षाही मोठी करील, कारण मी पित्याकडे जात आहे. आणि तुम्ही जे काही माझ्या नावाने मागाल ते मी करीन, यासाठी की पुत्रामध्ये पित्याचे गौरव व्हावे.
योहान 14:1-13 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
“तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ देऊ नका. देवावर श्रद्धा ठेवा आणि माझ्यावरही श्रद्धा ठेवा. माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या पुष्कळ जागा आहेत. मी तुमच्यासाठी जागा तयार करायला जातो. असे जर नसते तर मी तुम्हांला तसे सांगितले असते. जेथे मी आहे, तेथे तुम्हीही असावे म्हणून मी जाऊन तुमच्यासाठी जागा तयार केली म्हणजे मी पुन्हा येऊन तुम्हांला माझ्याजवळ नेईन. मी जातो तिकडचा मार्ग तुम्हांला ठाऊक आहे.” थोमा त्याला म्हणाला, “प्रभो, आपण कोठे जाता हे आम्हांला ठाऊक नाही, मग आम्हांला मार्ग कसा ठाऊक असणार?” येशूने त्याला म्हटले, “मी मार्ग, सत्य व जीवन आहे. माझ्याद्वारे आल्याशिवाय पित्याकडे कोणी येत नाही. मी कोण आहे, हे ज्याअर्थी आता तुम्ही ओळखले आहे, त्याअर्थी तुम्ही माझ्या पित्यालाही ओळखाल आणि आतापासून पुढे तुम्ही त्याला ओळखता व तुम्ही त्याला पाहिलेही आहे.” फिलिप त्याला म्हणाला, “प्रभो, आम्हांला पिता दाखवा म्हणजे आम्हांला तेवढे पुरे आहे.” येशूने उत्तर दिले, “फिलिप, मी इतका दीर्घकाळ तुमच्याबरोबर असून तू मला अजूनही ओळखत नाहीस? ज्याने मला पाहिले आहे, त्याने पित्याला पाहिले आहे, तर आम्हांला पिता दाखवा, असे तू का म्हणतोस? मी पित्यामध्ये आहे व पिता माझ्यामध्ये आहे, असा विश्वास तू ठेवत नाहीस का? जे काही मी तुम्हांला सांगतो, ते मी स्वतःचे सांगत नाही. माझ्यामध्ये राहणारा पिता स्वतःचे कार्य करतो. माझ्यावर विश्वास ठेवा. मी पित्यामध्ये आहे व पिता माझ्यामध्ये आहे. नाही तर माझ्या कृत्यांमुळे तरी माझ्यावर विश्वास ठेवा. मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, मी जी कृत्ये करतो, ती माझ्यावर विश्वास ठेवणाराही करील आणि त्यांपेक्षाही मोठी कृत्ये करील, कारण मी पित्याकडे जात आहे. तुम्ही जे काही माझ्या नावाने मागाल, ते पुत्राच्या ठायी पित्याचा गौरव व्हावा म्हणून मी करीन.