YouVersion लोगो
सर्च आयकॉन

योहान 13:5-11

योहान 13:5-11 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

त्यानंतर येशू एका गंगाळात पाणी ओतून आणि तो शिष्यांचे पाय धुऊ लागला व कमरेला बांधलेल्या कापडाने पुसू लागला. मग तो शिमोन पेत्राकडे आला, तेव्हा तो त्यास म्हणाला, “प्रभूजी, आपण माझे पाय धुता काय?” येशूने त्यास उत्तर दिले, “मी काय करतो ते तुला आता कळत नाही, पण ते तुला पुढे कळेल.” पेत्र त्यास म्हणाला, “तुम्हास माझे पाय कधीही धुवावयाचे नाहीत.” येशूने त्यास उत्तर दिले, “मी तुला धुतले नाही, तर तुला माझ्याबरोबर वाटा नाही.” शिमोन पेत्र त्यास म्हणाला, “प्रभूजी, माझे केवळ पायच धुऊ नका, तर हात आणि डोकेही धुवा.” येशूने त्यास म्हटले, “ज्याचे स्नान झाले आहे त्यास पायांशिवाय दुसरे काही धुवायची गरज नाही, तर तो सर्वांगी शुद्ध आहे; तुम्ही शुद्ध आहा, पण सगळे जण नाही.” कारण आपणाला विश्वासघाताने शत्रूच्या हाती कोण धरून देणार आहे हे त्यास ठाऊक होते, म्हणून तो म्हणाला, “तुम्ही सगळे जण शुद्ध नाही.”

सामायिक करा
योहान 13 वाचा

योहान 13:5-11 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

त्यानंतर, त्यांनी मोठ्या घंगाळात पाणी ओतले आणि ते आपल्या शिष्यांचे पाय धुऊ लागले आणि आपल्या कमरेभोवती असलेल्या रुमालाने पुसू लागले. ते शिमोन पेत्राकडे आले, तो त्यांना म्हणाला, “प्रभू, तुम्ही माझे पाय धुणार आहात काय?” येशूंनी उत्तर दिले, “मी काय करीत आहे, हे तुला आता कळणार नाही, नंतर पुढे कधी तरी कळेल.” पेत्र म्हणाला, “नाही, मी तुम्हाला माझे पाय कधीही धुऊ देणार नाही.” येशू म्हणाले, “मी तुला धुतले नाही, तर तुला माझ्याबरोबर वाटा नाही.” शिमोन पेत्राने म्हटले, “प्रभू, केवळ माझे पायच नव्हे तर हात व डोके देखील धुवा!” यावर येशू म्हणाले, “ज्यांची आंघोळ झाली आहे त्याला फक्त पाय धुण्याची गरज असते, कारण त्यांचे पूर्ण शरीर स्वच्छ असते. आता तू शुद्ध झाला आहेस, परंतु तुम्ही सर्वच शुद्ध नाही.” आपला विश्वासघात करणारा कोण आहे ते येशूंना माहीत होते आणि म्हणूनच ते म्हणाले, तुम्ही सर्वच शुद्ध नाही.

सामायिक करा
योहान 13 वाचा

योहान 13:5-11 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

मग तो गंगाळात पाणी ओतून शिष्यांचे पाय धुऊ लागला, आणि कंबरेस बांधलेल्या रुमालाने ते पुसू लागला. मग तो शिमोन पेत्राकडे आला, तेव्हा तो त्याला म्हणाला, “प्रभूजी, आपण माझे पाय धुता काय?” येशूने त्याला उत्तर दिले, “मी करतो ते तुला आता कळत नाही; ते तुला पुढे कळेल.” पेत्र त्याला म्हणाला, “तुम्ही माझे पाय कधीही धुवायचे नाहीत.” येशूने त्याला उत्तर दिले, “मी जर तुला धुतले नाही तर माझ्याबरोबर तुला वाटा नाही.” शिमोन पेत्र त्याला म्हणाला, “प्रभूजी, माझे केवळ पाय धुऊ नका, तर हात व डोकेही धुवा.” येशूने त्याला म्हटले, “ज्याचे स्नान झाले आहे त्याला पायांखेरीज दुसरे काही धुण्याची गरज नाही. कारण तो सर्वांगी शुद्ध आहे; आणि तुम्ही शुद्ध आहात, पण सगळे जण नाहीत.” कारण आपणास धरून देणारा इसम त्याला ठाऊक होता; म्हणून तो म्हणाला, ‘तुम्ही सगळे जण शुद्ध नाहीत.’

सामायिक करा
योहान 13 वाचा

योहान 13:5-11 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

नंतर घंगाळात पाणी ओतून तो शिष्यांचे पाय धुऊ लागला आणि कमरेस बांधलेल्या टावेलने पुसू लागला. तो पेत्राकडे आला, तेव्हा पेत्र त्याला म्हणाला, “प्रभो, आपण माझे पाय धुता काय?” येशूने त्याला उत्तर दिले, “मी जे करत आहे ते तुला आता कळणार नाही. ते तुला पुढे कळेल.” पेत्र त्याला म्हणाला, “मी तुम्हांला माझे पाय कधीही धुऊ देणार नाही.” येशूने त्याला उत्तर दिले, “मी तुझे पाय धुतले नाहीत तर तुला माझ्याबरोबर वाटा मिळणार नाही.” पेत्र त्याला म्हणाला, “प्रभो, तसे असेल, तर माझे पायच नव्हे, तर हात व डोकेही धुवा.” येशूने त्याला म्हटले, “ज्याचे स्नान झाले आहे, त्याला पायांखेरीज दुसरे काही धुण्याची गरज नाही, कारण तो सर्वांगी शुद्ध आहे आणि तुम्ही शुद्ध आहात, पण सगळे नाही.” आपला विश्‍वासघात करणारा कोण आहे, हे त्याला अगोदरच ठाऊक होते. म्हणून तो म्हणाला, “तुम्ही शुद्ध आहात, पण सगळे नाही.’

सामायिक करा
योहान 13 वाचा