योहान 13:3-17
योहान 13:3-17 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तेव्हा आपल्या हाती पित्याने अवघे दिले आहे, व आपण देवापासून आलो व देवाकडे जातो हे जाणून भोजन होतेवेळी येशू भोजनावरून उठला, व त्याने आपली बाह्यवस्त्रे काढून ठेवली आणि रुमाल घेऊन कंबरेस बांधला. मग तो गंगाळात पाणी ओतून शिष्यांचे पाय धुऊ लागला, आणि कंबरेस बांधलेल्या रुमालाने ते पुसू लागला. मग तो शिमोन पेत्राकडे आला, तेव्हा तो त्याला म्हणाला, “प्रभूजी, आपण माझे पाय धुता काय?” येशूने त्याला उत्तर दिले, “मी करतो ते तुला आता कळत नाही; ते तुला पुढे कळेल.” पेत्र त्याला म्हणाला, “तुम्ही माझे पाय कधीही धुवायचे नाहीत.” येशूने त्याला उत्तर दिले, “मी जर तुला धुतले नाही तर माझ्याबरोबर तुला वाटा नाही.” शिमोन पेत्र त्याला म्हणाला, “प्रभूजी, माझे केवळ पाय धुऊ नका, तर हात व डोकेही धुवा.” येशूने त्याला म्हटले, “ज्याचे स्नान झाले आहे त्याला पायांखेरीज दुसरे काही धुण्याची गरज नाही. कारण तो सर्वांगी शुद्ध आहे; आणि तुम्ही शुद्ध आहात, पण सगळे जण नाहीत.” कारण आपणास धरून देणारा इसम त्याला ठाऊक होता; म्हणून तो म्हणाला, ‘तुम्ही सगळे जण शुद्ध नाहीत.’ मग त्यांचे पाय धुतल्यावर व आपली वस्त्रे चढवून पुन्हा बसल्यावर त्याने त्यांना म्हटले, “मी तुम्हांला काय केले आहे हे तुम्हांला समजले काय? तुम्ही मला गुरू व प्रभू असे संबोधता आणि ते ठीक बोलता; कारण मी तसा आहेच. म्हणून मी प्रभू व गुरू असूनही जर तुमचे पाय धुतले तर तुम्हीही एकमेकांचे पाय धुतले पाहिजेत. कारण जसे मी तुम्हांला केले तसे तुम्हीही करावे म्हणून मी तुम्हांला कित्ता घालून दिला आहे. मी तुम्हांला खचीत खचीत सांगतो, दास आपल्या धन्यापेक्षा थोर नाही आणि पाठवलेला पाठवणार्यापेक्षा थोर नाही. जर ह्या गोष्टी तुम्हांला समजतात तर त्या केल्याने तुम्ही धन्य आहात.
योहान 13:3-17 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
येशू जाणत होता की, पित्याने त्याच्या हातात सर्व दिले होते आणि तो देवाकडून आला होता व देवाकडे जात होता; येशू भोजनावरून उठला, त्याने आपली बाह्यवस्त्रे एकीकडे ठेवली आणि एक कापड घेऊन आपल्या कमरेला बांधला. त्यानंतर येशू एका गंगाळात पाणी ओतून आणि तो शिष्यांचे पाय धुऊ लागला व कमरेला बांधलेल्या कापडाने पुसू लागला. मग तो शिमोन पेत्राकडे आला, तेव्हा तो त्यास म्हणाला, “प्रभूजी, आपण माझे पाय धुता काय?” येशूने त्यास उत्तर दिले, “मी काय करतो ते तुला आता कळत नाही, पण ते तुला पुढे कळेल.” पेत्र त्यास म्हणाला, “तुम्हास माझे पाय कधीही धुवावयाचे नाहीत.” येशूने त्यास उत्तर दिले, “मी तुला धुतले नाही, तर तुला माझ्याबरोबर वाटा नाही.” शिमोन पेत्र त्यास म्हणाला, “प्रभूजी, माझे केवळ पायच धुऊ नका, तर हात आणि डोकेही धुवा.” येशूने त्यास म्हटले, “ज्याचे स्नान झाले आहे त्यास पायांशिवाय दुसरे काही धुवायची गरज नाही, तर तो सर्वांगी शुद्ध आहे; तुम्ही शुद्ध आहा, पण सगळे जण नाही.” कारण आपणाला विश्वासघाताने शत्रूच्या हाती कोण धरून देणार आहे हे त्यास ठाऊक होते, म्हणून तो म्हणाला, “तुम्ही सगळे जण शुद्ध नाही.” मग त्याने त्यांचे पाय धुतल्यावर आपली बाह्यवस्त्रे घालून व तो पुन्हा खाली बसल्यावर त्यांना म्हणाला, “मी तुम्हास काय केले ते तुम्हास समजले काय? तुम्ही मला ‘गुरू’ आणि ‘प्रभू’ म्हणता आणि ते ठीक म्हणता, कारण मी तसाच आहे. मग मी जर तुमचा प्रभू आणि गुरू असता तुमचे पाय धुतले तर तुम्हीपण एकमेकांचे पाय धुवावेत. कारण मी तुम्हास केले तसे तुम्हीही करावे म्हणून मी तुम्हास उदाहरण दिले आहे. मी तुम्हास खरे खरे सांगतो, दास आपल्या धन्यापेक्षा मोठा नाही; आणि पाठवलेला पाठवणाऱ्यापेक्षा मोठा नाही. या गोष्टी तुम्हास समजतात तर त्याप्रमाणे वागल्याने तर तुम्ही धन्य आहात.
योहान 13:3-17 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
येशूंना माहीत होते की, पित्याने सर्वगोष्टी त्यांच्या सत्तेखाली ठेवल्या आहेत आणि ते परमेश्वरापासून आले आहेत व त्यांच्याकडे परत जाणार आहेत; म्हणून येशू भोजनावरुन उठले आणि आपली बाहेरील वस्त्रे काढून ठेवली आणि रुमाल कमरेस बांधला. त्यानंतर, त्यांनी मोठ्या घंगाळात पाणी ओतले आणि ते आपल्या शिष्यांचे पाय धुऊ लागले आणि आपल्या कमरेभोवती असलेल्या रुमालाने पुसू लागले. ते शिमोन पेत्राकडे आले, तो त्यांना म्हणाला, “प्रभू, तुम्ही माझे पाय धुणार आहात काय?” येशूंनी उत्तर दिले, “मी काय करीत आहे, हे तुला आता कळणार नाही, नंतर पुढे कधी तरी कळेल.” पेत्र म्हणाला, “नाही, मी तुम्हाला माझे पाय कधीही धुऊ देणार नाही.” येशू म्हणाले, “मी तुला धुतले नाही, तर तुला माझ्याबरोबर वाटा नाही.” शिमोन पेत्राने म्हटले, “प्रभू, केवळ माझे पायच नव्हे तर हात व डोके देखील धुवा!” यावर येशू म्हणाले, “ज्यांची आंघोळ झाली आहे त्याला फक्त पाय धुण्याची गरज असते, कारण त्यांचे पूर्ण शरीर स्वच्छ असते. आता तू शुद्ध झाला आहेस, परंतु तुम्ही सर्वच शुद्ध नाही.” आपला विश्वासघात करणारा कोण आहे ते येशूंना माहीत होते आणि म्हणूनच ते म्हणाले, तुम्ही सर्वच शुद्ध नाही. त्यांचे पाय धुतल्यावर त्यांनी कपडे पुन्हा अंगावर घातले आणि आपल्या जागी परत आले व आपल्या शिष्यांना विचारले, “मी तुमच्यासाठी काय केले हे तुम्हाला समजले का? तुम्ही मला ‘गुरुजी’ आणि ‘प्रभुजी’ असे संबोधिता आणि ते खरे आहे, यासाठी की तो मी आहे. आता ज्याअर्थी मी तुमचा प्रभू व गुरू असूनही तुमचे पाय धुतले, तसेच तुम्ही सुद्धा एकमेकांचे पाय धुतले पाहिजेत. जसे मी तुम्हासाठी केले तसे तुम्हीही करावे म्हणून मी तुम्हाला नमुना घालून दिला आहे. मी खरोखर तुम्हाला सांगतो, दास आपल्या धन्यापेक्षा थोर नाही, संदेशवाहक ज्याने त्याला पाठविले त्यापेक्षा मोठा नाही. आता तुम्हाला या गोष्टी समजल्या आहेत, तुम्ही त्याप्रमाणे कराल तर तुम्ही आशीर्वादीत व्हाल.
योहान 13:3-17 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
आपल्या हाती पित्याने सर्व काही दिले आहे व आपण देवाकडून आलो आहोत व देवाकडे जात आहोत हे जाणून रात्रीचे भोजन होत असताना येशू भोजनावरून उठला आणि त्याने आपले बाह्य वस्त्र काढले व एक टावेल घेऊन आपल्या कमरेला बांधला. नंतर घंगाळात पाणी ओतून तो शिष्यांचे पाय धुऊ लागला आणि कमरेस बांधलेल्या टावेलने पुसू लागला. तो पेत्राकडे आला, तेव्हा पेत्र त्याला म्हणाला, “प्रभो, आपण माझे पाय धुता काय?” येशूने त्याला उत्तर दिले, “मी जे करत आहे ते तुला आता कळणार नाही. ते तुला पुढे कळेल.” पेत्र त्याला म्हणाला, “मी तुम्हांला माझे पाय कधीही धुऊ देणार नाही.” येशूने त्याला उत्तर दिले, “मी तुझे पाय धुतले नाहीत तर तुला माझ्याबरोबर वाटा मिळणार नाही.” पेत्र त्याला म्हणाला, “प्रभो, तसे असेल, तर माझे पायच नव्हे, तर हात व डोकेही धुवा.” येशूने त्याला म्हटले, “ज्याचे स्नान झाले आहे, त्याला पायांखेरीज दुसरे काही धुण्याची गरज नाही, कारण तो सर्वांगी शुद्ध आहे आणि तुम्ही शुद्ध आहात, पण सगळे नाही.” आपला विश्वासघात करणारा कोण आहे, हे त्याला अगोदरच ठाऊक होते. म्हणून तो म्हणाला, “तुम्ही शुद्ध आहात, पण सगळे नाही.’ त्यांचे पाय धुतल्यावर व आपले बाह्य वस्त्र चढवून पुन्हा खाली बसल्यावर त्याने त्यांना म्हटले, “मी तुमच्याकरता काय केले, हे तुम्हांला समजले काय? तुम्ही मला गुरू व प्रभू असे संबोधता आणि ते योग्य आहे कारण मी तसा आहे. प्रभू व गुरू असूनही मी तुमचे पाय धुतले. मग तुम्हीही एकमेकांचे पाय धुतले पाहिजेत. जसे मी तुमच्यासाठी केले, तसे तुम्हीही करावे म्हणून मी तुम्हांला कित्ता घालून दिला आहे. मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, दास आपल्या धन्यापेक्षा थोर नाही आणि पाठवलेला पाठवणाऱ्यापेक्षा थोर नाही. जर ह्या गोष्टी तुम्हांला समजल्या, तर त्या केल्याने तुम्ही किती धन्य ठराल!