YouVersion लोगो
सर्च आयकॉन

योहान 13:1-5

योहान 13:1-5 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

वल्हांडण सणापूर्वी असे झाले की, येशूने आता ह्या जगातून पित्याकडे जाण्याची आपली वेळ आली आहे हे जाणून ह्या जगातील स्वकीयांवर त्याचे जे प्रेम होते ते त्याने शेवटपर्यंत केले. शिमोनाचा मुलगा यहूदा इस्कर्योत ह्याच्या मनात त्याला धरून द्यावे असे सैतान घालून चुकला होता. तेव्हा आपल्या हाती पित्याने अवघे दिले आहे, व आपण देवापासून आलो व देवाकडे जातो हे जाणून भोजन होतेवेळी येशू भोजनावरून उठला, व त्याने आपली बाह्यवस्त्रे काढून ठेवली आणि रुमाल घेऊन कंबरेस बांधला. मग तो गंगाळात पाणी ओतून शिष्यांचे पाय धुऊ लागला, आणि कंबरेस बांधलेल्या रुमालाने ते पुसू लागला.

सामायिक करा
योहान 13 वाचा

योहान 13:1-5 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

आता, वल्हांडण सणाअगोदर असे झाले की, येशूने आता या जगांतून पित्याकडे निघून जाण्याची वेळ आली आहे, हे जाणून, या जगातील स्वकीयांवर त्याची जी प्रीती होती, ती त्याने शेवटपर्यंत केली. शिमोनाचा पुत्र यहूदा इस्कार्योत याच्या मनात येशूला विश्वासघाताने शत्रूच्या हाती द्यावे असे सैतानाने आधीच घातले होते. येशू जाणत होता की, पित्याने त्याच्या हातात सर्व दिले होते आणि तो देवाकडून आला होता व देवाकडे जात होता; येशू भोजनावरून उठला, त्याने आपली बाह्यवस्त्रे एकीकडे ठेवली आणि एक कापड घेऊन आपल्या कमरेला बांधला. त्यानंतर येशू एका गंगाळात पाणी ओतून आणि तो शिष्यांचे पाय धुऊ लागला व कमरेला बांधलेल्या कापडाने पुसू लागला.

सामायिक करा
योहान 13 वाचा

योहान 13:1-5 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

वल्हांडण सण सुरू होण्यास थोडा अवधी होता. येशूंना माहीत होते की हे जग सोडून पित्याकडे जाण्याची त्यांची वेळ जवळ आली आहे. जगात जे त्यांचे लोक होते, त्यांच्यावर त्यांनी प्रीती केली, व शेवटपर्यंत प्रीती केली. संध्याकाळचे भोजन चालू असताना, येशूंचा विश्वासघात करावा असा विचार सैतानाने शिमोनाचा पुत्र यहूदा इस्कर्योत, याच्या मनात घातला होता. येशूंना माहीत होते की, पित्याने सर्वगोष्टी त्यांच्या सत्तेखाली ठेवल्या आहेत आणि ते परमेश्वरापासून आले आहेत व त्यांच्याकडे परत जाणार आहेत; म्हणून येशू भोजनावरुन उठले आणि आपली बाहेरील वस्त्रे काढून ठेवली आणि रुमाल कमरेस बांधला. त्यानंतर, त्यांनी मोठ्या घंगाळात पाणी ओतले आणि ते आपल्या शिष्यांचे पाय धुऊ लागले आणि आपल्या कमरेभोवती असलेल्या रुमालाने पुसू लागले.

सामायिक करा
योहान 13 वाचा

योहान 13:1-5 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

ओलांडण सणापूर्वी असे झाले की, ह्या जगातून पित्याकडे जाण्याची आपली वेळ आता आली आहे, हे येशूने ओळखले. ह्या जगातील आप्तजनांवर त्याची जी प्रीती होती ती त्याने शेवटपर्यंत केली. शिमोनचा मुलगा यहुदा इस्कर्योत ह्याच्या मनात येशूचा विश्‍वासघात करावा, असा विचार सैतान आधीच घालून चुकला होता. आपल्या हाती पित्याने सर्व काही दिले आहे व आपण देवाकडून आलो आहोत व देवाकडे जात आहोत हे जाणून रात्रीचे भोजन होत असताना येशू भोजनावरून उठला आणि त्याने आपले बाह्य वस्त्र काढले व एक टावेल घेऊन आपल्या कमरेला बांधला. नंतर घंगाळात पाणी ओतून तो शिष्यांचे पाय धुऊ लागला आणि कमरेस बांधलेल्या टावेलने पुसू लागला.

सामायिक करा
योहान 13 वाचा