योहान 12:47-50
योहान 12:47-50 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
कोणी जर माझी वचने ऐकतो पण ती पाळीत नाही, त्याचा न्याय मी करीत नाही; कारण मी जगाचा न्याय करण्यासाठी नव्हे, तर मी जगाचे तारण करायला आलो आहे. जो माझा अवमान करतो आणि माझी वचने स्वीकारीत नाही त्याचा न्याय करणारे कोणी आहे. जे वचन मी सांगितले, तेच शेवटल्या दिवशी, त्याचा न्याय करील. कारण मी आपल्या मनाचे बोललो नाही, तर मी काय सांगावे आणि काय बोलावे याविषयी ज्या पित्याने मला पाठवले त्यानेच मला आज्ञा दिली आहे. त्याची आज्ञा सार्वकालिक जीवन आहे. हे मला ठाऊक आहे. म्हणून जे काही मी बोलतो ते पित्याने मला सांगितल्याप्रमाणे बोलतो.”
योहान 12:47-50 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“जर कोणी माझी वचने ऐकून ती पाळीत नाही, तर मी त्या व्यक्तिचा न्याय करीत नाही. कारण मी या जगाचा न्याय करण्यासाठी आलो नसून, जगाचे तारण करण्यासाठी आलो आहे. जे मला नाकारतात व माझ्या वचनांचा स्वीकार करीत नाही; त्यांचा न्याय करणारा एक आहे; जी वचने मी बोललो होतो तीच त्यांचा न्याय करतील. कारण मी माझे स्वतःचे बोलत नाही, ज्या पित्याने मला पाठविले, त्यांनी मी काय सांगावे व काय बोलावे याची मला आज्ञा दिली आहे. त्यांच्या आज्ञा सार्वकालिक जीवनाकडे नेणार्या आहेत. यास्तव जे काही मी बोलतो, ते पित्याने मला सांगितल्याप्रमाणे बोलतो.”
योहान 12:47-50 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
आणि जो कोणी माझी वचने ऐकतो पण ती पाळत नाही त्याचा न्याय मी करत नाही; कारण मी जगाचा न्याय करण्यासाठी नव्हे, तर जगाचे तारण करण्यासाठी आलो आहे. जो माझा अव्हेर करतो व माझ्या वचनांचा स्वीकार करत नाही त्याचा न्याय करणारे कोणी आहे; जे वचन मी सांगितले, तेच शेवटल्या दिवशी त्याचा न्याय करील. कारण मी आपल्या मनचे बोललो नाही, तर मी काय सांगावे व काय बोलावे ह्यांविषयी ज्या पित्याने मला पाठवले त्यानेच मला आज्ञा दिली आहे. त्याची आज्ञा सार्वकालिक जीवन आहे हे मला ठाऊक आहे; म्हणून जे काही मी बोलतो ते पित्याने मला सांगितल्याप्रमाणे बोलतो.”
योहान 12:47-50 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
जो माझी वचने ऐकतो पण ती पाळत नाही, त्याचा न्याय मी करत नाही; कारण मी जगाचा न्याय करण्यासाठी नव्हे, तर जगाचे तारण करण्यासाठी आलो आहे. जो माझा अव्हेर करतो व माझ्या वचनांचा स्वीकार करत नाही, त्याचा न्याय करणारा कोणी तरी आहे. जे वचन मी सांगितले, तेच शेवटच्या दिवशी त्याचा न्याय करील. कारण मी माझ्या स्वतःच्या अधिकाराने बोललो नाही, तर मी काय सांगावे व काय बोलावे ह्याविषयी ज्या पित्याने मला पाठवले त्यानेच मला आज्ञा दिली आहे आणि त्याची आज्ञा शाश्वत जीवन आहे, हे मला ठाऊक आहे, म्हणून जे काही मी बोलतो, ते पित्याने मला सांगितल्याप्रमाणे बोलतो.”