योहान 11:47-48
योहान 11:47-48 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग मुख्य याजकांनी व परूश्यांनी सभा भरवून म्हटले, “आपण काय करीत आहो? कारण तो मनुष्य पुष्कळ चमत्कार करीत आहे. आपण त्यास असेच सोडले तर सर्व लोक त्याच्यावर विश्वास ठेवतील; आणि रोमी लोक येऊन आपले स्थान आणि राष्ट्रही हिरावून घेतील.”
योहान 11:47-48 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मग मुख्य याजकांनी व परूश्यांनी न्यायसभा बोलावली. ते विचारू लागले, “आपण काय साध्य केले आहे? या ठिकाणी हा मनुष्य अनेक चिन्हे करीत आहे. जर आपण त्याला असेच करत राहू दिले, तर प्रत्येकजण त्याच्यावर विश्वास ठेवेल आणि रोमी येतील व आपले मंदिर व आपले राष्ट्र दोन्ही ताब्यात घेतील.”
योहान 11:47-48 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
ह्यावरून मुख्य याजकांनी व परूश्यांनी सभा भरवून म्हटले, “आपण काय करत आहोत? कारण तो मनुष्य तर पुष्कळ चिन्हे करतो. आपण त्याला असेच सोडले तर सर्व लोक त्याच्यावर विश्वास ठेवतील आणि रोमी लोक येऊन आपले स्थान व राष्ट्रही हिरावून घेतील.”
योहान 11:47-48 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
तेव्हा मुख्य याजकांनी व परुश्यांनी सभा भरवली आणि म्हटले, “आपण काय करणारआहोत? पाहा, तो मनुष्य पुष्कळ चिन्हे करीत आहे! आपण त्याला असेच सोडले, तर सर्व लोक त्याच्यावर विश्वास ठेवतील आणि रोमन लोक येऊन आपले पवित्र स्थान व राष्ट्रही बळकावतील.”