योहान 11:1-6
योहान 11:1-6 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
बेथानी येथील लाजर नावाचा एक मनुष्य आजारी होता; मरीया व तिची बहीण मार्था ह्या त्याच गावच्या होत्या. ज्या मरीयेने प्रभूला सुगंधी तेल लावले व त्याचे चरण आपल्या केसांनी पुसले तिचा हा, आजारी पडलेला लाजर, भाऊ होता. म्हणून त्या बहिणींनी त्याच्याकडे सांगून पाठवले की, “प्रभूजी, ज्याच्यावर तुमचे प्रेम आहे तो आजारी आहे.” ते ऐकून येशू म्हणाला, “हा आजार मरणासाठी नव्हे तर देवाच्या गौरवार्थ, म्हणजे त्याच्या योगे देवाच्या पुत्राचा गौरव व्हावा ह्यासाठी आहे.” मार्था, तिची बहीण व लाजर ह्यांच्यावर येशूची प्रीती होती. म्हणून, तो आजारी आहे हे त्याने ऐकले तरी तो होता त्या ठिकाणीच आणखी दोन दिवस राहिला.
योहान 11:1-6 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आता बेथानीतील लाजर नावाचा एक मनुष्य आजारी होता. हे मरीया व तिची बहीण मार्था या त्याच गावच्या होत्या. तिने सुवासिक तेल घेऊन प्रभूला लावले व आपल्या केसांनी त्याचे पाय धुतले ती हीच मरीया होती आणि तिचा भाऊ लाजर आजारी होता. म्हणून त्याच्या बहिणींनी येशूला निरोप पाठवून कळवले, “प्रभूजी, बघा, आपण ज्याच्यावर प्रीती करता तो आजारी आहे.” पण ते ऐकून येशू म्हणाला, “हा आजार मरणासाठी नाही पण देवाच्या गौरवासाठी आहे; म्हणजे देवाच्या पुत्राचे त्याच्यायोगे गौरव व्हावे.” आता मरीया व तिची बहीण मार्था आणि लाजर यांच्यावर येशू प्रीती करीत होता. म्हणून तो आजारी आहे हे त्याने ऐकले तरी तो होता त्या ठिकाणीच आणखी दोन दिवस राहिला.
योहान 11:1-6 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
आता लाजर नावाचा एक मनुष्य आजारी होता. तो मरीया व तिची बहीण मार्था यांच्या बेथानी गावाचा होता. ही मरीया, जिचा भाऊ लाजर आजारी होता, तीच ही मरीया जिने प्रभुच्या मस्तकावर बहुमोल सुगंधी तेल ओतले आणि त्यांचे चरण आपल्या केसांनी पुसले होते. तेव्हा या बहिणींनी येशूंना निरोप पाठविला, “प्रभू, ज्यावर तुमची प्रीती आहे तो आजारी आहे.” येशूंनी हा निरोप ऐकला, तेव्हा ते म्हणाले, “या आजाराचा शेवट मृत्यूत होणार नाही. तर परमेश्वराच्या गौरवासाठी होईल आणि त्याद्वारे परमेश्वराच्या पुत्राचेही गौरव होईल.” मार्था आणि तिची बहीण मरीया व लाजर यांच्यावर येशूंची प्रीती होती, तरी लाजर आजारी आहे हे ऐकूनही येशू ज्या ठिकाणी राहत होते, तेथेच अधिक दोन दिवस राहिले.
योहान 11:1-6 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
बेथानी ह्या गावी लाजर नावाचा एक मनुष्य आजारी होता. मरिया व तिची बहीण मार्था ह्यांचे हे गाव होते. हा आजारी पडलेला लाजर ज्या मरियेने प्रभूला सुगंधी तेलाचा अभिषेक केला होता व त्याचे चरण आपल्या केसांनी पुसले होते, तिचा भाऊ होता. त्या बहिणींनी येशूकडे निरोप पाठवला, “प्रभो, तुमचा प्रिय मित्र आजारी आहे.” ते ऐकून येशू म्हणाला, “हा आजार मरणासाठी नव्हे, तर देवाच्या गौरवासाठी आहे, म्हणजे त्यामुळे देवाच्या पुत्राचा गौरव व्हावा.” मार्था, तिची बहीण व लाजर ह्यांच्यावर येशूची प्रीती होती. तो आजारी आहे, हे येशूने ऐकले, तरी तो होता त्याच ठिकाणी आणखी दोन दिवस राहिला.