योहान 10:29-33
योहान 10:29-33 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
पित्याने मला जे दिले ते सर्वांहून मोठे आहे आणि पित्याच्या हातातून ते कोणी हिसकावून घेऊ शकत नाही. मी आणि पिता एक आहोत.” तेव्हा यहूदी लोकांनी त्यास दगडमार करायला पुन्हा दगड उचलले. येशू त्यांना म्हणाला, “मी माझ्या स्वर्गीय पित्याकडची पुष्कळ चांगली कामे तुम्हास दाखवली आहेत. त्या कामांतील कोणत्या कामाकरता तुम्ही मला दगडमार करता?” यहूदी लोकांनी त्यास उत्तर दिले, “आम्ही चांगल्या कामासाठी तुला दगडमार करीत नाही, पण दुर्भाषणासाठी करतो; कारण तू मनुष्य असून स्वतःला देव म्हणवतोस.”
योहान 10:29-33 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
ज्या माझ्या पित्याने ती मला दिली आहेत तो सर्वश्रेष्ठ आहे; कोणीही त्यांना माझ्या पित्याच्या हातातून हिसकून घेऊ शकत नाही. मी आणि माझा पिता एक आहोत.” तेव्हा यहूदी विरोधकांनी त्याला दगडमार करण्यासाठी पुन्हा दगड उचलले, परंतु येशू त्यांना म्हणाले, “मी पित्याद्वारे अनेक चांगली कामे केली आहेत. माझ्या कोणत्या कामामुळे तुम्ही मला दगडमार करीत आहात?” ते म्हणाले, “कोणत्याही चांगल्या कृत्यासाठी आम्ही तुला दगडमार करीत नाही, तर दुर्भाषण केल्याबद्दल. तू एक सामान्य मानव असूनही, स्वतःला परमेश्वर म्हणवितोस म्हणून आम्ही तुला दगडमार करीत आहोत.”
योहान 10:29-33 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
पित्याने मला जे दिले ते सर्वांहून मोठे आहे; आणि पित्याच्या हातातून ते कोणी हिसकून घेऊ शकत नाही. मी आणि पिता एक आहोत.” तेव्हा यहूद्यांनी त्याला दगडमार करायला पुन्हा दगड उचलले. येशू त्यांना म्हणाला, “मी पित्याकडची पुष्कळशी चांगली कृत्ये तुम्हांला दाखवली आहेत. त्यांतून कोणत्या कृत्यामुळे तुम्ही मला दगडमार करता?” यहूद्यांनी त्याला उत्तर दिले, “चांगल्या कृत्यासाठी आम्ही तुम्हांला दगडमार करत नाही, तर दुर्भाषणासाठी; कारण तुम्ही मानव असून स्वतःला देव म्हणवता.”
योहान 10:29-33 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
माझ्या पित्याने मला जे दिले आहे ते सर्वांहून मोठे आहे आणि पित्याच्या हातांतून ते कोणी हिसकावून घेऊ शकत नाही. मी आणि पिता एक आहोत.” तेव्हा यहुदी लोकांनी त्याला मारण्यासाठी पुन्हा दगड उचलले. येशू त्यांना म्हणाला, “पित्याकडची पुष्कळशी चांगली कृत्ये मी तुम्हांला दाखवली आहेत. त्यांतून कोणत्या कृत्यांकरता तुम्ही मला दगड मारत आहात?” त्यांनी त्याला उत्तर दिले, “चांगल्या कृत्यांसाठी आम्ही तुम्हांला दगड मारत नाही, तर दुर्भाषणासाठी! कारण तुम्ही केवळ मानव असून स्वतःला देव म्हणवता.”