YouVersion लोगो
सर्च आयकॉन

योहान 10:11-17

योहान 10:11-17 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

मीच उत्तम मेंढपाळ आहे; उत्तम मेंढपाळ मेंढरांकरता आपला प्राण देतो. जो मेंढपाळ नाही तर मोलकरीच आहे, ज्याची स्वतःची मेंढरे नाहीत तो लांडगा येत असलेला पाहून मेंढरे सोडून पळून जातो आणि लांडगा त्यांच्यावर झडप घालून त्यांची दाणादाण करतो. मोलकरी पळून जातो कारण तो मोलकरीच आहे आणि त्याला मेंढरांची काळजी नाही. मी उत्तम मेंढपाळ आहे; जसा पिता मला ओळखतो व मी पित्याला ओळखतो तसे जे माझे आहेत त्यांना मी ओळखतो व जे माझे आहेत ते मला ओळखतात; आणि मेंढरांसाठी मी आपला प्राण देतो. ह्या मेंढवाड्यातली नाहीत अशी माझी दुसरी मेंढरे आहेत, तीही मला आणली पाहिजेत; ती माझी वाणी ऐकतील; मग एक कळप, एक मेंढपाळ असे होईल. मी आपला प्राण परत घेण्याकरता देतो म्हणून पिता माझ्यावर प्रीती करतो.

सामायिक करा
योहान 10 वाचा

योहान 10:11-17 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

मी उत्तम मेंढपाळ आहे; उत्तम मेंढपाळ मेंढरांकरिता आपला जीव देतो. जो मेंढपाळ नाही तर मोलकरीच आहे आणि ज्याची स्वतःची मेंढरे नाहीत, तो लांडग्याला येत असलेले पाहून मेंढरे सोडून पळून जातो; आणि लांडगा त्यांच्यावर झडप घालून धरतो त्यांची दाणादाण करतो. मोलकरी पळून जातो कारण तो मोलकरीच आहे आणि त्यास मेंढरांची काळजी नाही. मी उत्तम मेंढपाळ आहे; आणि, जसा पिता मला ओळखतो आणि मी पित्याला ओळखतो तसे जे माझे आहेत त्यांना मी ओळखतो आणि जे माझे आहेत ते मला ओळखतात; आणि मी मेंढरांसाठी आपला जीव देतो. या मेंढवाड्यातली नाहीत अशी माझी दुसरी मेंढरे आहेत; तीही मला आणली पाहिजेत आणि ती माझी वाणी ऐकतील. मग एक कळप आणि एक मेंढपाळ असे होईल. मी आपला जीव परत घेण्याकरिता देतो म्हणून पिता माझ्यावर प्रीती करतो.

सामायिक करा
योहान 10 वाचा

योहान 10:11-17 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

“मीच उत्तम मेंढपाळ आहे. उत्तम मेंढपाळ आपल्या मेंढरांकरिता आपला जीव देतो. परंतु भाडेकरू, जो मेंढपाळ नाही, तो लांडगा येताना पाहतो, व मेंढरे तशीच सोडून पळून जातो, मग तो लांडगा त्या कळपावर हल्ला करतो आणि त्यांची पांगापांग होते. तो माणूस पळून जातो कारण तो भाडेकरू असतो आणि त्याला मेंढरांची काहीच काळजी नसते. “मी उत्तम मेंढपाळ आहे; मला माझी मेंढरे माहीत आहेत व माझ्या मेंढरांना मी माहीत आहे जसा माझा पिता मला ओळखतो आणि मी पित्याला ओळखतो आणि मी माझ्या मेंढरांसाठी माझा जीव देतो. माझी आणखी काही मेंढरे आहेत, पण ती या मेंढवाड्यातील नाहीत. त्यांनासुद्धा मी माझ्या मेंढवाड्यात आणलेच पाहिजे. ते सुद्धा माझी वाणी ऐकतील आणि मग एक कळप आणि एक मेंढपाळ असे होईल. पिता मजवर प्रीती करतो याचे कारण हे आहे की, मी आपला जीव देतो, तो केवळ परत घेण्याकरीता देतो

सामायिक करा
योहान 10 वाचा

योहान 10:11-17 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

मी चांगला मेंढपाळ आहे, चांगला मेंढपाळ मेंढरांकरता आपला प्राण देतो. जो मेंढपाळ नसेल व मोलकरी असेल, ज्याची स्वतःची मेंढरे नसतील, तो लांडगा येत असलेला पाहून मेंढरे सोडून पळून जाईल आणि मग लांडगा मेंढरांवर झडप घालून त्यांची दाणादाण उडवील. मोलकरी पळून जाईल कारण तो मोलकरीच असतो आणि त्याला मेंढरांची काळजी नसते. मी चांगला मेंढपाळ आहे. जसे पिता मला ओळखतो व मी पित्याला ओळखतो, तसे जे माझे आहेत त्यांना मी ओळखतो व जे माझे आहेत ते मला ओळखतात आणि मेंढरांसाठी मी माझा प्राण देतो. ह्या मेंढवाड्यातली नाहीत अशी माझी इतर मेंढरे आहेत. तीदेखील मला आणली पाहिजेत, ती माझी वाणी ऐकतील. मग एक कळप, एक मेंढपाळ असे होईल. मी माझा प्राण देतो तो पुन्हा परत घेण्याकरता, म्हणून पिता माझ्यावर प्रीती करतो.

सामायिक करा
योहान 10 वाचा

योहान 10:11-17

योहान 10:11-17 MARVBSIयोहान 10:11-17 MARVBSIयोहान 10:11-17 MARVBSI
सामायिक करा
पूर्ण धडा वाचा