यिर्मया 52:28-30
यिर्मया 52:28-30 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
नबुखद्रेस्सराने जे लोक पकडून नेले ते हे : सातव्या वर्षी तीन हजार तेवीस यहूदी नेले. नबुखद्रेस्सराच्या कारकिर्दीच्या अठराव्या वर्षी यरुशलेमेहून आठशे बत्तीस माणसे नेली. नबुखद्रेस्सराच्या कारकिर्दीच्या तेविसाव्या वर्षी गारद्यांचा नायक नबूजरदान ह्याने सातशे पंचेचाळीस यहूद्यांना पकडून नेले; एकंदर चार हजार सहाशे लोकांना नेण्यात आले.
यिर्मया 52:28-30 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
नबुखद्नेस्सराने ज्या कोणी लोकांस हद्दपार केले होते ते हेः सातव्या वर्षी तीन हजार तेवीस यहूदी गेले. नबुखद्नेस्सराच्या अठराव्या वर्षी त्याने आठशे बत्तीस लोकांस यरूशलेमेमधून नेले. नबुखद्नेस्सराच्या राजाच्या तेविसाव्या वर्षी गारद्यांचा अंगरक्षक नबूजरदान याने यहूदातले सातशे पंचेचाळीस लोक हद्दपार केले. सर्व हद्दपार लोक मिळून चार हजार सहाशे होते.
यिर्मया 52:28-30 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरने बंदिवासात नेलेल्या लोकांची संख्या अशी: सातव्या वर्षी, 3,023 यहूदी; बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरच्या अठराव्या वर्षी, 832 लोक यरुशलेममधून; नबुखद्नेस्सरच्या तेविसाव्या वर्षी, पहारेकऱ्यांचा नायक नबुजरदान याने 745 यहूदी लोक बाबेलला नेले.