यिर्मया 51:59-64
यिर्मया 51:59-64 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
यहूदाचा राजा सिद्कीया आपल्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षी बाबेलास गेला, त्याच्याबरोबर सराया बिन नेरीया बिन मासेया गेला होता. त्याला यिर्मया संदेष्ट्याने जे आज्ञावचन सांगितले ते हे. सराया बिनीवाला सरदार होता. बाबेलवर जे सर्व अरिष्ट येणार होते ते म्हणजे बाबेलविरुद्ध जी वचने लिहिण्यात आली होती ती यिर्मयाने एका ग्रंथात लिहून ठेवली होती. यिर्मया सरायास म्हणाला, “तू बाबेलास पोहचलास म्हणजे ही सर्व वचने अवश्य वाच; आणि म्हण, ‘हे परमेश्वरा, तू ह्या स्थानाविषयी म्हणाला आहेस की ते नष्ट होईल, त्यात कोणी मनुष्य अथवा पशू राहणार नाही, ते कायमचे ओसाड होईल.’ मग तू हा ग्रंथ वाचण्याचे संपवल्यावर त्याला एक धोंडा बांधून फरात नदीत तो फेकून दे; असे करून म्हण की, ‘ह्याच प्रकारे मी बाबेलवर जे अरिष्ट आणणार त्यामुळे तो बुडेल, वर येणार नाही; ते व्यर्थ शिणतील.”’ येथवर यिर्मयाची वचने आहेत.
यिर्मया 51:59-64 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
महसेयाचा मुलगा नेरीया याचा मुलगा सारया हा जेव्हा यहूदाचा राजा सिद्कीया ह्याच्याबरोबर त्याच्या राज्याच्या चौथ्या वर्षी, बाबेलास गेला तेव्हा जे वचन यिर्मया संदेष्ट्याने त्यास आज्ञापिले ते हे. कारण सराया हा प्रमुख अधिकारी होता. यिर्मयाने बाबेलावर जे सर्व अरिष्ट येणार होते ते म्हणजे बाबेलाविषयीची ही सर्व वचने एका गुंडाळीवर लिहिली होती. यिर्मया सरायाला म्हणाला, “जेव्हा, तू बाबेलास जाशील तेव्हा ही सर्व वचने वाचण्याची खात्री करून घे. आणि म्हण, ‘हे परमेश्वरा, तू स्वतः या स्थानाविषयी बोलला आहेस की, ते नष्ट होईल. मग तेथे कोणी रहिवासी किंवा लोक व पशू राहणार नाहीत. ती कायमची टाकाऊ होईल.’ मग जेव्हा ही गुंडाळी वाचून संपताच त्यास एक दगड बांध आणि फरात नदीमध्ये फेकून दे. म्हण ‘बाबेल याप्रमाणे बुडेल. जे अरिष्ट मी तिच्याविरूद्ध पाठवणार आहे त्यामुळे ती कधीही वर येणार नाही आणि ते थकून जातील.” येथे यिर्मयाची वचने संपली.
यिर्मया 51:59-64 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
सिद्कीयाहच्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षी जेव्हा यिर्मयाह संदेष्ट्याने यहूदीयाचा राजा सिद्कीयाहसह बाबेलला गेला, तेव्हा त्याने सेरायाहस, जो नेरीयाहचा पुत्र, जो महसेयाहचा नातू, तो सैन्यात दुय्यम दर्जाचा एक अधिकारी होता त्याला हा संदेश दिला. बाबेलवर जी भयंकर अरिष्टे येणार होती, ती यिर्मयाहने एका गुंडाळीवर लिहिली—बाबेलवर येणाऱ्या सर्व अरिष्टांची नोंद करून ठेवण्यात आली होती. यिर्मयाह सेरायाहाला म्हणाला, “तू बाबिलोन येथे गेल्यावर मी लिहिलेले सर्व मोठ्याने वाच. मग म्हण, ‘हे याहवेह, तुम्ही म्हटले की तुम्ही बाबेलचा नाश कराल व तिथे कोणीही मनुष्य वा पशूप्राणी वसती करणार नाही; ती कायमची ओसाड होईल.’ मग तू ही गुंडाळी वाचून संपवलीस की तिला एक दगड बांधून ती फरात नदीत फेकून दे. आणि म्हण, ‘बाबेलही अशीच बुडेल व पुन्हा कधीही वर येणार नाही, कारण मी तिच्यावर अरिष्ट आणणार आहे, आणि तिच्यामधील लोक पडतील.’ ” इथे यिर्मयाहच्या संदेशाचा शेवट होतो.