यिर्मया 33:10-11
यिर्मया 33:10-11 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
परमेश्वर असे म्हणतो, या स्थानाविषयी तुम्ही आता म्हणता की हे ओसाड आहे. तेथे यहूद्याच्या नगरात कोणी माणसे व प्राणी नाहीत आणि यरूशलेमेचे रस्ते निर्जन झाले आहेत, माणसे व पशू नाहीत. तेथे पुन्हा आनंद व हर्षाचा शब्द ऐकू येईल. नवऱ्याची व नवरीची वाणी ऐकू येईल, कारण परमेश्वर चांगला आहे. त्याची दया सर्वकाळची आहे. असे म्हणून जे परमेश्वराच्या मंदिरात उपकारस्तुतीचे अर्पण आणतील त्यांचा आवाज पुन्हा ऐकू येईल. कारण मी देशाचा बंदिवास परत उलटवून सुरुवातीला जसे होते तसे करीन, असे परमेश्वर म्हणतो.
यिर्मया 33:10-11 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“याहवेह असे म्हणतात: ‘या नगराविषयी तुम्ही म्हणता, “हे उद्ध्वस्त झालेले ठिकाण आहे, इथे ना लोक राहतात ना पशू.” तरी देखील वैराण झालेल्या यहूदीयाच्या नगरात व यरुशलेमच्या रस्त्यांवर पुन्हा ते स्वर ऐकू येतील. आनंद व हर्षाचे स्वर, वरांचे आणि वधूंचे आवाज आणि याहवेहला उपकारस्तुतीची अर्पणे आणणार्यांची हर्षगीते पुन्हा ऐकू येतील. ते म्हणतील, “याहवेहला धन्यवाद द्या, कारण ते चांगले आहेत; त्यांची प्रीती सर्वकाळ टिकते.” मी हा देश आधी होती तशी समृद्धी परत देऊन पुनर्वसित करेन,’ याहवेह असे म्हणतात.
यिर्मया 33:10-11 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
परमेश्वर म्हणतो, ह्या स्थलाविषयी तुम्ही म्हणता की, ‘हे ओसाड आहे, ह्यात माणसे व पशू ह्यांचा मागमूस नाही; यहूदाची नगरे व यरुशलेमेचे रस्ते उद्ध्वस्त झाले आहेत, त्यांत माणसे, रहिवासी व पशू ह्यांचे नाव नाही;’ त्यांत आनंद व हर्ष ह्यांचा ध्वनी होईल, नवर्याची व नवरीची वाणी ऐकू येईल; ‘सेनाधीश परमेश्वराची स्तुती असो, कारण परमेश्वर चांगला आहे, त्याची दया सर्वकाळची आहे,’ असे म्हणून जे परमेश्वराच्या मंदिरात स्तुत्यर्पणे आणतात त्यांचा शब्द पुन्हा ऐकू येईल. कारण मी देशाचा बंदिवास उलटवून आरंभी होते तसे सर्वकाही करीन, असे परमेश्वर म्हणतो.