YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यिर्मया 33:1-6

यिर्मया 33:1-6 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

नंतर यिर्मया पहारेकऱ्यांच्या अंगणात अजूनही बंदीस्त असता त्याच्याकडे दुसऱ्यांदा परमेश्वराचे वचन आले. ते म्हणाले, परमेश्वर जो हे करतो, परमेश्वर जो हे स्थापित करण्यासाठी योजितो, परमेश्वर हे त्याचे नाव आहे, तो असे म्हणतो, मला हाक मार आणि मी तुला उत्तर देईन. ज्या तुला समजत नाही अशा महान, गहन गोष्टी मी तुला दाखवीन. कारण परमेश्वर, इस्राएलाचा देव, नगराची घरे व यहूदाच्या राजाची घरे वेढ्याच्या उतरंडीमुळे व तलवारीमुळे पडले आहे याविषयी म्हणत आहे. खास्दी लढाईस येत असताना ज्या लोकांस मी आपल्या क्रोधाने आणि कोपाने ठार केले तेव्हा त्यांच्या सर्व दुष्टतेमुळे मी आपले मुख या नगरापासून लपविले आहे त्यांच्या मृतदेहाने जी घरे भरली. पण पाहा, मी या नगराला आरोग्य आणि उपचार आणून देईन. कारण मी त्यांना बरे करीन आणि शांतीची व सत्यतेची विपुलता त्यांना देईन.

सामायिक करा
यिर्मया 33 वाचा

यिर्मया 33:1-6 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

यिर्मया पहारेकर्‍यांच्या चौकात अजून बंदीत असता परमेश्वराचे वचन त्याला दुसर्‍यांदा प्राप्त झाले की, “हे करणारा परमेश्वर, हे घडवून स्थापणारा परमेश्वर, परमेश्वर हे नाम धारण करणारा तुला म्हणतो की, मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन व तुला ठाऊक नाहीत अशा मोठ्या व गहन गोष्टी तुला सांगेन. ह्या शहराची घरे व यहूदाच्या राजांची घरे मोर्चे व तलवार ह्यांच्या निवारणार्थ मोडून टाकली आहेत, त्यांविषयी परमेश्वर इस्राएलाचा देव म्हणतो, ज्यांना मी आपल्या क्रोधाने व संतापाने वधले व ज्यांच्या सगळ्या दुष्टतेमुळे मी ह्या नगरापासून आपले मुख लपवले त्यांनी खास्द्यांबरोबर युद्ध करताना ती घरे त्यांच्या प्रेतांनी भरून टाकली. तर पाहा, मी ह्या नगरास आरोग्याचे उपचार करीन, त्या लोकांना बरे करीन, आणि शांती व सत्य ह्यांचे वैपुल्य त्यांच्या ठायी प्रकट करीन.

सामायिक करा
यिर्मया 33 वाचा