YouVersion लोगो
सर्च आयकॉन

शास्ते 6:25-40

शास्ते 6:25-40 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

त्याच रात्री परमेश्वराने गिदोनाला म्हटले, “आपल्या बापाचा गोर्‍हा म्हणजे दुसरा गोर्‍हा जो सात वर्षांचा आहे तो घे; तुझ्या बापाची बआल देवाची वेदी पाडून टाक व तिच्याजवळ असलेली अशेरा मूर्ती तोडून टाक. मग त्या खडकाच्या उच्चभागी आपला देव परमेश्वर ह्याच्यासाठी विहित केलेल्या पद्धतीप्रमाणे वेदी बांध आणि तू फोडलेल्या अशेरा मूर्तीची लाकडे तिच्यावर ठेवून त्यावर त्या दुसर्‍या गोर्‍ह्याचे हवन कर.” गिदोनाने आपल्याबरोबर आपल्या नोकरांपैकी दहा जणांना घेऊन परमेश्वराने त्याला सांगितल्याप्रमाणे केले, पण आपल्या बापाचे घराणे व नगरचे लोक ह्यांच्या भीतीने ते काम दिवसा न करता त्याने ते रात्री केले. नगरवासी मोठ्या पहाटेस उठून पाहतात तर बआल देवाची वेदी मोडून पडली आहे आणि तिच्याजवळ असलेली अशेरा मूर्ती तोडून टाकलेली आहे आणि तो दुसरा गोर्‍हा नवीन बांधलेल्या वेदीवर अर्पण केला आहे. ते एकमेकांना विचारू लागले, “हे काम कोणी केले असावे?” विचारपूस व बारीक चौकशी केल्यावर ते म्हणाले, “हे काम योवाशाचा मुलगा गिदोन ह्याचेच आहे.” मग नगरवासी योवाशाला म्हणू लागले, “तुझ्या मुलाला बाहेर आण; त्याला मारून टाकायचे आहे, कारण त्याने बआल देवाची वेदी पाडून टाकली आहे आणि तिच्याजवळची अशेरा मूर्ती तोडून टाकली आहे.” तेव्हा योवाश आपल्यावर उठलेल्या सर्वांना म्हणाला, “तुम्ही बआलाची बाजू घेता काय? तुम्ही त्याचा बचाव करू पाहता काय? जो त्याची बाजू घेईल त्याला पहाटेपर्यंत ठार करण्यात येईल; तो जर देव असला तर त्याची वेदी पाडून टाकणार्‍याविरुद्ध त्याने स्वतःची बाजू लढवावी.” म्हणून त्या दिवशी त्याने गिदोनाचे नाव यरुब्बाल (बआलाने बाजू लढवावी) असे ठेवले. तो म्हणाला, “त्याने बआलाची वेदी पाडून टाकली आहे म्हणून बआलाने स्वतः त्याच्याविरुद्ध आपली बाजू लढवावी.” नंतर सर्व मिद्यानी, अमालेकी व पूर्वेकडचे रहिवासी एकत्र जमून यार्देनेपलीकडे गेले व त्यांनी इज्रेलाच्या खोर्‍यात तळ दिला. परमेश्वराच्या आत्म्याने गिदोनाच्या ठायी संचार केला, तेव्हा त्याने रणशिंग फुंकले आणि अबियेजेरी त्याला येऊन मिळाले. आणि त्याने मनश्शेत सर्वत्र जासूद पाठवले तेव्हा तेही त्याला येऊन मिळाले. त्याप्रमाणेच आशेर, जबुलून व नफताली ह्यांच्याकडे त्याने जासूद पाठवले, आणि तेही त्याला येऊन मिळण्यासाठी निघाले. मग गिदोन देवाला म्हणाला, “तू आपल्या वचनाप्रमाणे माझ्या हस्ते इस्राएलाचा उद्धार करणार असलास, तर पाहा, मी ह्या खळ्यात कातरलेली लोकर ठेवतो; रात्री फक्त तिच्यावर दहिवर पडून बाकी सर्व जमीन कोरडी राहिली, तर तुझ्या वचनाप्रमाणे माझ्या हस्ते तू इस्राएलाचा उद्धार करणार आहेस हे मला कळेल.” तसाच प्रकार घडून आला. दुसर्‍या दिवशी पहाटे उठून त्याने ती लोकर दाबून तिच्यातले दहिवर पिळून एक वाटीभर पाणी काढले. मग गिदोन देवाला म्हणाला, “माझ्यावर रागावू नकोस; मला आणखी एकदाच बोलू दे. कृपया ह्या लोकरीने मला आणखी एकदाच प्रतीती पाहू दे. ह्या खेपेस लोकर तेवढी कोरडी राहू दे आणि सार्‍या जमिनीवर दहिवर पडू दे.” त्या रात्री देवाने तसेच केले; म्हणजे ती लोकर मात्र कोरडी राहिली व सगळ्या जमिनीवर दहिवर पडले.

सामायिक करा
शास्ते 6 वाचा

शास्ते 6:25-40 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

आणि असे झाले की, त्याच रात्री परमेश्वराने त्यास सांगितले की, “तू आपल्या पित्याचा गोऱ्हा घे आणि सात वर्षांचा दुसरा गोऱ्हा घे आणि आपल्या बापाची बआल देवासाठीची वेदी ती मोडून टाक आणि तिच्याजवळची अशेरा कापून टाक. मग या खडकाच्या उच्चस्थानी आपला देव परमेश्वर याच्यासाठी वेदी बांध आणि योग्य मार्गाने बांधणी कर. त्या दुसऱ्या गोऱ्ह्याचे होमार्पण, अशेराच्या तोडलेल्या लाकडाचा उपयोग करून कर.” तेव्हा गिदोनाने आपल्या चाकरातील दहा माणसे बरोबर घेऊन जसे परमेश्वराने त्यास सांगितले होते तसे केले; परंतु असे झाले की, दिवस असता ते करायला तो आपल्या वडिलाच्या घराण्याला व त्या नगराच्या मनुष्यांना घाबरला, यास्तव रात्री त्याने केले. मग सकाळी त्या नगराची माणसे उठली तर पाहा, बआलाची वेदी मोडलेली होती तिच्याजवळची अशेराही तोडलेली होते आणि बांधलेल्या वेदीवर दुसऱ्या गोऱ्ह्याचा होम केलेला होता. तेव्हा ते एकमेकांना म्हणाले, “ही गोष्ट कोणी केली? मग त्यांनी विचारपूस व शोध केल्यावर म्हटले, योवाशाचा पुत्र गिदोन, याने ही गोष्ट केली आहे.” नंतर त्या नगराच्या मनुष्यांनी योवाशाला सांगितले, “तू आपल्या पुत्राला बाहेर आण, त्यास तर मारावयाचे आहे, कारण त्याने बआलाची वेदी मोडून टाकली आणखी तिच्याजवळची अशेराची मूर्ती तोडून टाकली आहे.” तेव्हा योवाश आपणावर जे उठले होते त्या सर्वांना म्हणाला, “बआलाचा कैवार तुम्ही घेता काय? तुम्ही त्याचा बचाव करू पाहता काय? जो त्याचा कैवार घेईल तो आज सकाळ आहे तोच मारला जावो; जर तो देव असला तर, ज्याने त्याची वेदी मोडली त्याच्याविरुध्द त्याने स्वत:चा कैवार घ्यावा.” तेव्हा त्याच दिवशी त्याने त्यास “यरूब्बाल” म्हटले, तो म्हणाला, “गिदोनाने बआलाची वेदी पाडून टाकली म्हणून बआलानेच त्याच्याविरुध्द स्वतःचा बचाव करावा,” कारण त्याची वेदी गिदोनाने मोडून वेगळी केली. नंतर सर्व मिद्यानी व अमालेकी व पूर्वेकडले लोक एकत्र जमले, आणि त्यांनी यार्देन नदी ओलांडून येऊन आणि इज्रेलाच्या खोऱ्यात तळ दिला. परंतु परमेश्वराचा आत्मा गिदोनावर त्यास मदत करण्यासाठी आला; गिदोनाने कर्णा फुंकला, तेव्हा अबीयेजेराचे वंशज त्याच्याजवळ अशाप्रकारे त्याच्यामागे जाण्यासाठी एकत्र आले. मग त्याने सगळ्या मनश्शेत जासूद पाठवले तेव्हा तेही त्याच्याजवळ एकत्र झाले; नंतर आशेर व जबुलून व नफतालीत त्याने जासूद पाठवले, तेव्हा ते त्यांच्याशी मिळायला चढून गेले. मग गिदोन देवाला बोलला, “जसे मला सांगितले तसा जर तू माझ्या हाताने इस्राएलांना तारणार असलास; तर पाहा, मी खळ्यात कातरलेली लोकर ठेवतो; जर लोकरीवर मात्र दहिवर पडेल आणि सर्व भूमी कोरडी राहील, तर मला कळेल की जसे मला सांगितले, तसा तू माझ्या हाताने इस्राएलाला तारशील.” नंतर तसे झाले; म्हणजे सकाळी जेव्हा तो उठला, तेव्हा त्याने ती लोकर दाबून तिच्यातून पिळून वाटीभर पाणी काढले. मग गिदोन देवाला बोलला, “तू माझ्यावर रागावू नको, मी आणखी एक वेळेस बोलतो; आता केवळ या वेळेस या लोकरीच्या व्दारे एक वेळ मी परीक्षा पाहतो: ही लोकर तेवढी कोरडी राहून बाकी अवघ्या जमिनीवर दहिवर पडेल असे कर.” तेव्हा त्या रात्री देवाने तसे केले म्हणजे ती लोकर मात्र कोरडी राहिली आणि संपूर्ण भूमीवर दहिवर पडले.

सामायिक करा
शास्ते 6 वाचा

शास्ते 6:25-40 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

त्याच रात्री याहवेहने त्याला म्हटले, “वडिलांच्या कळपातील उत्तम सात वर्षांचा दुसरा गोर्‍हा घे. तुझ्या पित्याची बआल दैवताची वेदी पाडून टाक आणि तिच्याजवळ असणार्‍या अशेरा देवीचा खांब तोडून टाक. नंतर या उंचवट्यावर याहवेह तुमच्या परमेश्वरासाठी योग्य प्रकारची वेदी बांधा. तू तोडलेल्या अशेरा खांबाच्या लाकडाचा वापर करून, होमार्पण म्हणून दुसरा गोर्‍हा अर्पण कर.” यास्तव गिदोनाने आपल्या नोकरांपैकी दहा नोकर बरोबर घेतले आणि याहवेहने आज्ञा केल्याप्रमाणे सर्वकाही केले. परंतु आपल्या पित्याच्या परिवारातील माणसांच्या व गावातील लोकांच्या भीतीने त्याने ते हवन दिवसाच्या ऐवजी रात्री केले. दुसर्‍या दिवशी पहाटेस गाव जागे होऊ लागले, तेव्हा बआल दैवताची वेदी मोडून पडलेली, तिच्याजवळच असलेला अशेराचा खांब नाहीसा झालेला, नवीन वेदी बांधलेली व तिच्यावर दुसर्‍या गोर्‍ह्याचे होमार्पण झालेले दृष्टीस पडले! ते एकमेकांना विचारू लागले, “हे कोणी केले असावे?” शोध घेतल्यावर त्यांना सांगण्यात आले, “योआशाचा पुत्र गिदोनाने ते केले होते.” योआशाला नगरवासी मोठमोठ्याने ओरडून म्हणू लागले, “तुझ्या पुत्राला बाहेर आण; बआल दैवताच्या वेदीचा अपमान केल्याबद्दल व तिच्याजवळील अशेरामूर्ती फोडल्याबद्दल त्याने मेलेच पाहिजे.” परंतु योआशाने त्याच्या आजूबाजूच्या विरोधी जमावाला उत्तर दिले, “तुम्ही बआलची बाजू मांडणार आहात का? तुम्ही त्याला वाचविण्याचा प्रयत्न करत आहात का? जो कोणी त्याच्यासाठी लढेल त्याला सकाळपर्यंत जिवे मारावे! जर बआल खरोखरच देव असता तर, जेव्हा कोणी त्याची वेदी तोडतो तेव्हा तो स्वतःचा बचाव करू शकला असता.” म्हणून गिदोनाने बआल दैवताची वेदी विध्वंस केली, त्या दिवशी त्यांनी त्याला “यरूब्बआल” असे नाव दिले, त्याचा अर्थ, “बआल दैवतानेच त्याचा विरोध करावा,” असा होता. त्यानंतर लवकरच मिद्यानी, अमालेकी आणि इतर पूर्वेकडील शेजारी राष्ट्रांची सैन्ये एकत्रित झाली. त्यांनी यार्देन पार केली व येज्रीलच्या खोर्‍यात तळ दिला. तेव्हा याहवेहचा आत्मा गिदोनावर आला आणि त्याने रणशिंग फुंकले; अबिएजेरी लोक त्याच्याकडे आले. त्याने मनश्शेह, आशेर, जबुलून आणि नफतालीकडे दूत पाठवून त्यांच्या सैन्यांना येण्याचे आव्हान केले व त्या सर्वांनी त्याला साथ दिली. गिदोन परमेश्वराला म्हणाला, “जर तुम्ही इस्राएलला दिलेल्या अभिवचनाप्रमाणे माझ्या हातांनी वाचवाल— पाहा, तर आज रात्री खळ्यात मी लोकर ठेवेन आणि सकाळी लोकर तेवढी दवाने ओली असावी, परंतु सभोवतालची जमीन कोरडी असे आढळून आले, तर मी समजेन की तुम्ही इस्राएलला वाचविण्यासाठी मला मदत कराल.” आणि अगदी तसेच घडून आले. दुसर्‍या दिवशी सकाळी गिदोन उठला; त्याने ती लोकर दाबली आणि तिच्यातील दहिवर पिळले—एक वाटीभर पाणी काढले. नंतर गिदोन परमेश्वराला म्हणाला, “कृपा करून माझ्यावर रागावू नका. मला पुन्हा आणखी एक वेळ विनंती करू द्या. मला पुन्हा एकदा परीक्षा घेऊ द्या, परंतु यावेळी ती लोकर कोरडी असू द्या आणि पूर्ण भूमी दवबिंदूने झाकून टाका.” त्या रात्री परमेश्वराने तसेच केले. त्या रात्री लोकर कोरडी राहिली, परंतु जमीन दहिवराने आच्छादून गेली.