शास्ते 3:7-12
शास्ते 3:7-12 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
इस्राएल लोकांनी परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते केले, आपला देव परमेश्वर ह्याला ते विसरले आणि बआल व अशेरा मूर्तींची उपासना करू लागले; म्हणून इस्राएलावर परमेश्वराचा कोप भडकला आणि त्याने त्यांना अराम-नहराईम राजा कुशन-रिशाथईम ह्याच्या हाती विकत दिले, आणि इस्राएल लोकांनी आठ वर्षेपर्यंत कुशन-रिशाथईम ह्याची सेवा केली. इस्राएल लोकांनी परमेश्वराजवळ मोठ्याने आरोळी केली तेव्हा परमेश्वराने त्यांच्यासाठी कालेबाचा धाकटा भाऊ कनाज ह्याचा मुलगा अथनिएल ह्याला इस्राएल लोकांच्या मदतीला उभे केले आणि त्याने त्यांची सुटका केली. त्याच्यावर परमेश्वराचा आत्मा उतरला व त्याने इस्राएलाचा न्याय केला; तो लढाईला निघाला तेव्हा परमेश्वराने अरामाचा राजा कुशन-रिशाथईम ह्याला त्याच्या हाती दिले व त्याच्यावर त्याचे वर्चस्व झाले, त्यानंतर चाळीस वर्षे देशाला शांतता लाभली मग कनाजाचा मुलगा अथनिएल मृत्यू पावला. पुन्हा इस्राएल लोकांनी देवाच्या दृष्टीने वाईट ते करून आज्ञा मोडली; आणि त्यांनी काय केले ते त्याने पाहिले म्हणून परमेश्वराने मवाबाचा राजा एग्लोन ह्याला इस्राएलावर सबळ केले, कारण इस्राएलांनी जे वाईट ते केले होते हे याप्रकारे परमेश्वराने ते पाहिले होते.
शास्ते 3:7-12 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
इस्राएल लोकांनी परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते केले, आपला देव परमेश्वर ह्याला ते विसरले आणि बआल व अशेरा ह्या मूर्तींची सेवा करू लागले; म्हणून इस्राएलावर परमेश्वराचा कोप भडकला आणि त्याने त्यांना अराम-नहराईमचा राजा कुशन-रिशाथईम ह्याच्या हाती दिले, आणि इस्राएल लोकांनी आठ वर्षेपर्यंत कुशन-रिशाथईम ह्याचे दास्य केले. इस्राएल लोकांनी परमेश्वराचा धावा केला तेव्हा त्याने त्यांच्यासाठी कालेबाचा धाकटा भाऊ कनाज ह्याचा मुलगा अथनिएल ह्याला सोडवणारा म्हणून उभे केले आणि त्याने त्यांची सुटका केली. त्याच्यावर परमेश्वराचा आत्मा उतरला व तो इस्राएलाचा शास्ता झाला; तो लढाईला निघाला तेव्हा परमेश्वराने अरामाचा राजा कुशन-रिशाथईम ह्याला त्याच्या हाती दिले व त्याच्यावर त्याचे वर्चस्व झाले. त्यानंतर चाळीस वर्षे देशाला स्वास्थ्य लाभले. मग कनाजाचा मुलगा अथनिएल मृत्यू पावला. मवाबाच्या हातांतून एहूद इस्राएलांना सोडवतो पुन्हा इस्राएल लोक परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते करू लागले; त्यांनी परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते केले म्हणून परमेश्वराने मवाबाचा राजा एग्लोन ह्याचे इस्राएलावर वर्चस्व स्थापले.