याकोब 5:7-8
याकोब 5:7-8 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
यासाठी बंधूंनो, प्रभूच्या येण्यापर्यंत धीर धरा, लक्षात ठेवा की, शेतकरी आपल्या शेतातील मोलवान पिकाची वाट पाहतो. तो धीराने त्याची वाट पाहतो. पहिला व शेवटचा पाऊस मिळेपर्यंत वाट पाहतो. तुम्हीसुद्धा धीराने वाट पाहिली पाहिजे. तुमचे अंतःकरण बळकट करा कारण प्रभूचे दुसरे आगमन जवळ आले आहे.
याकोब 5:7-8 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
प्रिय बंधुनो आणि भगिनींनो, प्रभुचे आगमन होईपर्यंत धीर धरा. पाहा शेतकरी कसा जमिनीतून निघणार्या मोलवान पिकांची वाट पाहतो. शरद आणि वसंतामध्ये येणार्या पावसाची धीराने वाट पाहतो. तसेच तुम्ही पण, धीर धरा आणि खंबीर उभे राहा, कारण प्रभुचे येणे जवळ आले आहे.
याकोब 5:7-8 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
अहो बंधूंनो, प्रभूच्या आगमनापर्यंत धीर धरा. पाहा, शेतकरी भूमीच्या मोलवान पिकाची वाट पाहत असता, त्याला ‘पहिला व शेवटला पाऊस’ मिळेपर्यंत त्याविषयी तो धीर धरतो. तुम्हीही धीर धरा, आपली अंतःकरणे स्थिर करा, कारण प्रभूच्या आगमनाची वेळ आली आहे.
याकोब 5:7-8 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
अहो बंधूंनो, प्रभूच्या आगमनापर्यंत धीर धरा. पाहा, शेतकरी भूमीच्या मौल्यवान पिकाची वाट पाहत असता, त्याला पहिला व शेवटचा पाऊस मिळेपर्यंत त्याविषयी तो धीर धरतो. तुम्हीही धीर धरा, आपली अंतःकरणे स्थिर करा, कारण प्रभूच्या आगमनाची वेळ जवळ आली आहे.