याकोब 5:10-11
याकोब 5:10-11 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
बंधूंनो, जे संदेष्टे प्रभूच्या नावाने बोलले त्यांचे दु:खसहन व त्यांचा धीर ह्यांविषयीचा कित्ता घ्या. पाहा, ‘ज्यांनी सहन केले त्यांना आपण धन्य म्हणतो.’ तुम्ही ईयोबाच्या धीराविषयी ऐकले आहे, आणि त्याच्याविषयीचा प्रभूचा जो हेतू होता तो तुम्ही पाहिला आहे; ह्यावरून ‘प्रभू फार कनवाळू व दयाळू’ आहे हे तुम्हांला दिसून आले.
याकोब 5:10-11 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
बंधूंनो, जे संदेष्टे प्रभूच्या नावाने बोलले त्यांचे दुःख सहन व धीराविषयी उदाहरण घ्या. त्यांनी दुःखसहन केले म्हणून आपण त्यांना धन्य म्हणतो, हे लक्षात ठेवा. तुम्ही ईयोबाच्या सहनशीलतेविषयी ऐकले आहे आणि प्रभूकडून जो त्याचा शेवट झाला तोसुध्दा पाहिला आहे, तो असा की प्रभू फार दयाळू आणि कनवाळू आहे.
याकोब 5:10-11 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
बंधुनो आणि भगिनींनो, संदेष्टे प्रभुच्या नावाने बोलत असताना त्यांनी सहन केलेले दुःख आणि धीर याचे उदाहरण लक्षात घ्या. तुम्हाला माहीत आहे, ज्यांनी धीर धरला त्यांना आपण आशीर्वादीत म्हणतो. तुम्ही ईयोबाच्या धीराविषयी ऐकले आणि शेवटी प्रभुने त्याला कसे आशीर्वादीत केले हे तुम्ही पाहिले. प्रभू करुणा आणि दया यांनी भरलेला आहे.
याकोब 5:10-11 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
बंधूंनो, जे संदेष्टे प्रभूच्या नावाने बोलले, त्यांचे दु:खसहन व त्यांचा धीर ह्याविषयीचा आदर्श ठेवा. पाहा, ज्यांनी सहन केले त्यांना आपण धन्य म्हणतो. तुम्ही ईयोबच्या धीराविषयी ऐकले आहे आणि त्याच्याविषयीचा प्रभूचा जो हेतू होता, तो तुम्ही पाहिला आहे. ह्यावरून प्रभू फार कनवाळू व दयाळू आहे, हे तुम्हांला दिसून आले.