YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यशया 64:1-4

यशया 64:1-4 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

अहा! जर तू स्वर्ग दुभंगला आणि खाली उतरून आलास! तर पर्वत तुझ्या उपस्थितीत थरथरतील, जसा अग्नी काड्या पेटवतो, जसा अग्नी पाणी उकळवतो तसा तू आपल्या शत्रूंस आपले नाव कळवायला राष्ट्रे तुझ्यापुढे थरथर कापावीत म्हणून तू खाली उतरून आला असता तर किती बरे झाले असते! जेव्हा तू या महान गोष्टी केल्या ज्या आम्हास अपेक्षीत नव्हत्या, तेव्हा तू खाली उतरून आलास, पर्वत तुझ्या समोर भीतीने थरथर कापले. तर जो त्याची आशा धरतो त्याच्यासाठी जे त्याने तयार केले आहे, ते प्राचीन काळापासून कोणीही ऐकलेले किंवा समजले नाही, हे देवा तुझ्याशिवाय कोण्याच्या डोळ्याने ते पाहिले नाही.

सामायिक करा
यशया 64 वाचा

यशया 64:1-4 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

अहा, आकाश विदारून तुम्ही खाली आलात, तर किती बरे झाले असते, तुमच्यासमोर पर्वत थरथर कापले असते! जसा अग्नी शाखांना जाळून भस्म करतो, व ज्यामुळे पाणी उकळले जाते, तुम्ही खाली या व तुमच्या नामाची महती तुमच्या शत्रूंना समजू द्या ज्यामुळे राष्ट्रे तुमच्यासमोर थरथर कापली जातील! जेव्हाही आम्हाला अनपेक्षित असे अत्यंत अद्भुत चमत्कार करण्यास, तुम्ही खाली आले, पर्वतांनी तुम्हाला पाहताच ते भीतीने तुमच्यासमोर डळमळले. प्राचीन युगापासून कोणी कधी ऐकले नाही, कोणत्याही कानावर ते पडले नाही, कोणीही तुमच्याशिवाय इतर कोणताही परमेश्वर कधी पाहिला नाही जो, जे त्यांची आशेने वाट पाहतात, त्यांच्यावतीने कार्य करतात.

सामायिक करा
यशया 64 वाचा