YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यशया 62:1-7

यशया 62:1-7 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

“मी सियोनेकरीता शांत राहणार नाही, आणि यरूशलेमेकरीता तिचा चांगुलपणा तेजस्वी प्रकाशाप्रमाणे चमकेपर्यंत आणि तारण जळत्या मशालीप्रमाणे निघेपर्यंत मी गप्प बसणार नाही.” मग राष्ट्रे तुझा चांगुलपणा पाहतील सर्व राजे तुझी प्रतिष्ठा पाहतील. परमेश्वर तुला जे नवे नाव देईल, त्या नावाने तुला हाक मारतील. तू परमेश्वराच्या हातातील सुंदर मुकुटाप्रमाणे होशील, आणि तुझ्या देवाच्या हातात राजकीय पगडी होशील. यापुढे तुला “त्यागलेली” असे म्हणणार नाहीत, किंवा तुझ्या भूमीला “भयाण” असेही म्हणणार नाही. खरच तुला “माझा आनंद तिच्या ठायी आहे” असे म्हणतील, आणि तुझ्या भूमीला “विवाहित” म्हणतील. कारण परमेश्वराचा आनंद तुझ्यामध्ये आहे, आणि तुझी भूमी विवाहित होईल. जसा तरूण मुलगा तरूणीशी विवाह करतो, त्याचप्रकारे तुझी मुले तुझ्याशी विवाह करतील. जसा वर आपल्या वधूवरुन हर्ष करतो, तसा तुझा देव तुझ्यावरून हर्ष करील. हे यरूशलेमे, तुझ्या वेशीवर मी रखवालदार ठेवला आहे. ते रांत्रदिवस गप्प बसणार नाहीत. जे तुम्ही परमेश्वरास स्मरता, ते तुम्ही शांत बसू नका. यरूशलेमेला पुन:स्थापीपर्यंत आणि पृथ्वीवर तिला प्रशंसनीय करीपर्यंत, त्यास विसावा घेऊ देऊ नका.

सामायिक करा
यशया 62 वाचा

यशया 62:1-7 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

सीयोनेची नीतिमत्ता उदयप्रभेप्रमाणे फाकेपर्यंत तिच्याकरिता मी मौन धरणार नाही, यरुशलेमेचे तारण पेटलेल्या मशालींप्रमाणे दिसेपर्यंत तिच्याकरिता मला चैन पडणार नाही. राष्ट्रे तुझी नीतिमत्ता पाहतील, सर्व राजे तुझे वैभव पाहतील; परमेश्वराच्या मुखाने ठेवलेल्या नव्या नावाने तुला हाक मारतील. तू परमेश्वराच्या हाती शोभायमान मुकुट, आपल्या देवाच्या हाती राजकिरीट होशील. ह्यापुढे तुला सोडलेली म्हणणार नाहीत, ह्यापुढे तुझ्या भूमीला वैराण म्हणणार नाहीत; तर तुला हेफसीबा (ती माझा आनंद) व तुझ्या भूमीला बऊल (विवाहित) म्हणतील; कारण तू परमेश्वराला आनंद देणारी आहेस, तुझी भूमी सधवा होईल. कारण तरुण जसा कुमारीशी विवाह करतो, तशी तुझी मुले तुझ्याशी विवाह करतील, नवरा जसा नवरी पाहून हर्षतो तसा तुझा देव तुला पाहून हर्षेल. हे यरुशलेमा, मी तुझ्या कोटावर पहारेकरी नेमले आहेत; ते रात्रंदिवस उगे राहत नाहीत; अहो परमेश्वराला स्मरण देणार्‍यांनो, तुम्ही स्वस्थ राहू नका; आणि तो यरुशलेम सुस्थित करून ते पृथ्वीला प्रशंसाविषय करीपर्यंत त्याला चैन पडू देऊ नका.

सामायिक करा
यशया 62 वाचा