YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यशया 61:3-7

यशया 61:3-7 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

सियोनेच्या शोक करणाऱ्यांस राखेच्या ऐवजी शोभा, शोकाच्या ठिकाणी आनंदाचे तेल, खिन्न आत्म्याच्या ठिकाणी प्रशंसेचे वस्र नेमून द्यायला त्याने मला पाठवले आहे. आणि त्याचा महिमा व्हावा म्हणून त्यांना न्यायीपणाची वृक्षे, परमेश्वराने लावलेले असे म्हणतील. “ते प्राचीन ओसाड स्थले पुन्हा बांधतील, ते पूर्वी नाश झालेले पुनर्संचयित करतील, ते फार पूर्वीची मोडलेली नगरे, फार वर्षांपूर्वी नाश पावलेली शहरे नव्यासारखी करतील.” परदेशी उभे राहून तुमचे कळप चारतील आणि परदेशीयांची मुले तुमच्या शेतांत आणि द्राक्षमळ्यांत काम करतील. तुला “परमेश्वराचा याजक” आमच्या देवाचा सेवक असे म्हणतील. जगातील सर्व राष्ट्रांची संपत्ती तुम्ही भोगाल आणि ती मिळाल्याबद्दल तुम्हास अभिमान वाटेल. “तुझ्या अपमाना ऐवजी तुला दुप्पट मिळेल, आणि तुझ्या अप्रतिष्ठेच्या ऐवजी ते आपल्या विभागाविषयी आनंद करतील, म्हणून ते आपल्या भूमीत दुप्पट भाग पावतील, सर्वकाळचा आनंद त्याना प्राप्त होईल.”

सामायिक करा
यशया 61 वाचा

यशया 61:3-7 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

सीयोनातील जे सर्व शोक करतात त्यांना— राखेऐवजी सौंदर्याचा मुकुट, विलापाऐवजी आनंदाचे तेल, निराशेच्या आत्म्याऐवजी स्तुतीचे वस्त्र बहाल करण्यासाठी. कारण त्यांचे गौरव प्रकट करण्यासाठी ते नीतिमत्तेचे एला वृक्ष याहवेहने स्वतः रोपलेले असे संबोधले जातील. ते प्राचीन भग्नावशेषाची पुनर्बांधणी करतील फार पूर्वी उद्ध्वस्त झालेल्या शहरांची डागडुजी करतील; ते पुरातन पडीक नगरांचा, जी पिढ्यान् पिढ्या उद्ध्वस्त झाली होती, त्यांचा जीर्णोद्धार करतील. अपरिचित लोक तुमचे कळप राखतील; विदेशी तुमची शेते व द्राक्षमळ्यांची निगा राखतील. तुम्हाला याहवेहचे याजक म्हणतील तुम्ही आमच्या परमेश्वराचे सेवक म्हणून संबोधले जाल. राष्ट्रांच्या संपत्तीतून तुमचे पोषण होईल, व तुम्ही त्यांच्या समृद्धीचा अभिमान बाळगाल. लज्जेच्या ऐवजी तुम्ही दुपटीने सन्मान मिळवाल, आणि अप्रतिष्ठे ऐवजी तुम्हाला तुमच्या वतनात आनंद प्राप्त होईल. आणि तुम्ही दुपटीने तुमच्या वतनभूमीचे वारसदार व्हाल, आणि तुम्ही अनंतकाळचा आनंद प्राप्त कराल.

सामायिक करा
यशया 61 वाचा

यशया 61:3-7 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

सीयोनेतील शोकग्रस्तांना राखेच्या ऐवजी शिरोभूषण घालावे, त्यांना शोकाच्या ऐवजी हर्षरूप तेल द्यावे; खिन्न आत्म्याच्या ऐवजी प्रशंसारूप वस्त्र द्यावे; ते अर्थात अशासाठी की परमेश्वराच्या गौरवार्थ त्यांना नीतिमत्तेचे वृक्ष परमेश्वराने लावलेले रोप म्हणता यावे म्हणून त्याने मला पाठवले आहे. ते पुरातन काळची मोडतोड बांधून काढतील, आपल्या वाडवडिलांच्या वेळची खिंडारे भरून काढतील; उजाड नगरे व पूर्वीच्या पिढ्यांची ओसाड स्थळे पुन्हा वसवतील. परके उभे राहून तुमचे कळप चारतील. परदेशी तुमचे नांगरे व द्राक्षांचे मळे लावणारे होतील. तुम्हांला तर परमेश्वराचे याजक असे नाव पडेल, लोक तुम्हांला आमच्या देवाचे सेवक म्हणतील; राष्ट्रांची संपत्ती तुम्ही भोगाल, त्यांचे वैभव तुम्हांला प्राप्त झाल्याचा अभिमान वाहाल. तुमच्या अप्रतिष्ठेचा मोबदला तुम्हांला दुप्पट मिळेल; आपल्या उपमर्दाबद्दल मिळालेल्या वतनभागानेच ते आनंद पावतील; असे ते आपल्या देशात दुप्पट वतन पावतील; त्यांना सार्वकालिक आनंद प्राप्त होईल.

सामायिक करा
यशया 61 वाचा