यशया 55:9-10
यशया 55:9-10 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
कारण जसे आकाश पृथ्वीपेक्षा उंच आहे तसे माझे मार्ग तुमच्या मार्गाहून आणि माझे विचार तुमच्या विचांरापेक्षा उंच आहेत. कारण जसे पाऊस आणि बर्फ आकाशातून खाली पडतात आणि पुन्हा भूमी भिजवल्याशिवाय आणि उत्पन्न करण्यास व अंकुर व पेरणाऱ्यास बीज आणि खाणाऱ्यास भाकर दिल्याशिवाय आकाशात परत जात नाही.
यशया 55:9-10 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“कारण आकाश पृथ्वीहून जसे उंच आहे, तसे माझे मार्ग तुमच्या मार्गांहून उच्च आहेत आणि माझे विचार तुमच्या विचाराहून उच्च आहेत. आकाशातून पाऊस व हिम ज्याप्रमाणे खाली पडतात आणि पृथ्वीला भिजवून टाकल्याशिवाय परत जात नाहीत आणि तिला अंकुरतात व बहरतात, जेणेकरून पेरणार्यासाठी बीज निपजते व खाणार्याला भाकर मिळते
यशया 55:9-10 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
कारण आकाश जसे पृथ्वीहून उंच आहे, तसे माझे मार्ग तुमच्या मार्गांहून आणि माझ्या कल्पना तुमच्या कल्पनांहून उंच आहेत. पाहा, पाऊस व बर्फ आकाशातून पडतात; आणि पृथ्वी भिजवून, तिला सफळ व हिरवीगार केल्यावाचून, पेरणार्यास बीज, खाणार्यास भाकरी दिल्यावाचून ती परत वर जात नाहीत