यशया 54:5-8
यशया 54:5-8 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
कारण तुझा निर्माणकर्ता तुझा पती आहे; सेनाधीश परमेश्वर हे त्याचे नाम; इस्राएलाचा पवित्र प्रभू तुझा उद्धारकर्ता आहे; त्याला सर्व पृथ्वीचा देव म्हणतात. सोडलेल्या व दुःखित मनाच्या स्त्रीप्रमाणे तुला परमेश्वर बोलावत आहे, तरुणपणी टाकलेल्या स्त्रीप्रमाणे तुला परमेश्वर बोलावत आहे, असे तुझा देव म्हणतो. केवळ क्षणभर मी तुला सोडले, तरी मोठ्या करुणेने मी तुला जवळ करीन. रागाच्या आवेशात मी आपले तोंड तुझ्यापासून क्षणभर लपवले; पण मी तुझ्यावर दया करीन, तुझ्यावर मी सर्वकाळ प्रसन्न राहीन असे तुझा उद्धारकर्ता परमेश्वर म्हणतो.
यशया 54:5-8 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
कारण तुझा निर्माता तुझा पती आहे; त्याचे नाव सेनाधीश परमेश्वर आहे. इस्राएलाचा पवित्र प्रभू तुझा उद्धारक आहे; त्यास सर्व पृथ्वीचा देव असे म्हटले जाईल. कारण तुला त्यागलेली आणि आत्म्यात दुःखीत पत्नीप्रमाणे परमेश्वर तुला परत बोलावित आहे, तरुण विवाहीत स्त्रीप्रमाणे आणि नाकारलेली, असे तुझा देव म्हणत आहे. मी तुला थोड्या वेळासाठी सोडले, परंतु मोठ्या करुणेने मी तुला एकत्र करीन. मी रागाच्या भरात क्षणभर आपले तोंड तुजपासून लपवले; पण मी सर्वकाळच्या कराराच्या विश्वासाने मी तुझ्यावर दया करीन. असे परमेश्वर, तुझा तारणहार म्हणतो.
यशया 54:5-8 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
कारण तुझा निर्माणकर्ता तुझा पती आहे— सर्वसमर्थ याहवेह हे त्यांचे नाव आहे— इस्राएलचे पवित्र परमेश्वर तुझे उद्धारकर्ता आहेत; त्यांना सर्व पृथ्वीचे परमेश्वर म्हणतात. याहवेह तुला माघारी बोलावतील जणू काही तू त्याग केलेली व दुःखी आत्म्याची पत्नी होतीस— केवळ टाकून देण्याकरिता जी तारुण्यात विवाहित झाली होती,” असे तुझे परमेश्वर म्हणतात. “केवळ काही क्षणासाठी मी तुझा त्याग केला होता, पण आता मोठ्या करुणेने मी तुला जवळ घेईन. क्षणिक रागाच्या भरात मी थोडा वेळ माझे मुख तुझ्यापासून लपविले होते, परंतु आता सर्वकाळच्या प्रीतीने मी तुझ्यावर करुणा करेन,” असे याहवेह तुझे उद्धारकर्ता म्हणतात.