यशया 54:14-17
यशया 54:14-17 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
नीतिमत्तेत तू स्थापीत होशील. तुला येथून पुढे छळाचा अनुभव येणार नाही, कारण तू भिणार नाही, आणि तुला घाबरवण्यास कोणीही तुझ्याजवळ येणार नाही. पाहा, जर कोणीएक अशांतता निर्माण करीत असेल, तर ती माझ्यापसून नाही; कोणीएक तुझ्याबरोबर अशांतता निर्माण करतो तो अपयशात पडेल. पाहा, मी लोहाराला निर्माण केले, जो तो विस्तव फुलावा म्हणून हवा फुंकतो आणि आपल्या कामासाठी हत्यार घडवितो आणि विनाशासाठी मी विनाशक उत्पन्न करतो. तुझ्याविरुध्द तयार केलेले कोणतेही हत्यार सफल होणार नाही; आणि तुजवर आरोप ठेवणाऱ्या प्रत्येकास दोषी ठरवशील. परमेश्वराच्या सेवकाचे हेच वतन आणि माझ्यापासून त्यांचे समर्थन आहे.” हे परमेश्वराचे म्हणणे आहे.
यशया 54:14-17 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
नीतिमत्तेने तू खंबीर होशील, जाचापासून दूर राहशील, कारण तुला भीतीच उरणार नाही; तू धाकापासून दूर राहशील, तो तुझ्याजवळ येणार नाही; पाहा, तुझ्यावर गर्दी झाली ती माझ्याकडून झाली नाही; तुझ्यावर कोण गर्दी करतो? जो करील तो तुझ्यामुळे पडेल. पाहा, लोहार विस्तव फुंकून आपल्या कामाला पाहिजे तसे हत्यार घडतो, त्याला मी उत्पन्न केले आहे; विध्वंस करण्यासाठी विध्वंसकही मी उत्पन्न केला आहे. तुझ्यावर चालवण्यासाठी घडलेले कोणतेही हत्यार तुझ्यावर चालणार नाही; तुझ्यावर आरोप ठेवणार्या सर्व जिव्हांना तू दोषी ठरवशील. परमेश्वराच्या सेवकांचे हेच वतन आहे, हीच माझ्याकडून मिळालेली त्यांची नीतिमत्ता आहे, असे परमेश्वर म्हणतो.”