यशया 48:9-11
यशया 48:9-11 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
माझ्या नामाप्रीत्यर्थ मी आपला क्रोध लांबणीवर टाकला; तुझा उच्छेद करू नये म्हणून माझ्या प्रशंसेप्रीत्यर्थ मी स्वतःला आवरले. मी तुला गाळले आहे, पण रुप्याप्रमाणे नव्हे; मी दु:खरूप भट्टीत तुला कसोटीस लावले आहे. माझ्या, केवळ माझ्याचप्रीत्यर्थ हे मी करतो; माझ्या नामाची अप्रतिष्ठा का व्हावी? माझा गौरव मी इतरांना देत नाही.
यशया 48:9-11 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
पण माझ्या नावा करिता, आणि माझ्या सन्मानार्थ मी तुझा नाश करणार नाही. पाहा! मी तुला गाळून पाहिले आहे, पण चांदी सारखे नाही, मी तुला संकटाच्या भट्टीत शुध्द केले आहे. माझ्यासाठी, माझ्यासाठीच, मी हे करेन, कारण मी माझ्या नावाचा अनादर कसा होऊ देऊ? मी माझे वैभव दुसऱ्याला देणार नाही.
यशया 48:9-11 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तरी माझ्या नावाकरिता मी माझ्या प्रकोपास विलंब करेन, आणि माझ्या प्रशंसेकरिता तुमच्यावरून आवरून धरेन आणि तुमचा सर्वस्वी नाश करणार नाही. पाहा, मी तुम्हाला शुद्ध केले आहे, पण चांदीइतके नव्हे; पीडेच्या भट्टीत मी तुमची परीक्षा घेतली. तरीही माझ्या प्रीत्यर्थ, होय, माझ्याच प्रीत्यर्थ मी हे करेन. मी स्वतःची अपकीर्ती कशी होऊ देईन? माझे गौरव मी इतरांना घेऊ देणार नाही.