YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यशया 45:1-7

यशया 45:1-7 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

परमेश्वर म्हणतो, कोरेश माझा अभिषिक्‍त आहे; त्याच्यापुढे राष्ट्रे पादाक्रांत करण्यासाठी मी त्याचा उजवा हात धरला आहे; राजांना आपल्या कमरा सोडायला मी लावतो; त्याच्यापुढे दरवाजे उघडतील, वेशी बंद राहणार नाहीत, असे मी करतो. “परमेश्वर त्याला म्हणतो, मी तुझ्यापुढे चालेन व उंचसखल असलेले सपाट करीन; मी पितळी दरवाजे फोडून त्यांचे तुकडे करीन, लोखंडाचे अडसर मोडून टाकीन. तुला अंधारातील निधी व गुप्त स्थळी लपवलेले धन देईन, म्हणजे तुला समजेल की तुला तुझ्या नावाने हाक मारणारा मी परमेश्वर इस्राएलाचा देव आहे. माझा सेवक याकोब, माझा निवडलेला इस्राएल ह्याच्यामुळे मी तुझे नाव घेऊन हाक मारली; तू मला ओळखत नव्हतास तरी मी तुला उपनाव दिले. मीच परमेश्वर, अन्य कोणी नव्हे, माझ्यावेगळा देव नाही; तू मला ओळखत नव्हतास तरी मी तुला सज्ज केले, येणेकरून सर्वांनी जाणावे की उगवतीपासून मावळतीपर्यंत माझ्यावेगळा कोणी नाही. मीच परमेश्वर, अन्य कोणी नाही. प्रकाशकर्ता, अंधाराचा उत्पन्नकर्ता, शांतीचा जनक व अरिष्टांचा उत्पादक मीच आहे; हे सर्व करणारा मी परमेश्वर आहे.

सामायिक करा
यशया 45 वाचा

यशया 45:1-7 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

परमेश्वर आपला अभिषिक्त कोरेशाला म्हणतो, ज्याच्यापुढे राष्ट्रे जिंकायला त्याचा उजवा हात मी धरला आहे, आणि ज्याच्यापुढे दरवाजे उघडायला मी राजास निशस्त्र करीन, म्हणून वेशी उघड्या राहतील. मी तुझ्यापुढे चालेन आणि पर्वत सपाट करीन; मी पितळी दरवाजाचे तोडून तुकडे तुकडे करीन आणि त्यांच्या लोखंडी सळ्यांचे कापून तुकडे तुकडे करीन आणि मी तुला अंधारातील संपत्ती व दूर लपविलेली धन देईन. अशासाठी की, मी जो तुला तुझ्या नावाने हाक मारतो तो इस्राएलाचा देव मी परमेश्वर आहे, हे तुला कळावे. कारण माझा सेवक याकोबासाठी, आणि माझा निवडलेला इस्राएल ह्याच्यासाठी, मी तुला नावाने हाक मारली आहे. तू मला ओळखत नव्हतास, तरी मी तुला उपनाव दिले. मी परमेश्वर आहे आणि मीच फक्त देव आहे दुसरा कोणीही नाही. जरीही तू मला ओळखत नव्हतास, तरीही तुला युद्धास सशस्त्र केले. अशासाठी की, सूर्याच्या उगवतीपासून मावळतीपर्यंत लोकांनी जाणावे की माझ्यावाचून कोणी देव नाही. मी परमेश्वर आहे, आणि दुसरा कोणीही नाही. मी प्रकाश बनविला आणि अंधाराला अस्तित्वात आणले; मी शांती आणतो आणि अनर्थ उत्पन्न करतो; मी परमेश्वर आहे, जो ह्यासर्व गोष्टी करतो.

सामायिक करा
यशया 45 वाचा

यशया 45:1-7 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

“त्यांच्या अभिषिक्ताला दिलेला याहवेहचा संदेश, कोरेशने अनेक देश जिंकावे आणि राजांना शस्त्र विरहित करावे यासाठी मी त्याचा उजवा हात धरला आहे. मी त्याच्यासाठी दारे उघडेन; यापुढे या वेशी बंद होणार नाहीत: हे सायरसा, मी तुझ्यापुढे चालेन, मी पर्वत जमीनदोस्त करेन आणि कास्याच्या वेशी तोडेन व त्यांच्या लोखंडी सळया कापून टाकेन. दडवून ठेवलेली भांडारे, गुप्तस्थळी जमा करून ठेवलेली संपत्ती, मी तुला देईन, जेणेकरून तुला तुझ्या नावाने हाक मारणारा, इस्राएलचा परमेश्वर याहवेह मीच आहे हे तुला समजेल. माझा सेवक याकोबासाठी, माझ्या निवडलेल्या इस्राएलसाठी, तू जरी माझा अधिकार मान्य करत नाही, तरी मी तुला नावाने हाक मारून बोलाविले आणि तुला मानाच्या उपाधीने अलंकृत केले. मीच याहवेह आहे, माझ्याशिवाय दुसरा कोणीही नाही; माझ्या व्यतिरिक्त इतर कोणीही परमेश्वर नाही. तू जरी माझा अधिकार मान्य करत नाही, तरी मी तुला सामर्थ्य देईन. मग सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत सर्व लोकांना कळेल की माझ्याशिवाय दुसरा परमेश्वर नाहीच. मीच याहवेह आहे, माझ्याशिवाय दुसरा कोणीही नाही; मीच प्रकाश व अंधकार निर्माण करतो. मीच कल्याण व अरिष्ट आणतो, या सर्व गोष्टी करणारा याहवेह मीच आहे.

सामायिक करा
यशया 45 वाचा