YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यशया 44:6-28

यशया 44:6-28 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

इस्राएलाचा राजा परमेश्वर, त्याचा उद्धारकर्ता, सेनाधीश परमेश्वर म्हणतो : “मी आदी आहे, मी अंत आहे; माझ्यावेगळा देव नाहीच. मी प्राचीन काळच्या लोकांची स्थापना केली तेव्हापासून माझ्यासारखा संदेश प्रकट करणारा कोण आहे? कोणी असला तर त्याने बोलावे व माझ्यापुढे प्रतिपादन करावे; त्यांनी भावी गोष्टी व आता होणार्‍या गोष्टी सांगाव्यात. भयभीत होऊ नका, थरथर कापू नका; मी मागेच तुला हे ऐकवले आहे व कळवले की नाही? तुम्ही माझे साक्षी आहात, माझ्यावेगळा कोणी देव आहे काय? माझ्यावेगळा कोणी दुर्ग नाही; मला कोणी ठाऊक नाही.” कोरीव मूर्ती घडवणारे सर्व शून्यवत आहेत; त्यांचे रम्य विषय काही कामाचे नाहीत; त्याविषयी साक्ष देणार्‍यांना दृष्टी नाही किंवा अक्कल नाही; म्हणून ती देणार्‍यांना लज्जा प्राप्त होईल. हा देव कोणी घडवला? ही मूर्ती कोणी व्यर्थ ओतली? पाहा, त्याचे सर्व अनुयायी फजीत होतील; ही मूर्ती घडवणारे माणसेच आहेत; ते सर्व एकत्र जमोत, पुढे येवोत, भयभीत होवोत, ते सारे लज्जित होवोत. लोहार छिन्नी पाजवतो, तो पेटलेल्या कोळशांनी काम करतो, हातोड्यांनी मूर्तीला आकार आणतो, तो आपल्या बाहुबलाने ती घडतो; त्याला भूक लागते व त्याची शक्ती गळते; तो पाणी प्याला नाही तर व्याकूळ होतो. सुतार सूत धरतो; गेरूने आखणी करतो; तिच्यावर रंधा फिरवतो, व कैवाराने खुणा करतो; आणि ती घरात ठेवण्याजोगी व्हावी म्हणून तिला मनुष्याचा आकार व सौंदर्य देतो. कोणी आपणासाठी गंधसरू तोडतो; सुरू व अल्लोन झाडे घेतो; तो वनवृक्षांतून जून झाडे निवडतो; तो देवदारूचे झाड लावतो आणि पावसाने ते वाढते. ते मनुष्यास सरपणाच्या कामी पडते; त्यातले काही लाकूड घेऊन त्याने तो शेक घेतो; ते पेटवून त्यावर भाकरी भाजतो; तो त्याचा देवही बनवतो व त्याच्या पाया पडतो; तो त्याची कोरीव मूर्ती करतो व तिचे भजनपूजन करतो. त्यातले अर्धे लाकूड तो अग्नीत जाळतो; त्या अर्ध्यावर मांस भाजून खातो व तृप्त होतो; तो शेकताना म्हणतो, “मला ऊब येत आहे, मला शेक लागत आहे.” तो त्याच्या उरलेल्या भागाचा देव घडतो, म्हणजे कोरीव मूर्ती आपल्यासाठी बनवतो; तो तिच्या पाया पडतो, तिचे भजनपूजन करतो; तिची प्रार्थना करतो; तो तिला म्हणतो, “माझे तारण कर, तू माझा देव आहेस.” अशांना कळत नाही, समजत नाही; त्यांचे डोळे लिंपले असल्यामुळे त्यांना दिसत नाही; त्यांची हृदये लिंपली असल्यामुळे त्यांना समजत नाही. कोणी हे ध्यानात आणत नाही; “त्याचा अर्धा भाग आपण अग्नीत जाळला, त्याच्या निखार्‍यांवर भाकर भाजली, मांस भाजून खाल्ले आणि त्याच्या अवशेषाची अमंगल वस्तू मी कशी बनवू? झाडापासून काढलेल्या लाकडाच्या पाया मी कसा पडू?” असे म्हणण्याइतके कोणाला ज्ञान नाही, अक्कल नाही. तो राख भक्षण करतो, त्याचे हृदय मूढ झाल्यामुळे तो बहकला आहे; तो आपला जीव वाचवू शकत नाही; “माझ्या उजव्या हातात आहे ती साक्षात लबाडी नव्हे काय?” असे तो म्हणत नाही. हे याकोबा, हे इस्राएला, ह्या गोष्टी स्मरणात ठेव; तू माझा सेवक आहेस; मी तुला घडले आहे, तू माझा सेवक आहेस; हे इस्राएला, तुझा मला विसर पडायचा नाही. तुझे अपराध धुक्याप्रमाणे, तुझी पातके अभ्राप्रमाणे मी नाहीतशी केली आहेत; माझ्याकडे फीर, कारण मी तुला उद्धरले आहे. हे आकाशा, जयघोष कर, कारण परमेश्वराने हे केले आहे; अहो पृथ्वीच्या अधोभागांनो, हर्षनाद करा; अहो पर्वतांनो, हे वना, त्यातील प्रत्येक वृक्षा, तुम्ही जयजयकार करा; कारण परमेश्वराने याकोबाला उद्धरले आहे; तो इस्राएलाच्या ठायी आपला प्रताप प्रकट करतो. तुझा उद्धारकर्ता, गर्भावस्थेपासून तुला घडणारा परमेश्वर म्हणतो, “मी वस्तुमात्राचा कर्ता परमेश्वर आहे; मी एकट्याने आकाश पसरले, पृथ्वीचा विस्तार केला तेव्हा माझ्याजवळ कोण होते? खोट्या संदेष्ट्यांची चिन्हे खोटी करणारा, दैवज्ञांना वेडे ठरवणारा, ज्ञानी लोकांना मागे सारून त्यांचे ज्ञान मूर्खत्व ठरवणारा मी आहे. मी आपल्या सेवकाचा शब्द खरा करणारा, आपल्या दूतांची संदेशवचने सिद्धीस नेणारा आहे; मी यरुशलेमेविषयी म्हणतो, ‘तिच्यात वस्ती होवो;’ यहूदाच्या नगरांविषयी म्हणतो, ‘ती बांधण्यात येवोत, त्यांच्या उजाड झालेल्या स्थलांचा जीर्णोद्धार मी करीन;’ मी खोल पाण्याच्या डोहास म्हणतो, ‘कोरडा हो, मी तुझे प्रवाह आटवीन;’ मी कोरेशाविषयी म्हणतो, ‘तो माझा मेंढपाळ आहे, तो माझे सर्व मनोरथ सिद्धीस नेईल.’ तो यरुशलेमेविषयी म्हणेल, ‘ती बांधण्यात येईल, मंदिराचा पाया घालण्यात येईल.”’

सामायिक करा
यशया 44 वाचा

यशया 44:6-28 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

इस्राएलाचा राजा परमेश्वर, तिचा उद्धारक, सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “मीच आरंभ आहे आणि मीच शेवट आहे; आणि माझ्याशिवाय कोणी देव नाही. माझ्यासारखा कोण आहे? तर त्याने जाहीर करावे आणि मला स्पष्टीकरण करावे माझे पुरातन लोक स्थापले तेव्हापासून ज्या गोष्टी घडत आहेत व पुढे ज्या घडतील त्या त्यांनी कळवाव्या. तुम्ही भिऊ नका किंवा घाबरे होऊ नका. पुरातन काळापासून मी तुला सांगितले आणि जाहीर केले नाही काय? तू माझा साक्षीदार आहे. माझ्याशिवाय तेथे कोणी देव आहे काय? तेथे कोणी दुसरा ‘खडक’ नाही; मला कोणी माहीत नाही.” जे कोरीव मूर्ती घडवतात ते सर्व काहीच नाहीत; ज्या गोष्टीत ते आनंदीत होतात त्या कवडीमोलाच्या आहेत. त्यांचे साक्षी पाहू शकत नाही किंवा काहीच समजत नाही आणि ते लज्जित होतील. हे देव कोणी किंवा जी ओतीव मूर्ती क्षुल्लक आहे ती कोणी घडवली आहे? पाहा, त्याचे सर्व सोबती लज्जित होतील; कारागीर तर केवळ माणसे आहेत. ते सर्व एकत्र जमून निर्णय घेवोत; ते एकत्र भयभीत व लज्जित होतील. लोहार त्याच्या हत्याराने, निखाऱ्यांवर काम करून, घडवत असतो. तो त्यास हातोड्याने आकार देतो आणि आपल्या बळकट बाहूने काम करतो. तो भुकेला होतो आणि त्याची शक्ती जाते. तो पाणी पीत नाही आणि क्षीण होतो. सुतार लाकडाचे माप दोरीने रेष मारून करतो आणि गेरूने आखणी करतो. त्याच्या हत्याराने त्यास आकार देतो आणि कंपासाने त्यावर खुणा करतो. ती पवित्रस्थानात रहावी म्हणून त्यास मनुष्याच्या आकाराची, आकर्षक मनुष्यासारखी घडवून तयार करतो. तो आपणासाठी गंधसरू तोडतो, किंवा सरू वा अल्लोनची झाडे निवडतो. तो आपणासाठी जंगलात झाडे तोडतो. तो देवदारूचे झाड लावतो पाऊस ते वाढवतो. मग मनुष्य त्याचा उपयोग सरपणासाठी आणि स्वतःला गरम ठेवण्यासाठी करतो. होय! त्याने अग्नी पेटून आणि भाकर भाजण्यासाठी करतो. मग त्यांपासून देव बनवतो आणि त्याच्या पाया पडतो; तो त्यापासून मूर्ती करतो व त्याच्या पाया पडतो. लाकडाचा एक भाग अग्नीसाठी जाळतो, त्यावर मांसाचा भाग भाजतो. तो खातो आणि तृप्त होतो. तो स्वत:ला ऊबदार ठेवतो आणि म्हणतो, “अहा! मला ऊब आहे, मी अग्नी पाहीला आहे.” शिल्लक राहिलेल्या लाकडाचे तो देव बनवतो, आपली कोरीव प्रतिमा घडवतो; तो त्याच्यापुढे नतमस्तक होतो व पूजा करतो, आणि प्रार्थना करून म्हणतो, तू माझा देव आहेस म्हणून मला वाचव. त्यांना कळत नाही, किंवा त्यांना समजत नाही, कारण त्यांचे डोळे आंधळे आहेत व ते पाहू शकत नाही, आणि त्यांच्या हृदयाला आकलन होत नाहीत. कोणी विचार करीत नाही किंवा त्यांना नीट समजत नाही ते म्हणतात, मी लाकडाचा एक भाग अग्नीत जाळला; होय, मी त्याच्या निखाऱ्यावर भाकर भाजली. मी त्याच्या निखाऱ्यावर मांस भाजले व खाल्ले. आता त्याच्या दुसऱ्या भागाच्या लाकडाचा आराधनेसाठी काहीतरी ओंगळ बनवू काय? मी लाकडाच्या ठोकळ्याच्या पाया पडू काय? हे जसे तो जर राख खातो; त्याचे फसवलेले हृदय चुकीच्या मार्गाने नेते. तो आपल्या जीवाला वाचवू शकत नाही किंवा तो म्हणत नाही, “माझ्या हातात धरलेल्या या गोष्टी खोटे देव आहेत.” असे तो म्हणणार नाही. “हे याकोबा, आणि इस्राएला, यागोष्टीबद्दल विचार कर, कारण तू माझा सेवक आहेस. मी तुला निर्माण केले; तू माझा सेवक आहेस. हे इस्राएला, मला तुझा विसर पडणार नाही. मी तुझी बंडखोरीची कृत्ये, दाट ढगाप्रमाणे आणि तुझे पाप आभाळाप्रमाणे, पुसून टाकली आहेत; माझ्याकडे माघारी ये, कारण मी तुला उद्धारीले आहे.” अहो, आकाशांनो, गायन करा, तुम्ही पृथ्वीच्या खालील अधोलोकांनो आरोळी मारा; अहो पर्वतांनो व रान, त्यातली सर्व झाडे गायन करा; कारण परमेश्वराने याकोबास उद्धारीले आहे आणि इस्राएलात आपले प्रताप दाखविले आहे. तुझा उद्धारक, ज्याने तुला गर्भावस्थेपासून घडवले तो परमेश्वर, ज्याने सर्वकाही निर्माण केले, जो एकटा आकाश पसरतो, ज्या एकट्याने पृथ्वी तयार केली तो म्हणतो मीच परमेश्वर आहे. व्यर्थ बोलणाऱ्याचे शकून मी निष्फळ करतो आणि जे शकून वाचतात त्यांना काळिमा लावतो; जो मी ज्ञानाचे ज्ञान मागे फिरवतो आणि त्यांचे सल्ले मूर्खपण करतो. मी परमेश्वर! जो आपल्या सेवकाची घोषणा परिपूर्ण करतो आणि आपल्या दूतांचा सल्ला सिद्धीस नेणारा, जो यरूशलेमेविषयी म्हणतो की, ती वसविली जाईल आणि यहूदाच्या नगराविषयी म्हणतो की, ती पुन्हा बांधली जातील आणि मी त्याच्या उजाड जागेची उभारणी करीन. जो खोल समुद्राला म्हणतो, आटून जा आणि मी तुझे प्रवाह सुकवीन. जो कोरेशाविषयी म्हणतो, तो माझा मेंढपाळ आहे, तो माझी प्रत्येक इच्छा पूर्ण करील. तो यरूशलेमेविषयी म्हणेल, ती पुन्हा बांधण्यात येईल आणि मंदिराविषयी म्हणेल, तुझा पाया घातला जाईल.

सामायिक करा
यशया 44 वाचा

यशया 44:6-28 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

“सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचा राजा व उद्धारक, याहवेह असे म्हणतात— मी आदि व अंत आहे. माझ्याशिवाय इतर कोणीही परमेश्वर नाही. माझ्यासारखे कोणी आहे काय? त्याने ते घोषित करावे. त्याने तसे जाहीर करावे आणि माझ्यासमोर प्रस्तुत करावे, मी माझ्या पुरातन लोकांची स्थापना केल्यापासून काय घडले, आणि पुढे काय होणार आहे होय, काय घडणार आहे हे त्यांनी सांगावे. भिऊ नका, थरथर कापू नका. मी अशी घोषणा केली नव्हती का व हे फार पूर्वी जाहीर केले नव्हते का? तुम्ही माझे साक्षीदार आहात. माझ्याशिवाय कोणी दुसरा परमेश्वर आहे काय? नाही, माझ्याशिवाय दुसरा खडक नाही; माझ्या माहितीत कोणी नाही.” कोरीव मूर्ती घडविणारे किती शून्यवत आहेत, आणि त्यांना जे मौल्यवान वाटते ते मातीमोल आहे. जे त्यांच्यावतीने बोलतात, ते अंध आहेत; ते अज्ञानी असून ते लज्जित झाले आहेत. जिच्यापासून काहीही लाभ होत नाही अशा दैवतांना आकार कोण देतो व त्या मूर्ती कोण घडवितो? हे करणारे लोक लज्जित होतील; हे सर्व कारागीर तर केवळ मानव आहेत. या सर्वांनी एकत्र यावे व सिद्ध करावे; त्यांना भयभीत करून लज्जित करण्यात येईल. लोहार अवजारे घेतो आणि आपल्या भट्टीपाशी उभा राहून तो काम करतो; मूर्तीला आकार देण्यासाठी तो हातोडी वापरतो, त्याच्या बाहूच्या शक्तीने तो त्याला ठोकून घडवितो. मग त्याला भूक लागते व तो शक्तिहीन होतो; तो पाणी पीत नाही आणि दुर्बल होतो. सुतार लाकडाचा एक ओंडका घेऊन त्याचे मोजपट्टीने माप घेतो आणि त्यावर लेखणीने खुणा करतो; पटाशीने ते तासून गुळगुळीत करतो. कंपासने त्यावर निशाणी करतो. त्याला मानवाच्या शरीराचा आकार देतो, सर्व मानवी गौरवाने अलंकृत करतो, जेणेकरून त्याची मंदिरात स्थापना होऊ शकेल. तो गंधसरू तोडतो किंवा बहुतेक सुरू वा एला ही झाडे निवडतो, तो त्या झाडाला रानातील इतर झाडांसह वाढवितो, किंवा देवदारू लावतो व पावसाच्या पाण्यावर त्याला वाढू देतो. मनुष्य त्याचा उपयोग जळणासाठी करतो; काही लाकूड जाळून स्वतःला ऊब मिळण्यासाठी, आणि आग पेटवून भाकर भाजण्यासाठी. परंतु तो त्या लाकडातून स्वतःसाठी एक देवही निर्माण करतो व त्याची आराधना करतो; तो एक मूर्ती तयार करतो व त्यास नमन करतो. अर्धे लाकूड तो जळण म्हणून वापरतो; त्यावर आपले अन्न शिजवितो, तो त्यावर मांस भाजतो व खाऊन तृप्त होतो. आपल्याला ऊबही आणतो व म्हणतो, “अहा! मी किती उबदार झालो आहे; मला अग्नी दिसत आहे.” आणि उरलेल्या लाकडापासून तो आपले दैवत म्हणजे मूर्ती तयार करतो; त्या मूर्तीस नमन करून तिची पूजा करतो, तो त्याची प्रार्थना करतो आणि म्हणतो “माझी सुटका कर! तू माझ्या देव आहेस!” ते अज्ञानी आहेत, त्यांना काहीही कळत नाही; त्यांनी बघू नये म्हणून त्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधली आहे. त्यांना समज येऊ नये म्हणून त्यांची अंतःकरणे बधिर केली आहेत. कोणीही थांबून विचार करीत नाही, कोणालाही समज नाही व ते जाणून असे म्हणत नाहीत, “अरे! हा तर लाकडाचा ठोकळा आहे; यातील काही भाग मी सरपण म्हणून वापरला, याच्या कोळशावर मी भाकरही भाजली व मांस शिजवून ते खाल्ले. मग यातील अवशिष्ट भागाची मी तिरस्करणीय वस्तू बनवावी काय? मी लाकडाच्या ठोकळ्याला नमन करावे काय?” असा मनुष्य राख भक्षण करतो; संभ्रमात पडलेले अंतःकरण त्याला चुकीचे मार्गदर्शन करते; तो स्वतःला वाचवू शकत नाही किंवा म्हणू शकत नाही “ही माझ्या उजव्या हातातील वस्तू निव्वळ खोटेपणा नाही का?” “हे याकोबा, या गोष्टी आठवणीत ठेव, इस्राएला, तू माझा सेवक आहेस. मीच तुला निर्माण केले, तू माझा सेवक आहेस; इस्राएला, तुला मी विसरणार नाही. मी तुझी पापे आकाशातील मेघांप्रमाणे, सकाळच्या धुक्याप्रमाणे विरून टाकली आहेत. माझ्याकडे परत ये, मी खंडणी भरून तुला मुक्त केले आहे.” अहो आकाशांनो, आनंद गीते गा, कारण याहवेहने हे अद्भुत कृत्य केले आहे; हे खालील पृथ्वी, गर्जना कर, हे पर्वतांनो, अरण्यांनो आणि सर्व वृक्षांनो, गायनाचा कल्लोळ उसळू द्या. कारण याहवेहने याकोबाचा उद्धार केला आहे. इस्राएलमध्ये त्यांनी त्यांचे गौरव प्रकट केले आहे! “याहवेह असे म्हणतात; तुमचे उद्धारकर्ता, ज्यांनी तुमची गर्भाशयात घडण केली: मी याहवेह आहे, संपूर्ण आकाश मी एकट्याने पसरले, मीच सर्व गोष्टींचा निर्माणकर्ता, ज्याने आकाश ताणले, ज्याने स्वतः पृथ्वी पसरविली, खोट्या संदेष्ट्यांची चिन्हे जे व्यर्थ करतात आणि दैवप्रश्न करणाऱ्यांना मूर्ख ठरवितात, जो सुज्ञ माणसांचे ज्ञान उलथून टाकतो आणि ते निरर्थक बनवितो. जो त्याच्या सेवकाच्या वचनांना पाठिंबा देतो आणि त्याच्या संदेशवाहकांच्या भविष्यवाण्यांची परिपूर्ती करतो, जो यरुशलेमविषयी म्हणतो, ‘मी यरुशलेम पुनः रहिवासित करेन,’ यहूदीयाच्या नगराविषयी म्हणतो, ‘ती पुनः बांघली जाईल,’ आणि तेथील भग्नावशेषाविषयी म्हणतो, ‘मी त्यांची पुनर्बांधणी करेन,’ जो खोल जलाशयाला म्हणतो, ‘आटून जा, आणि मी तुमचे झरे कोरडे करेन,’ कोरेशविषयी जो म्हणतो, ‘तो माझा मेंढपाळ आहे तेव्हा तो माझ्या सर्व इच्छा पूर्ण करेल; तो यरुशलेमविषयी म्हणेल, “त्याची पुनर्बांधणी होवो,” आणि मंदिराविषयी म्हणेल, “त्याचा पाया बांधण्यात येवो.” ’