यशया 42:5-6
यशया 42:5-6 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
परमेश्वर देव हे म्हणत आहे, ज्याने आकाश निर्माण केले आणि त्यास विस्तारीले; ज्याने पृथ्वी पसरली आणि ज्यामध्ये जीवन दिले आहे; तो त्यावरील लोकांस श्वास देतो आणि त्यावर राहणाऱ्यांना जिवन देतो; मी, परमेश्वराने, तुला न्यायानुसार बोलाविले आहे आणि तुझा हात धरीन. मी तुझे रक्षण करीन आणि तुला लोकांसाठी करार व परराष्ट्रीयांसाठी प्रकाश देणारा असे करीन.
यशया 42:5-6 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
परमेश्वर याहवेह हे असे म्हणतात— आकाश निर्माण करून ते विस्तारणारे, पृथ्वीवर सर्वकाही उगविणारे व ते पसरविणारे, ते तिच्यावरील लोकांना श्र्वास प्रदान करतात, आणि जे तिच्यावरून चालतात, त्यांना जीवन प्रदान करतात: “मी, याहवेहने, नीतिमत्वात तुम्हाला पाचारण केले आहे; मी तुमचा हात धरून तुम्हाला पाठिंबा देईन, मी तुमचे संगोपन करेन आणि तुम्हाला कराराच्या पूर्ततेचे लोक बनवेन आणि इतर राष्ट्रांना प्रकाश देणारे
यशया 42:5-6 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
आकाश निर्माण करून विस्तारणारा, पृथ्वीचा व तिच्या उपजाचा फैलाव करणारा, तिच्यावरील लोकांत प्राण घालणारा व तिच्यावर संचार करणार्यांना जीवित देणारा देव परमेश्वर असे म्हणतो; “मी परमेश्वराने न्यायानुसार तुला बोलावले आहे, मी तुझा हात धरला आहे, तुला राखले आहे; तू लोकांना करार व राष्ट्रांना प्रकाश देणारा असे मी तुला करीन