यशया 1:1-20
यशया 1:1-20 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
यहूदाचे राजे उज्जीया, योथाम, आहाज व हिज्कीया ह्यांच्या काळात यहूदा व यरुशलेम ह्यांविषयी आमोजाचा पुत्र यशया ह्याला झालेला दृष्टान्त. हे आकाशा, ऐक; अगे पृथ्वी, कान दे, कारण परमेश्वर बोलत आहे : “मी मुलांचे पालनपोषण केले, त्यांना लहानाचे मोठे केले तरी ती माझ्याशी फितूर झाली. बैल आपल्या धन्याला ओळखतो, गाढव आपल्या मालकाचे ठाण ओळखतो; पण इस्राएल ओळखत नाही, माझे लोक विचार करीत नाहीत.” किती हे पापिष्ट राष्ट्र! दुष्कर्माने भारावलेले लोक, दुर्जनांची संतती! ही आचारभ्रष्ट मुले! ह्यांनी परमेश्वराला सोडले आहे, इस्राएलाच्या पवित्र प्रभूला तुच्छ मानले आहे; ती वियुक्त होऊन मागे फिरली आहेत. तुम्ही अधिकाधिक फितून मार का खात राहता? हरएक मस्तक व्यथित झाले आहे, हरएक हृदय ग्लान झाले आहे. पायाच्या तळव्यापासून मस्तकापर्यंत काहीच धड नाही; जखमा, चेंचरलेले व पुवळलेले घाय आहेत; ते कोणी पिळून काढत नाही, त्यांवर कोणी पट्टी बांधत नाही, कोणी तेलाने नरम करीत नाही. तुमचा देश ओसाड आहे; तुमची नगरे अग्नीने जळाली आहेत; तुमची शेते परके लोक तुमच्यादेखत खाऊन टाकत आहेत; परक्यांनी उद्ध्वस्त केल्याप्रमाणे ती ओसाड झाली आहेत. सीयोनेची कन्या द्राक्षीच्या मळ्यातल्या खोपीसारखी, काकड्यांच्या बागेतल्या माचाळासारखी, वेढा पडलेल्या नगरासारखी राहिली आहे. सेनाधीश परमेश्वराने आमच्यासाठी यत्किंचित शेष राखून ठेवले नसते तर आम्ही सदोमासारखे झालो असतो, गमोर्याप्रमाणे बनलो असतो. सदोमाच्या अधिपतींनो, परमेश्वराचे वचन ऐका; गमोर्याच्या लोकांनो, आमच्या देवाच्या नियमशास्त्राकडे कान द्या. “परमेश्वर म्हणतो, तुमचे बहुत यज्ञबली माझ्या काय कामाचे? मेंढरांचे होम, पुष्ट वासरांची चरबी ह्यांनी माझी अति तृप्ती झाली आहे; बैल, कोकरे व बोकड ह्यांच्या रक्ताने मला संतोष होत नाही. तुम्ही माझे दर्शन घेण्यास येताना माझी अंगणे तुडवता, हे तुम्हांला सांगितले कोणी? निरर्थक अर्पणे आणखी आणू नका; धूपाचा मला वीट आहे; चंद्रदर्शन, शब्बाथ व मेळे भरवणे मला खपत नाही; सणाचा मेळा हाही अधर्मच होय. माझा जीव तुमची चंद्रदर्शने व सण ह्यांचा द्वेष करतो; त्यांचा मला भार झाला आहे; तो सोसून मी थकलो आहे. तुम्ही हात पसरता तेव्हा मी तुमच्यापुढे डोळे झाकतो; तुम्ही कितीही विनवण्या केल्या तरी मी ऐकत नाही; तुमचे हात रक्ताने भरले आहेत. आपणांस धुवा, स्वच्छ करा; माझ्या डोळ्यांपुढून आपल्या कर्मांचे दुष्टपण दूर करा; दुष्टपणा करण्याचे सोडून द्या; चांगले करण्यास शिका, नीतीच्या मागे लागा, जुलम्याला ताळ्यावर आणा;1 अनाथाचा न्याय करा; विधवेचा कैवार घ्या. परमेश्वर म्हणतो, चला, या, आपण बुद्धिवाद करू; तुमची पातके लाखेसारखी लाल असली तरी ती बर्फासारखी पांढरी होतील; ती किरमिजासारखी तांबडी असली तरी लोकरीसारखी निघतील. तुम्ही माझे ऐकायला मान्य व्हाल तर भूमीचे उत्तम फळ खाल; तुम्ही अमान्य होऊन बंड कराल तर तलवार तुम्हांला खाऊन टाकील; कारण परमेश्वराच्या तोंडचे हे वचन आहे.”
यशया 1:1-20 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आमोज याचा मुलगा यशया ह्याने यहूदा व यरूशलेम ह्याविषयी उज्जीया, योथाम, आहाज व हिज्कीया या यहूदी राजांच्या कालकिर्दीच्या काळात पुढे घडून येणाऱ्या गोष्टींविषयीचा दृष्टांत पाहिला. हे आकाशा, ऐक आणि हे पृथ्वी लक्षपूर्वक कान दे; कारण परमेश्वर हे बोलला आहेः “मी लेकरांचे पालनपोषण करून त्यांना वाढविले, परंतु त्यांनी मजविरूद्ध बंडखोरी केली. बैल आपल्या धन्याला ओळखतो, आणि गाढव आपल्या मालकाचे खाण्याचे कुंड ओळखतो, परंतु इस्राएल ओळखत नाही, इस्राएलास समजत नाही.” अहाहा! हे राष्ट्र, पापी, दुष्कृत्यांच्या भाराने खाली दबलेले लोक, दुष्ट जनांची संतती, भ्रष्टाचाराने वागणारी मुले! त्यांनी परमेश्वरास सोडून दिले आहे, इस्राएलाच्या पवित्र परमेश्वरास त्यांनी तुच्छ लेखले आहे. त्यांनी स्वतःस त्याच्यापासून दूर केले आहे. तुम्ही अजूनही का मार खाता? तुम्ही अधिकाधिक बंड का करता? तुमचे संपूर्ण मस्तक आजारी व संपूर्ण अंतःकरण कमकुवत आहे. पायाच्या तळव्यापायापासून डोक्यापर्यंत ज्याला दुखापत झाली नाही असा भाग राहीला नाही; फक्त जखमा व घाव आणि ताज्या उघड्या जखमा आहेत; त्या स्वच्छ केल्या नाहीत, पट्टी बांधून त्या झाकल्याही नाहीत किंवा तेलाने उपचार केला नाही. तुमचा ओसाड झाला आहे; तुमची नगरे जळून गेली आहेत. तुमच्या देखत परकीयांनी तुमची शेते उध्द्वस्त केली आहेत. परकीयांनी ती नासधूस करून, उलथून सोडून दिली आहेत. सियोनाची कन्या ही द्राक्षाच्या मळ्यातील खोपटीसारखी, काकडीच्या बागेतील पडवीसारखी, वेढा दिलेल्या नगरासारखी झाली आहे. जर सेनाधीश परमेश्वराने आम्हासाठी थोडेही शिल्लक ठेवले नसते तर आमची अवस्था सदोम व गमोरा या नगरांसारखी झाली असती. सदोमाच्या अधिकाऱ्यांनो, परमेश्वराचा वचन ऐका; गमोराच्या लोकांनो आमच्या देवाच्या नियमशास्त्राकडे लक्ष्य द्या. परमेश्वर म्हणतो, “तुमचे असंख्य यज्ञबली माझ्या काय कामाचे? जळालेल्या मेंढरांची अर्पणे, प्राण्यांची चरबी ही मला आता पुरेशी झाली आहेत; आणि तसेच बैल, कोंकरे, किंवा शेळ्या यांच्या रक्ताने मला संतोष होत नाही;” जेव्हा तुम्ही मजसमोर सादर होण्यास येता, माझी अंगणे आपल्या पायाखाली तुडविता? असे करण्यास तुम्हास कोणी सांगितले? पुन्हा निरर्थक अशी अर्पणे आणू नका; धुपाचा मला तिटकारा आहे. तुमचे नवचंद्रदर्शन व शब्बाथ मेळे, असे पापी मेळे मी खपवून घेत नाही. तुमची चंद्रदर्शने व तुम्ही नेमलेले सण यांचा माझा जीव द्वेष करतो; त्यांचे मला ओझे झाले आहे; तो सहन करून मी थकलो आहे. म्हणून जेव्हा तुम्ही प्रार्थनेत हात पसरता, तेव्हा मी आपले डोळे तुम्हापासून झाकीन; जरी तुम्ही पुष्कळ प्रार्थना केल्या, तरीही मी त्या ऐकणार नाही; तुमचे हात निष्पापांच्या घाताच्या रक्ताने पूर्णपणे भरले आहेत. स्वतःला धुवा, स्वच्छ करा; तुमची दुष्ट कृत्ये माझ्या नजरेपासून नाहीशी करा; वाईट करणे सोडा; चांगले करण्यास शिका; न्याय मिळवा, पीडितांची मदत करा, पितृहीनांना न्याय द्या, विधवांचे रक्षण करा. परमेश्वर म्हणतो, “आता या, व एकमेकांशी संवाद करून हे जाणून घ्या; जरी तुमची पातके लाखेसारखी लाल असली, तरीही ती बर्फाप्रमाणे शुभ्र होतील; जरी ती किरमिजी रंगासारखी लाल असली, तरी ती शुभ्र लोकरीसारखी होतील. जर तुमची इच्छा असेल व तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल, तर तुम्हास या भूमीपासून चांगले खावयास मिळेल. परंतु जर तुम्ही नाकाराल व बंड कराल, तर तलवार तुमचा नाश करील,” कारण परमेश्वर आपल्या मुखाने हे बोलला आहे.
यशया 1:1-20 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
यहूदीयाचे राजे उज्जीयाह, योथाम, आहाज आणि हिज्कीयाहच्या शासनकाळात आमोजाचा पुत्र यशायाहने यहूदीया आणि यरुशलेम संबंधी दृष्टान्त पाहिला. हे आकाशा, माझे ऐक! हे पृथ्वी ऐक! कारण याहवेह असे म्हणाले: “मी मुलांचे संगोपन केले आणि त्यांना वाढविले, परंतु त्यांनी माझ्याविरुद्ध बंड केले आहे. बैल त्याच्या मालकाला ओळखतो, गाढव त्याच्या मालकाचा गोठा ओळखतो, परंतु इस्राएल ओळखत नाही, माझ्या लोकांना समजत नाही.” हे पापी राष्ट्रा, तुझा धिक्कार असो, तुम्ही लोक, ज्यांचा अपराध फार मोठा आहे, वाईट कृत्ये करणाऱ्यांची पिल्ले, भ्रष्टाचारासाठी देऊन टाकलेली मुले! त्यांनी याहवेहना सोडून दिले आहे; इस्राएलच्या पवित्राला तिरस्काराने झिडकारले आहे, आणि त्यांच्याकडे पाठ फिरविली आहे. तुम्हाला आणखी मार का दिला जावा? तुम्ही विद्रोह का करीत राहावे? तुमच्या संपूर्ण डोक्याला दुखापत झाली आहे, तुमचे संपूर्ण अंतःकरण ग्रस्त झाले आहे. पायाच्या तळव्यापासून ते डोक्याच्या टाळूपर्यंत काहीही चांगले तिथे राहिले नाही— फक्त जखमा आणि खरचटलेले, आणि उघडे व्रण आहेत, त्या स्वच्छ केलेल्या किंवा पट्ट्यांनी बांधलेल्या नाहीत किंवा जैतुनाच्या तेलाने त्या पुसलेल्या नाहीत. तुमचा देश उद्ध्वस्त झाला आहे, तुमची शहरे अग्नीमध्ये जळाली आहेत; पाडाव केल्यानंतर करावे तसे, तुमच्यादेखत तुमची शेते परदेशीयांनी ओरबाडून घेतली आहेत. सीयोनकन्येला द्राक्षमळ्यात असलेल्या आश्रयस्थानासारखे, काकडीच्या शेतातील झोपडीसारखे, वेढा दिलेल्या शहराप्रमाणे आहे. सर्वसमर्थ याहवेह यांनी जर आमच्यातील काहींना वाचविले नसते तर, आम्ही सदोमासारखे झालो असतो, गमोरासारखी आमची गत झाली असती. अहो, सदोमाचे राज्यकर्ते, याहवेहचे शब्द ऐका; तुम्ही गमोराचे लोकहो, आमच्या परमेश्वराची सूचना ऐका! “तुमची असंख्य होमर्पणे— ती माझ्यासाठी काय आहेत?” असे याहवेह म्हणतात. “होमार्पणासाठी माझ्याकडे गरजेपेक्षा जास्त मेंढे आणि पुष्ट वासरे यांची चरबी आहे; बैलांच्या, मेंढरांच्या किंवा शेळ्यांच्या रक्तामध्ये मला काही आनंद नाही. जेव्हा तुम्ही माझ्यासमोर येता, तुम्हाला कोणी सांगितले, की माझ्या मंदिरांचे अंगण तुडवा? अर्थशून्य अर्पणे आणणे बंद करा! तुमच्या सुगंधी धूपाचा मला तिटकारा वाटतो. नवचंद्र उत्सव, शब्बाथ आणि समारंभ— अशा तुमच्या निरर्थक सभा मी सहन करू शकत नाही. तुमचे अमावस्याचे उत्सव आणि तुमचे नेमलेले सण यांचा मी माझ्या संपूर्णतेने तिरस्कार करतो. ते मला भार असे झाले आहेत; त्यांना सहन करता मी थकून गेलो आहे. प्रार्थनेमध्ये जेव्हा तुम्ही तुमचे हात पसरता, तेव्हा मी तुमच्यापासून माझे डोळे लपवितो; जेव्हा तुम्ही पुष्कळ विनवण्या करता, मी त्या ऐकत नाही. तुमचे हात रक्ताने माखलेले आहेत! “धुऊन तुम्ही स्वतःला स्वच्छ करा. तुमची दुष्कृत्ये माझ्या दृष्टीबाहेर करा; वाईट कृत्ये करणे थांबवा. योग्य तेच करण्यास शिका; न्यायीपणाचा शोध घ्या. पीडितांचे संरक्षण करा. पितृहीनांच्या बाजूचे समर्थन करा; विधवांची बाजू मांडा. “या आता, आपण वाद मिटवू या,” असे याहवेह म्हणतात. “जरी तुमची पापे लाखेसारखी असली, तरी ती बर्फासारखी पांढरी होतील; जरी ती किरमिजाप्रमाणे लाल असली, तरी ती लोकरीसारखी होतील. जर तुमची तयारी असेल आणि तुम्ही आज्ञाकारक असाल, तर तुम्ही भूमीच्या चांगल्या वस्तू खाल; परंतु जर तुम्ही विरोध कराल आणि विद्रोह कराल, तर तुमचा तलवारीने नाश केला जाईल.” कारण हे शब्द याहवेहच्या मुखातील आहेत.