इब्री 2:8
इब्री 2:8 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तू सर्वकाही त्याच्या पायाखाली ठेवलेस.” देवाने सर्वकाही त्याच्या अधिपत्याखाली ठेवले आणि कोणतीही गोष्ट त्याच्या अधिपत्याखाली ठेवायची सोडली नाही. पण आता अजूनपर्यंत सर्वकाही त्याच्या अधिपत्याखाली ठेवलेले आपल्या दृष्टीस पडत नाही खरे.
इब्री 2:8 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
आणि सर्वकाही त्यांच्या पायाखाली ठेवले आहे.” सर्वगोष्टी त्यांच्या पायाखाली ठेवल्या असताना, परमेश्वराने कोणतीच अशी गोष्ट ठेवली नाही की जी त्यांच्या स्वाधीन केली नाही. तरी सध्या हे सर्व स्वाधीन केल्याचे आपण अद्यापि पाहिले नाही.
इब्री 2:8 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तू सर्वकाही त्याच्या अधीन — त्याच्या पायांखाली — ठेवले आहेस.” ‘सर्वकाही त्याच्या अधीन ठेवले आहेस,’ म्हणजे त्याच्या अधीन ठेवलेले नाही असे काही राहू दिले नाहीस; परंतु ‘सर्वकाही त्याच्या अधीन ठेवले आहेस,’ असे अजून आपल्या दृष्टीस पडत नाही खरे.
इब्री 2:8 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
‘तू सर्व काही त्याच्या अधीन - त्याच्या पायांखाली - ठेवले आहे’, सर्व काही त्याच्या अधीन ठेवले आहे, म्हणजे त्याच्या अधीन ठेवलेले नाही असे काही राहू दिले नाही; परंतु सर्व काही त्याच्या अधीन ठेवले आहे असे अजून आपल्या दृष्टीस पडत नाही खरे.