इब्री 2:1-4
इब्री 2:1-4 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
या कारणास्तव ज्या सत्याविषयी आपण ऐकलेले आहे त्याकडे आपण अधिक काळजीपूर्वक लक्ष दिले पाहिजे. यासाठी की, आपण त्यापासून भरकटून जाऊ नये. कारण नियमशास्त्र जे देवदूतांकरवी सांगितले गेले ते इतके प्रभावी होते आणि जर प्रत्येक आज्ञाभंगाच्या व प्रत्येक अवमानाच्या कृत्याला योग्य ती शिक्षा होते. तर आपण अशा महान तारणाकडे दुर्लक्ष केल्यास, मग आपण शिक्षेपासून कसे सुटू? या तारणाची पहिली घोषणा प्रभूने केली. ज्यांनी प्रभूचे ऐकले त्यांच्याकडून याची खात्री पटली देवानेसुद्धा चिन्हांद्वारे, अद्भूत कृत्यांद्वारे आणि निरनिराळ्या चमत्कारांद्वारे, त्यांच्या साक्षीची भर व त्याच्या इच्छेनुसार पवित्र आत्म्याची दाने वाटून दिली.
इब्री 2:1-4 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
आपण ऐकलेल्या गोष्टींकडे फार काळजीपूर्वक लक्ष दिले पाहिजे, यासाठी की आपण त्यामुळे बहकून जाऊ नये. कारण ज्याअर्थी देवदूतांद्वारे सांगितलेला संदेश स्थिर होता, आणि प्रत्येक आज्ञेचे उल्लंघन व आज्ञाभंग करणार्यांना योग्य शिक्षा मिळाली. ज्या तारणाची प्रभुने प्रथम घोषणा केली, आणि ऐकणार्यांनी आम्हाला पुष्टी दिली, त्या महान तारणाची आपण उपेक्षा केली, तर आपण कसे निभावू? परमेश्वराने चिन्हे, अद्भुते व नाना प्रकारचे चमत्कार करून साक्ष दिली, आणि पवित्र आत्म्याद्वारे त्याच्या इच्छेनुसार विशिष्ट दाने वाटून दिली आहेत.
इब्री 2:1-4 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
ह्या कारणास्तव ऐकलेल्या गोष्टींकडे आपण विशेष लक्ष लावले पाहिजे, नाहीतर आपण त्यांपासून वाहवत जाऊ. देवदूतांच्या द्वारे सांगितलेले वचन जर दृढ झाले आणि प्रत्येक उल्लंघनाचे व आज्ञाभंगाचे यथान्याय फळ मिळाले, तर आपण एवढ्या मोठ्या तारणाकडे दुर्लक्ष केल्यास आपला कसा निभाव लागेल? ते सांगण्याचा आरंभ प्रभूकडून झाला असून, ते ऐकणार्यांनी त्याविषयी आपल्याला प्रमाण पटवले; त्यांच्याबरोबर देवानेही चिन्हे, अद्भुते व नाना प्रकारचे पराक्रम करून आणि आपल्या इच्छेप्रमाणे पवित्र आत्म्याची दाने वाटून देऊन साक्ष दिली.
इब्री 2:1-4 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
ह्या कारणामुळे ऐकलेल्या गोष्टींकडे आपण विशेष लक्ष लावले पाहिजे, नाही तर आपण त्यांपासून वाहवत जाऊ. आपल्या पूर्वजांकरिता देवदूतांद्वारे सांगितलेले वचन जर खरे ठरले आणि प्रत्येक उ्रंघनाची व आज्ञाभंगाची यथान्याय्य शिक्षा मिळाली, तर आपण एवढ्या मोठ्या तारणाकडे दुर्लक्ष केल्यास आपला निभाव कसा लागेल? ते सांगण्याचा आरंभ प्रभूकडून झाला असून ते ऐकणाऱ्यांनी त्याविषयी आपल्या सर्वांना प्रमाण पटविले; त्यांच्याबरोबर देवानेही चिन्हे, अद्भुत कृत्ये व नाना प्रकारचे पराक्रम करून आणि त्याच्या इच्छेप्रमाणे पवित्र आत्म्याची वरदाने वाटून साक्ष दिली.