इब्री 13:5-6
इब्री 13:5-6 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आपले जीवन पैशाच्या लोभापासून दूर ठेवा व तुमच्याकडे जे आहे त्यामध्येच समाधान माना कारण देवाने असे म्हणले आहे, “मी कधीही तुला सोडणार नाही, मी कधीही तुला त्यागणार नाही” म्हणून आपण धैर्याने म्हणू शकतो, “देव माझा सहाय्यकर्ता आहे, मी भिणार नाही. मनुष्य माझे काय करणार?”
इब्री 13:5-6 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
द्रव्यलोभापासून दूर राहा; जवळ असेल तेवढ्यात तुम्ही समाधानी असावे. कारण परमेश्वराने म्हटले आहे, “मी तुला कधीच सोडणार नाही व तुला कधीच टाकणार नाही.” म्हणूनच आत्मविश्वासाने आपल्याला म्हणता येते: “प्रभू माझे साहाय्यक आहेत; मला कशाचेही भय वाटणार नाही. नश्वर मानव मला काय करणार?”
इब्री 13:5-6 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तुमची वागणूक द्रव्यलोभावाचून असावी; जवळ आहे तेवढ्यात तुम्ही तृप्त असावे; कारण त्याने स्वतः म्हटले आहे, “मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही.” म्हणून आपण धैर्याने म्हणतो2 “प्रभू मला साहाय्य करणारा आहे, मी भिणार नाही; मनुष्य माझे काय करणार?”
इब्री 13:5-6 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
तुम्ही द्रव्यलोभापासून अलिप्त राहा; जे तुमच्याजवळ आहे तेवढ्यावर तृप्त रहा; कारण परमेश्वराने स्वतः म्हटले आहे, ‘मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही’. म्हणून आपण आत्मविश्वासाने म्हणू या, प्रभू माझा साहाय्यकर्ता आहे, मी भिणार नाही; मनुष्य माझे काय करणार?