इब्री 12:7-8
इब्री 12:7-8 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
हा कठीण समय आहे म्हणून शिस्त सहन करा. ते असे दर्शवते की, देव तुम्हास मुलांसारखी वागणूक देत आहे; कारण असा कोणता मुलगा आहे ज्याला वडील शिस्त लावीत नाहीत? परंतु ज्या शिक्षेचे सर्व भागीदार झाले आहेत अशा शिक्षेवाचून जर तुम्ही आहा, तर तसे तुम्ही दासीपुत्र आहात आणि तुम्ही खरे पुत्र नाही.
इब्री 12:7-8 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तुम्ही धीराने शिस्त सहन करत आहात; परमेश्वर तुम्हाला पुत्राप्रमाणे वागवितात, आणि लेकरांना शिस्त लावत नाही असा कोण पिता आहे? जर तुम्हाला शिस्त लावली नाही तर—सर्वांनाच शिस्तीला सामोरे जावे लागते—तुम्ही अनौरस आहात, तुम्ही या कुटुंबातील खरे पुत्र किंवा कन्या नाहीत.
इब्री 12:7-8 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
शिक्षणासाठी तुम्ही शिक्षा सहन करत आहात; देव तुम्हांला पुत्राप्रमाणे वागवतो, आणि ज्याला बाप शिक्षा करत नाही असा कोण पुत्र आहे? ज्या शिक्षेचे वाटेकरी सर्व झाले आहेत अशा शिक्षेवाचून तुम्ही जर आहात तर तुम्ही पुत्र नाही, दासीपुत्र आहात.
इब्री 12:7-8 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
शिस्तीसाठी तुम्ही अडचणी सहन करीत आहात; देव तुम्हांला पुत्राप्रमाणे वागवितो आणि ज्याला बाप शिक्षा करत नाही असा पुत्र कोण आहे? जी शिक्षा सर्वांना मिळालेली आहे ती शिक्षा स्वीकारावयास तुम्ही जर तयार नसाल, तर तुम्ही खरे पुत्र नव्हे, तर अनौरस संतती आहात.