इब्री 11:4-6
इब्री 11:4-6 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
विश्वासाने हाबेलाने काइनापेक्षा अधिक चांगला यज्ञ देवाला केला, तेणेकरून तो नीतिमान आहे अशी त्याच्याविषयी साक्ष देण्यात आली. ती साक्ष ‘देवाने दानाच्या वेळी’ दिली; आणि तो मेला असूनही त्या विश्वासाच्या द्वारे अद्यापि बोलत आहे. हनोखाला मरणाचा अनुभव येऊ नये म्हणून त्याला विश्वासाने लोकांतरी नेण्यात आले, आणि ‘तो सापडला’ नाही; ‘कारण त्याला देवाने लोकांतरी नेले;’ लोकांतर होण्यापूर्वी त्याच्याविषयी साक्ष देण्यात आली की, ‘तो देवाला संतोषवीत असे;’ आणि विश्वासावाचून त्याला ‘संतोषवणे’ अशक्य आहे; कारण देवाजवळ जाणार्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की, तो आहे, आणि त्याचा शोध झटून करणार्यांना तो प्रतिफळ देणारा आहे.
इब्री 11:4-6 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
विश्वासाने, हाबेलाने काइनापेक्षा अधिक चांगले बलिदान देवाला अर्पण केले; त्याद्वारे तो नीतिमान आहे अशी त्याच्याविषयी साक्ष देण्यात आली कारण देवाने त्याच्या अर्पणाविषयी साक्ष दिली आणि त्याद्वारे तो मरण पावला असताही अजूनही बोलतो. हनोखाला मरणाचा अनुभव घेऊ नये म्हणून, त्यास विश्वासाने लोकांतरी नेण्यात आले; आणि तो कोठे सापडला नाही, कारण देवाने त्यास नेले. त्यास लोकांतरी नेण्यापूर्वी त्याच्याविषयी अशी साक्ष देण्यात आली की, तो देवाला संतोषवीत असे. पण विश्वासाशिवाय त्यास संतोषवणे अशक्य आहे, कारण जो त्याच्याकडे येतो त्याने विश्वास ठेवला पाहिजे की, तो आहे आणि जे त्यास झटून शोधतात त्यांना प्रतिफळ देणारा आहे.
इब्री 11:4-6 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
विश्वासाद्वारे हाबेलाने काइनापेक्षा उत्तम अर्पण परमेश्वराकडे आणले. परमेश्वराने त्याची प्रशंसा करून त्याला नीतिमान गणले, आणि हाबेल जरी मरण पावला आहे, तरी विश्वासाद्वारे तो आजही बोलतो. विश्वासाद्वारे हनोख जिवंत असताना परमेश्वराने त्याला स्वर्गात नेले, त्याला मृत्यूचा अनुभव आला नाही: “तो एकाएकी दिसेनासा झाला, कारण परमेश्वराने त्याला नेले.” हे घडण्यापूर्वी परमेश्वर म्हणाला होता की तो हनोखाच्या बाबतीत अतिशय संतुष्ट होता. विश्वासाशिवाय परमेश्वराला संतुष्ट करणे अशक्य आहे, ज्या कोणाला परमेश्वराकडे यावयाचे असेल, त्याने परमेश्वर आहे असा विश्वास धरला पाहिजे व त्यांचा मनापासून शोध करणार्यांना ते प्रतिफळ देतात.
इब्री 11:4-6 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
विश्वासाने हाबेलने काइनपेक्षा अधिक चांगला यज्ञ देवाला अर्पण केला, त्यावरून तो नीतिमान आहे, अशी त्याच्याविषयी साक्ष देण्यात आली. ती साक्ष देवाने त्याची दाने स्वीकारून दिली आणि तो निधन पावला असला, तरी त्याच्या विश्वासाद्वारे तो अजूनपर्यंत बोलत आहे. हनोखला मरणाचा अनुभव येऊ नये म्हणून त्याला विश्वासामुळे लोकांतरी नेण्यात आले आणि तो सापडला नाही; कारण त्याला देवाने लोकांतरी नेले; लोकांतर होण्यापूर्वी त्याच्याविषयी साक्ष देण्यात आली की, तो देवाला प्रसन्न करीत असे; विश्वासावाचून परमेश्वराला प्रसन्न करणे अशक्य आहे; देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास बाळगला पाहिजे की, देव आहे आणि त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो पारितोषिक देणारा आहे.