हाग्गय 1:8-9
हाग्गय 1:8-9 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
पर्वतावर जा, लाकडे आणा आणि माझे मंदिर बांधा; मग मी त्यामध्ये आनंद करीन आणि मी गौरविला जाईन,” असे परमेश्वर म्हणतो. “तुम्ही पुष्कळाची वाट पाहिली, परंतु पाहा! तुम्ही थोडके घरी आणले तेव्हा मी त्यावर फुंकर मारली! हे का? असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो! कारण माझे घर ओसाड पडले असून प्रत्येक मनुष्य आपआपल्या स्वत:च्या घरात आनंद घेत आहे.
सामायिक करा
हाग्गय 1 वाचाहाग्गय 1:8-9 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
डोंगरावर जाऊन लाकडे आणा व मंदिर बांधा; त्याने मी प्रसन्न होईन व माझा महिमा प्रकट करीन, असे परमेश्वर म्हणतो. तुम्ही पुष्कळाची अपेक्षा केली, पण हाती थोडे लागले; जे तुम्ही घरी आणले त्यावर मी फुंकर घातली; हे का, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. कारण हेच की माझे मंदिर ओसाड पडले असून तुम्ही प्रत्येक आपापल्या घरासाठी धडपड करत आहात.
सामायिक करा
हाग्गय 1 वाचा