हबक्कूक 3:1-2
हबक्कूक 3:1-2 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
संदेष्टा हबक्कूकची शिगयोनोथावर प्रार्थनाः परमेश्वरा, मी तुझी वार्ता ऐकली, आणि मी भयभीत झालो. हे परमेश्वर, तू आपले कार्य या समयामध्ये पुनर्जीवित कर; या समयामध्ये ते माहित करून दे. तुझ्या क्रोधात आमच्यावर दया करण्याची आठवण ठेव.
सामायिक करा
हबक्कूक 3 वाचाहबक्कूक 3:1-2 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
हबक्कूक संदेष्ट्याची प्रार्थना म्हणजे क्षोभस्तोत्र : हे परमेश्वरा, मी तुझी कीर्ती ऐकून भयभीत झालो आहे. हे परमेश्वरा, वर्षाचा क्रम चालू असता आपल्या कामाचे पुनरुज्जीवन कर. वर्षाचा क्रम चालू असता ते प्रकट कर, क्रोधातही दया स्मर.
सामायिक करा
हबक्कूक 3 वाचा