उत्पत्ती 9:20-29
उत्पत्ती 9:20-29 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
नोहा शेती करू लागला, त्याने द्राक्षाचा मळा लावला; तो द्राक्षारस पिऊन गुंगला आणि आपल्या डेर्यात उघडानागडा पडला. तेव्हा कनानाचा बाप हाम ह्याने आपल्या बापाची नग्नावस्था पाहून आपले दोघे भाऊ बाहेर होते त्यांना हे कळवले. तेव्हा शेम व याफेथ ह्यांनी वस्त्र घेऊन आपल्या खांद्यांवर ठेवले व पाठमोरे होऊन आपल्या बापाची नग्नता झाकली; त्यांची तोंडे पाठमोरी होती म्हणून त्यांना आपल्या बापाची नग्नता दिसली नाही. द्राक्षारसाच्या गुंगीतून सावध झाल्यावर आपल्या धाकट्या मुलाने काय केले ते नोहाला समजले. तो म्हणाला, “कनान शापित होईल, तो आपल्या बांधवांच्या दासांचा दास होईल.” तो म्हणाला, “शेमाचा देव परमेश्वर धन्य! कनान त्याचा दास होईल. देव याफेथाचा विस्तार करील; तो शेमाच्या डेर्यात राहील; आणि कनान त्याचा दास होईल.” नोहा जलप्रलयानंतर तीनशे पन्नास वर्षे जगला. नोहा एकंदर नऊशे पन्नास वर्षे जगला, मग तो मरण पावला.
उत्पत्ती 9:20-29 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
नोहा शेतकरी बनला, आणि त्याने एक द्राक्षमळा लावला. तो थोडा द्राक्षरस प्याला आणि तो धुंद झाला. तो त्याच्या तंबूत उघडा-वाघडा पडला होता. तेव्हा कनानाचा पिता हाम याने आपला पिता उघडा-वागडा पडलेला असल्याचे पाहिले व त्याने तंबूच्या बाहेर येऊन ते आपल्या भावांना सांगितले. मग शेम व याफेथ यांनी एक कपडा घेतला व तो आपल्या खांद्यावर ठेवून ते पाठमोरे तंबूत गेले. अशा प्रकारे त्यांनी आपल्या पित्याची नग्नता झाकली; पाठमोरे असल्यामुळे ती त्यांना दिसली नाही. जेव्हा नोहा नशेतून जागा झाला, तेव्हा आपला धाकटा मुलगा हाम याने काय केले हे त्यास समजले. तेव्हा नोहा म्हणाला, “कनान शापित होवो, तो आपल्या भावाच्या गुलामातील सर्वांत खालचा गुलाम होवो.” तो म्हणाला, “शेमाचा देव परमेश्वर धन्यवादित असो. कनान त्याचा सेवक होवो. देव याफेथाचा अधिक विस्तार करो, आणि शेमाच्या तंबूत तो त्याचे घर करो. कनान त्यांचा सेवक होवो.” पूरानंतर नोहा तीनशे पन्नास वर्षे जगला; नोहा एकूण नऊशें पन्नास वर्षे जगला; मग त्यानंतर तो मरण पावला.
उत्पत्ती 9:20-29 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
नोआह शेतकरी झाला व त्याने एक द्राक्षमळा लावला. एके दिवशी तो द्राक्षारस प्याला आणि द्राक्षारसाने धुंद होऊन आपल्या तंबूत उघडानागडा पडला. कनानचा पिता हाम याने आपल्या पित्याची नग्नता पाहिली आणि बाहेर जाऊन त्याने ही गोष्ट आपल्या दोन्ही भावांना सांगितली. हे ऐकून शेम व याफेथ यांनी एक झगा घेतला; आपल्या खांद्यांपर्यंत तो उंच धरून ते आपल्या पित्याची नग्नता झाकली जावी म्हणून उलट्या पावली चालत जाऊन, विरुद्ध दिशेला पाहत त्यांनी तो झगा त्याच्या अंगावर टाकला. नोआह नशेतून शुद्धीवर आला आणि आपला धाकट्या पुत्राने काय केले हे त्याला समजले, तो म्हणाला, “कनान शापित असो! तो आपल्या भावांच्या गुलामातील सर्वात कनिष्ठ गुलाम होवो.” मग नोआह असेही म्हणाला, “शेमचे परमेश्वर याहवेह यांची स्तुती असो! कनान शेमचा गुलाम होवो. परमेश्वर याफेथच्या प्रदेशाचा विस्तार करोत; याफेथ शेमच्या तंबूत राहो, आणि कनान त्याचाही गुलाम होवो.” जलप्रलयानंतर नोआह साडेतीनशे वर्षे जगला. 950 वर्षाचा होऊन नोआह मृत्यू पावला.