उत्पत्ती 9:20-22
उत्पत्ती 9:20-22 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
नोहा शेती करू लागला, त्याने द्राक्षाचा मळा लावला; तो द्राक्षारस पिऊन गुंगला आणि आपल्या डेर्यात उघडानागडा पडला. तेव्हा कनानाचा बाप हाम ह्याने आपल्या बापाची नग्नावस्था पाहून आपले दोघे भाऊ बाहेर होते त्यांना हे कळवले.
उत्पत्ती 9:20-22 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
नोहा शेतकरी बनला, आणि त्याने एक द्राक्षमळा लावला. तो थोडा द्राक्षरस प्याला आणि तो धुंद झाला. तो त्याच्या तंबूत उघडा-वाघडा पडला होता. तेव्हा कनानाचा पिता हाम याने आपला पिता उघडा-वागडा पडलेला असल्याचे पाहिले व त्याने तंबूच्या बाहेर येऊन ते आपल्या भावांना सांगितले.
उत्पत्ती 9:20-22 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
नोआह शेतकरी झाला व त्याने एक द्राक्षमळा लावला. एके दिवशी तो द्राक्षारस प्याला आणि द्राक्षारसाने धुंद होऊन आपल्या तंबूत उघडानागडा पडला. कनानचा पिता हाम याने आपल्या पित्याची नग्नता पाहिली आणि बाहेर जाऊन त्याने ही गोष्ट आपल्या दोन्ही भावांना सांगितली.