उत्पत्ती 7:23-24
उत्पत्ती 7:23-24 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
पृथ्वीच्या पाठीवर असणारे सर्वकाही म्हणजे मानव, पशू, रांगणारे प्राणी व आकाशातील पक्षी ह्या सर्वांचा नाश देवाने केला; ते पृथ्वीवरून नाहीसे झाले; नोहा व त्याच्याबरोबर तारवात होते तेवढे मात्र वाचले. दीडशे दिवसपर्यंत पाणी पृथ्वी व्यापून होते.
उत्पत्ती 7:23-24 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
अशा रीतीने देवाने सर्वकाही म्हणजे मानव, पशू, सरपटणारे प्राणी आणि आकाशातील पक्षी अशा सर्व मोठ्या जीवधारी प्राण्यांचा नाश केला. पृथ्वीच्या पाठीवरून त्या सर्वांचा नाश करण्यात आला. केवळ नोहा आणि तारवात त्याच्या सोबत जे होते तेच फक्त वाचले. एकशे पन्नास दिवस पृथ्वीवर पाण्याचा जोर होता.
उत्पत्ती 7:23-24 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
पृथ्वीवर असलेल्या प्रत्येक सजिवांचा नाश झाला; मानव आणि प्राणी आणि सरपटणारे प्राणी आणि पक्षी पृथ्वीवरून नाहीसे झाले. फक्त नोआह आणि त्याच्यासोबत तारवात असलेलेच वाचले. पृथ्वी पाण्याच्या पुराखाली दीडशे दिवस राहिली.