उत्पत्ती 43:13-14
उत्पत्ती 43:13-14 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तर आता आपल्या भावाला बरोबर घेऊन त्या मनुष्याकडे जायला निघा. सर्वसमर्थ देवाला तुमचा कळवळा येवो व तुम्ही त्या मनुष्यापुढे गेलात म्हणजे तो तुमचा दुसरा भाऊ व बन्यामीन ह्यांना तुमच्या हवाली करो. ह्यावर मी आपल्या मुलांना मुकलो तर मुकलो.”
उत्पत्ती 43:13-14 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तुमच्या भावालाही बरोबर घ्या. उठा आणि त्या मनुष्याकडे परत जा. “त्या अधिकाऱ्यापुढे तुम्ही जाऊन उभे रहाल तेव्हा सर्वसमर्थ देव तुम्हास साहाय्य करो. यासाठी की, त्याने बन्यामिनाला व शिमोनाला सोडून द्यावे. आणि जर मी माझ्या मुलांना मुकलो, तर मुकलो.”
उत्पत्ती 43:13-14 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तुमच्या भावाला बरोबर घेऊन त्या मनुष्याकडे लगेच जा. त्या माणसापुढे, सर्वसमर्थ परमेश्वराने तुमच्यावर कृपा करावी म्हणजे तो दुसर्या भावाला आणि बिन्यामीनालाही तुमच्यासोबत परत पाठवेल. पण जर मी माझ्या पुत्रांना मुकलो तर मुकलो.”