YouVersion लोगो
सर्च आयकॉन

उत्पत्ती 43:11-14

उत्पत्ती 43:11-14 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

मग त्यांचा पिता इस्राएल त्यांना म्हणाला, “असेच असेल तर मग एवढे करा : ह्या देशात उत्पन्न होणारे मोलवान पदार्थ त्या मनुष्याला भेट म्हणून आपल्या गोणीत घालून न्या; थोडा डिंक व थोडा मध, मसाला, गंधरस, पिस्ते व बदाम घेऊन जा. दुप्पट पैसा बरोबर न्या; तुमच्या गोण्यांच्या तोंडी जो पैसा परत आला तोही परत घेऊन जा, कदाचित काही चूक झाली असेल. तर आता आपल्या भावाला बरोबर घेऊन त्या मनुष्याकडे जायला निघा. सर्वसमर्थ देवाला तुमचा कळवळा येवो व तुम्ही त्या मनुष्यापुढे गेलात म्हणजे तो तुमचा दुसरा भाऊ व बन्यामीन ह्यांना तुमच्या हवाली करो. ह्यावर मी आपल्या मुलांना मुकलो तर मुकलो.”

सामायिक करा
उत्पत्ती 43 वाचा

उत्पत्ती 43:11-14 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

मग त्यांचा बाप इस्राएल म्हणाला, “जर असे आहे तर आता हे करा, त्या अधिकाऱ्याकरता आपल्या देशातले चांगले निवडक पदार्थ म्हणजे थोडा मध, मसाल्याचे पदार्थ व बोळ, पिस्ते, बदाम, डिंक, गंधरस वगैरे तुमच्या गोण्यांत घेऊन त्यास बक्षीस म्हणून घेऊन जा.” या वेळी दुप्पटीपेक्षा जास्त पैसा तुमच्या हाती घ्या. मागच्या वेळी तुम्ही दिलेला जो पैसा तुमच्या गोण्यामधून परत आला तोही परत घेऊन जा. कदाचित काही चूक झाली असेल. तुमच्या भावालाही बरोबर घ्या. उठा आणि त्या मनुष्याकडे परत जा. “त्या अधिकाऱ्यापुढे तुम्ही जाऊन उभे रहाल तेव्हा सर्वसमर्थ देव तुम्हास साहाय्य करो. यासाठी की, त्याने बन्यामिनाला व शिमोनाला सोडून द्यावे. आणि जर मी माझ्या मुलांना मुकलो, तर मुकलो.”

सामायिक करा
उत्पत्ती 43 वाचा