YouVersion लोगो
सर्च आयकॉन

उत्पत्ती 42:1-11

उत्पत्ती 42:1-11 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

मिसरमध्ये धान्य असल्याचे याकोबाला समजले. तेव्हा याकोब आपल्या मुलांना म्हणाला, “तुम्ही एकमेकांकडे असे का बघत बसलात?” “इकडे पाहा, मिसर देशात धान्य आहे असे मी ऐकले आहे. तुम्ही खाली जाऊन आपणासाठी तिकडून धान्य विकत आणा म्हणजे आपण जगू, मरणार नाही.” तेव्हा योसेफाचे दहा भाऊ धान्य विकत घेण्यासाठी मिसरला गेले. याकोबाने, योसेफाचा भाऊ बन्यामीन याला त्याच्या भावाबरोबर पाठवले नाही, कारण तो म्हणाला, “कदाचित त्यास काही अपाय होईल.” कनान देशात फारच तीव्र दुष्काळ पडला होता, पुष्कळ लोक धान्य विकत घ्यावयास मिसराला गेले त्या लोकात इस्राएलाचे पुत्रही होते. त्या वेळी योसेफ मिसरचा अधिपती होता. तो देशातल्या सर्व लोकांस धान्य विकत असे. योसेफाचे भाऊ त्याच्याकडे आले आणि त्यांनी आपली तोंडे भूमीकडे करून खाली वाकून नमन केले. योसेफाने आपल्या भावांना पाहिल्याबरोबर ओळखले, परंतु ते कोण आहेत हे माहीत नसल्यासारखे दाखवून तो त्यांच्याशी कठोरपणाने बोलला. त्याने त्यांना विचारले, “तुम्ही कोठून आला?” त्याच्या भावांनी उत्तर दिले, “महाराज, आम्ही कनान देशातून धान्य विकत घेण्यासाठी आलो आहो.” योसेफाने आपल्या भावांना ओळखले, परंतु त्यांनी त्यास ओळखले नाही. आणि मग योसेफाला आपल्या भावांविषयी पडलेली स्वप्ने आठवली. तो त्यांना म्हणाला, “तुम्ही हेर आहात. तुम्ही धान्य खरेदी करण्यास नव्हे तर आमच्या देशाचा कमजोर भाग हेरण्यास आला आहात.” परंतु त्याचे भाऊ म्हणाले, “आमचे धनी, तसे नाही. आम्ही आपले दास अन्नधान्य विकत घ्यावयास आलो आहोत. आम्ही सर्व भाऊ एका पुरुषाचे पुत्र आहोत. आम्ही प्रामाणिक माणसे आहोत. आम्ही तुमचे दास हेर नाही.”

सामायिक करा
उत्पत्ती 42 वाचा

उत्पत्ती 42:1-11 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

याकोबाने ऐकले की, मिसर देशात धान्य आहे; तेव्हा तो आपल्या मुलांना म्हणाला, “तुम्ही एकमेकांच्या तोंडाकडे का पाहत राहिला आहात?” मग तो म्हणाला, “पाहा, मिसरात धान्य आहे असे मी ऐकतो; तुम्ही तेथे जाऊन आपल्यासाठी धान्य विकत आणा, म्हणजे आपण जगू, मरणार नाही.” मग योसेफाचे दहा भाऊ धान्य खरेदी करण्यासाठी खाली मिसर देशात गेले. तथापि योसेफाचा भाऊ बन्यामीन ह्याला याकोबाने त्याच्या भावांबरोबर पाठवले नाही; “कारण” तो म्हणाला, “कदाचित त्याला एखादा अपाय व्हायचा.” ह्याप्रमाणे इस्राएलाचे मुलगे इतर लोकांबरोबर धान्य खरेदी करण्यास आले; कारण कनान देशात दुष्काळ पडला होता. योसेफ त्या देशाचा मुख्य अधिकारी होता, आणि देशातल्या सर्व लोकांना तोच धान्य विकत असे. योसेफाच्या भावांनी येऊन जमिनीपर्यंत लवून त्याला मुजरा केला. योसेफाने आपल्या भावांना पाहताच ओळखले, तथापि त्यांच्याशी अनोळख्यासारखे वागून त्याने कठोरपणाने त्यांना विचारले की, “तुम्ही कोठून आलात?” त्यांनी म्हटले, “कनान देशातून धान्य खरेदी करायला आम्ही आलो आहोत.” योसेफाने आपल्या भावांना ओळखले, पण त्यांनी त्याला ओळखले नाही. मग त्यांच्याविषयी जी स्वप्ने पडली होती त्यांचे योसेफाला स्मरण होऊन तो त्यांना म्हणाला, “तुम्ही हेर आहात, देशाची मर्मस्थाने पाहण्यासाठी तुम्ही आला आहात.” ते म्हणाले, “महाराज, नाही, आपले दास अन्नसामग्री खरेदी करायला आले आहेत. आम्ही सर्व एकाच पुरुषाचे मुलगे असून सरळ माणसे आहोत. आपले दास, हेर नव्हेत.”

सामायिक करा
उत्पत्ती 42 वाचा